Shrut19's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 10

( Recap ) कनेक्टचा ८वा वर्धापनदिन -मुंबई

(बैठक आढावा ) लोकल गाईड्स कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन मुंबईत साजरा 

आढावा -मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन साजराआढावा -मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन साजरा

 

नमस्कार,
प्रिय स्थानिक मार्गदर्शक मित्रांनो,
माझ्या आमंत्रण पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे यशस्वी झालेली मीट अप आढावा पुढीलप्रमाणे -
तारीख :- 15 January 2023
वेळ :- 4.30 pm to 5.30 pm
ही बैठक/मीट अप
@NareshDarji @Tushar_Suradkar @KashifMisidia. द्वारे स्थानिक मार्गदर्शकांच्या 8 व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनचा तसेच 
#LGAnnivmeetup चा एक भाग आहे.
सध्या काही दिवसांपासून माझी तब्येत तितकीशी ठिक नव्हती, पण दर वर्षी प्रमाणे या सेलिब्रेशन मध्ये भाग घ्यायचाच होता,
म्हणून मी ठरवलं होतं कि ज्या दिवशी @Rohan10  ची Knowledge Sharing Outdoor Meet-up  होती त्याच वेळी त्याच ठिकाणी येणाऱ्या लोकल गाईड्स सोबत ८ वा वाढदिवस साजरा करावा.
ठरल्याप्रमाणे मिट अपला वेळेवर पोहचण्यासाठी मी व मयुरी, रोहन व त्याच्या कुटुंबीयांसह निघालो, मयुरी व मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटलो, श्रीमती भाग्यश्री रोहन हि देखील पहिल्यांदाच भेटली पण आम्हाला अनोळखीपण अजिबात जाणवले नाही, मस्त गप्पा मारत आम्ही प्रवास केला,  रोहनच्या मिट अप ला वेळेवर सुरूवात झाली, तेथे स्मिता व ईशा ह्या हि मला प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटल्या, पण आम्ही एकमेकांना कनेक्ट व आॅनलाईन मिट अपला अनेकदा भेटलो होतो, त्यामुळे अगदि छान मैत्री आधीच जुळली होतीच, रोहनच्या मिट अप मध्ये लोकल गाईड्स च्या बर्‍याचश्या माहिती ची देवाणघेवाण झाली, आणि नंतर माझ्या मिट अप च्या वेळेवर माझी मीट अप सुरू झाली, आदित्य व सुमित माझ्या मिट अपचे जुने जोडीदार नेहमी प्रमाणे माझ्या या मिटअपला वेळेवर हजर झाले, श्रीमती भाग्यश्री रोहन यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतः छान व चविष्ट केक बनवून आणला होताच, तसाच तो दिवस भारतीय सणाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मकरसंक्रांतीचा, मग सण आपला साजरा केलाच पाहिजे म्हणून आपल्या भारतीय महिला कनेक्ट मॉडरेटर ईशा ने सर्व उपस्थितांसाठी तीळगुळ लाडू व साखर फुटाणे (मकर संक्रांत विषेश ) न चुकता आणले होते,

अश्या प्रकारे गप्पा मारत, धमाल करत, आपले लोकल गाईड्स व कनेक्ट चे अनुभव शेअर करत, आम्ही मिळून केक कापून कनेक्ट चा आठवा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला..
उपस्थित लोकल गाईड्स पुढील प्रमाणे :-
@Globe_trotter_Ish, @MayuriKubal , @SUMEET1@Aditya_Patil ,

@Rohan10, @Smita_Patil त्यांच्या कुटुंबीयां सोबत
आणि  

@Rohan10 च्या बरोबर त्याची बायको भाग्यश्री व मुलगा अर्हत

उल्लेखनीय उपस्थिती:- लहान लोकल गाईड्स अर्हत व छोटा विराजस

 

vertical Attendancevertical Attendance

 

आणि

ऑनलाईन उपस्थिती

 @RosyKohli @Shreeish 

@NareshDarji @TravellerG

 हेही सामील झाले होते,

योगागोगाने माझा वर्ग मित्र राजेश त्याच्या परिवारासोबत त्या ठिकाणी आला असता आमची अनायासे भेट झाली व तेही आनंदाने या आपल्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झाले..

Thane, Maharashtra, India
50 comments
Level 10

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

नमस्कार,

 

ऑनलाईन उपस्थिती  साठी धन्यवाद 
 @RosyKohli @Shreeish 

@NareshDarji @TravellerG

Connect Moderator

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

अतिशय सुंदर मीटप, सुंदर लोकल गाईड्स, सुंदर बॅनर कोलाज - सर्वस्वी सुंदर रिकॅप 😊
खूप छान लिहिले आहेस @Shrut19 ताई.


सहभागी सर्वांचे अभनंदन, विशेषतः @Smita_Patil आणि @Rohan10  सहपरिवार सामील झाले
या पुढेही मुंबईत असेच मीटप घडत राहो ही सदिच्छा 💐

 

Level 8

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

खूप सुंदर रीकॅप लिहिला आहेस @Shrut19 ताई. तुझ्या मिट अप मध्ये खूप धमाल मज्जा आली. सर्वांना प्रत्यक्षात भेटून खूप आनंद झाला. तू कव्हर फोटो कोलाज एकदम भारी बनवला आहेस. आपल्या मुंबईतील लोकल गाईडच्या मिट अप अश्याच यशस्वी होत राहो ही सदिच्छा. धन्यवाद तू मिट अप ठेवल्या बद्दल. ८ वा वर्धापन दिवस छान साजरा झाला. 

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel
Level 10

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

Congratulation my sister @Shrut19 

I very happy can see you again 🙏🙏🙏

Connect Moderator

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

Wow, nice meet-up @Shrut19 

Thank you so much for taking your time and participating in the 8th anniversary Celebration of the Local Guides program. 

 

About me | Guiding Star 2020 | Guiding Star 2020 |  | Follow me on Instagram & Follow me on Maps |   | Happy to Help


Please use '@' before the name to tag me.



Level 9

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

फारच छान! मराठीत लिहिल्याबद्दल अभिनंदन @Shrut19 ताई !

 

 

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | Great Place to pause for Some Moments to Live: Ka'Soul Cafe, Pune |
Level 8

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

Hi @Shrut19  di a very congratulations for your amazing meet up. 😊

Connect Moderator

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

नमस्कार @Shrut19 ताई!  खूप सुंदर रीकॅप लिहिला आहेस ! तुझ्या मिटप मध्ये खूप धमाल मज्जा आली. सर्वांना प्रत्यक्षात भेटून खूप आनंद झाला ! मीटप छान  पार पडल्याबद्दल अभिनंदन 🙂

Thanks ! In case you wish to reach out, kindly send a private message on Connect. Feel free to tag on interesting posts by adding  '@' before my Connect profile id : globe_trotter_ish and I will respond as soon as I can !


 


Connect Moderator |  Guiding Star 2020 |  Guiding Star 2022Meet-up ChampionAccessibility Champion


Read Accessibility awareness posts here  | Accessible life - Google Earth projectInclusion and diversity series  | #GoGreenWithMaps series


My Instagram profile 

Level 8

Re: ( Recap ) मुंबईतील कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन

Wow! the cover picture is so nicely done. It was a good experience for me as this was the very first meet up for me after I started utilizing connect platform. What a wonderful surprise this was! I nowhere felt like new one in the meet up.

I really thank @Shrut19 @ajitthite @NareshDarji @Rohan10 @MayuriKubal  @Globe_trotter_Ish for sharing their knowledge on various topics.

Many thanks for this meet up 🙂

Looking forward to breakfast meet up by @Pratik_89