विदर्भात अशी काही ठिकाण आहेत जी प्रसिद्ध आहेत आणि त्यातीलच एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वडाळी गार्डन अमरावती .संत्र्यांसाठी प्रसिद्ध असा हा भाग ,तितक्याच मायाळू लोकांसाठीही प्रसिद्ध आहे. या भागात शाकाहार मोठ्या प्रमाणात पाळला जातो.
वडाळी गार्डन हे अमरावती या ठिकाणी असून या गार्डनला जाण्याकरता तुम्ही अमरावती मधून रिक्षा ने जाऊ शकता किंवा स्वतःच्या वाहन असेल तर त्यानेही जाऊ शकता. आंबा माता मंदिर हे अमरावतीचं दैवत जितकं प्रसिद्ध आहे तितकाच हे गार्डनही प्रसिद्ध आहे.
गार्डनच्या बाहेरच चार चाकी आणि दुचाकी वाहनानकरिता पार्किंगची मोठी व्यवस्था आहे या आवारात शिरताच तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल लहान मुलं करिता आणि मोठ्यांकरिता अशी वेगवेगळे तिकीट येथे उपलब्ध असतात. या गार्डनमध्ये उंच उंच झाडे आहेत ज्याच्यावर विविधतेचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. संध्याकाळच्या वेळेस पक्षांचे थवे झाडावरती येऊन बसतात आणि त्यांचा किलबिलाट तुमच्या कानात घुमू लागतो. निसर्गरम्य वातावरणात या बागेत फिरण्याची मजा काही औरच आहे.
लहान मुलांकरिता असंख्य खेळणी ती ही विविधतेची येथे उपलब्ध आहेत सोबतीला हॉर्स रायडिंग करण्याची ही मजा तुम्ही लुटू शकता. राणीच्या बागेतली झुक झुक गाडी तुम्हाला आठवत असेल तर तशी झुक झुक गाडी या बागेतही उपलब्ध आहे लहान मुलांकरिता लहान झुक झुक गाडी तर मोठ्यांकरिता मोठी झुक झुक गाडी येथे उपलब्ध आहे.
संध्याकाळच्या वेळेस येतील कारंजे सुरू होतात वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी येथे वाजवली जातात आणि त्यावर कारंजे नाचत असतात हे पाहायला अतिशय सुंदर वाटते.
विविध झोके, मोठमोठ्या घरपट्टी, सी सॉं आणि बरिचशी खेळणी मुलांना खिळवून ठेवतात.साहसीखेळांचेही येते वेगळे विभाग आहे
या ठिकाणी तुम्ही घरून तयार केलेले जेवण घेऊन या निसर्गाच्या सानिध्यात जेवण करू शकतात तसेच अनेक जण इथे फोटोग्राफीसाठी सुद्धा येतात. या ठिकाणी तुम्हाला अनेक ससे, बदकांचे थवे पाहायला मिळतात.
बाजूलाच असलेल्या तलावात तुम्हाला बोटिंगही करता येते बोटिंगच्या बाजूलाच विविध पक्षांचे छोटे छोटे घरे पाहायला मिळतात. या ठिकाणी तुमचा वेळ कसा जातो हे कळत नाही तर अमरावतीला गेला तरच तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.