पुणे तिथे काय उणे अशी एक प्रचलित म्हण आहे आणि खरोखरच याचा प्रत्यय मला आला तो पन्नासाव्या मीटप मध्ये. विविध भागातील आलेले लोक यातले बरेच लोक तर एकमेकांना ओळखतही नव्हते आणि एका ठिकाणी आल्यावर त्यांनी केलेला जल्लोष हा मला अनुभवता आला तो पन्नासाव्या मीटर मध्ये.
पुणेरी लोकल गाईड हे जरी नाव असलं तरी यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आणि महाराष्ट्र बाहेरून सुद्धा अनेक लोकल गाईड इथे जमा झाले होते आणि त्यात भाव खाऊन गेल्या त्या आपल्या लोकल गाईड इंडियाच्या सीईओ ललिता मल्होत्रा.
आता भाव खाणे म्हणजे काही उपरोधने नव्हे बर का त्यांना पाहताच अगदी आपल्यातलेच एक व्यक्ती आहे हे समजून गेलं. आणि खरोखरच त्या अगदी साध्या आणि बोलक्या होत्या त्यांच्या येण्यामुळे या मीटप आणखीनच रंगत आली.
या मिटप मधील लोकं खूपच एनर्जेटिक आहेत हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून तर जाणवलंच.
पण मिटप मध्ये घेतलेल्या काही खेळांमध्ये देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खरोखरच अशी टीम बनन खूप महत्त्वाचा आहे कारण टीम वर्क हे कधीही फायद्याचे असतात.
या मीटपचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला अनेक पर्याय या लोकांच्या बोलण्यातून सुचतात किंवा कळतात नवनवे पर्याय उपलब्ध होतात याची तुम्हाला माहिती नसते आणि यासाठीच असे मिटप होणे गरजेचे आहे
लतिकाजींनी सुद्धा अनेक नवीन गोष्टी आम्हाला सांगितल्या ज्यामुळे भविष्यात आम्हाला त्याचा फायदा होणार तर आहेच पण आम्ही लोकांना सुद्धा त्याबाबतीत जागृत करून आणि माहिती देऊ.
या मीटप मध्ये अनेकांनी वेगवेगळे कार्ड्स बनवून सर्वांना वाटले जे इतरांना प्रोत्साहन देणारे आहेत.
अशा छोट्या छोट्या मिटपमधून आपण नवे मित्र बनू शकतो जे आपल्यासारखेच कार्य करण्यात मग्न आहेत. त्यांच्याकडूनही आपल्याला नवीन माहिती मिळत राहील आणि आपले कार्यही सुलभ होईल तेव्हा नक्कीच अशा मिटप होणे गरजेचे आहे या मिटप ना खरोखरच अतिशय मोलाची माहिती मिळते तेव्हा नक्कीच सर्वांनी त्यांना गेले पाहिजे.
या मीटपची माहिती तुषार सुराडकर यांनी सर्वांपर्यंत पोहोचवली आणि सर्वांनी तिथे येऊन आपली उपस्थिती दर्शवली सोबतच खूप माहिती गोळा केली आता त्या माहितीचा उपयोग भविष्यात लोकल गाईड कनेक्ट वर पोस्ट लिहिताना किंवा गुगल मॅप चा वापर करताना आपल्याला नक्कीच होईल तसेच कनेक्ट ची माहिती इतरांपर्यंत पोहोचवतानाही आपल्याला त्याचा फायदा होणार आहे.