स्कायवे हा एक elevated प्रकारचा पादचारी मार्ग आहे जो दोन इमारतींना जोडतो. असे मार्ग बांधण्याचा उद्देश्य पादचाऱ्यांना तीव्र हवामानापासून वाचवणे हा असतो.
सर्वप्रथम असा स्कायवे मी जर्मनी मध्ये Munich ह्या शहरात पहिला.
तेथे हिवाळ्यात पडणारी कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी अनुभवली तेंव्हा जाणवले कि एका इमारती मधून दुसऱ्या इमारतीत जाण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
मात्र मध्यंतरी अमेरिकेतील Phoenix या शहरात देखील असा स्कायवे पाहून नवल वाटले. Arizona राज्यातील वाळवंटी प्रदेशात वसलेल्या या शहरात थेंबभर देखील पाऊस पडत नाही, मात्र उन्हाळा अतिशय कडक असतो. दिवसाचे तापमान ४५ अंश असू शकते.
अमेरिकेतील नागरिक traffic चे नियम अतिशय काटेकोरपणे पाळतात. एका air-conditioned इमारतीतून बाहेर पडून फक्त समोरील इमारतीत जाण्यासाठी नजीकच्या चौका पर्यंत जाऊन zebra -crossing वर रस्ता ओलांडून तळपत्या उन्हात परत पायी येणे थोडे अतिशयोक्तीचे ठरते. अशावेळी स्कायवे सारखा दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही.
वरील फोटो Phoenix Convention Center च्या दोन इमारतींना जोडणाऱ्या स्कायवे मधून काढला आहे. निरखून पाहिल्यास दूरवरील दोन इमारतींना जोडणारा दुसरा स्कायवे दिसू शकतो.
Accessibility Features for Phoenix Convention Center
Ramp Access.
Wheelchair-accessible Entrance.
Wheelchair-accessible Restroom/Toilet.
Wheelchair-accessible Seating.
Wheelchair-accessible Parking.
Wheelchair-accessible Elevator.
असे म्हणतात की एका स्कायवे मधून दुसऱ्या स्कायवेत शिरून तुम्ही न्यूयॉर्क शहर पालथे घालू शकता. ऐकावं ते नवलंच.
मलेशियातील Petronas Towers ला जोडणारा स्कायवे तर सर्वपरिचित आहे.
आपल्याकडे मुंबई, दिल्ली, बंगलोर अशा मेट्रो शहरांमध्ये स्कायवे बनवायला हरकत नाही. आपल्याला काय वाटते?
कदाचित तुम्ही असे स्कायवे भारतात किंवा इतर देशात देखील पहिले असतील. असल्यास नक्की comments मध्ये फोटोसह कळवा.
तोवर मंडळी… करा दिलखुलास Guiding ?