महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील कराड हे ठिकाण एक ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. कराड मधील मनोरे हे तर सुप्रसिद्ध आहेत मात्र येतील नकट्या रावळाची विहीर ही देखील तितकीच प्रसिद्ध आहे.
बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत ही विहीर बांधण्यात आली आहे
कराड शहराच्या वायव्य बाजूस पंताचा कोट हा भाग आहे जो एका टेकडीवर वसलेला आहे आणि याच भागात ही विहीर देखील उभारण्यात आलेली आहे.
या विहिरीला एकूण 82 पायऱ्या असून प्रत्येक वीस पायऱ्या नंतर एक सपाट पायरी थांबण्याकरिता बांधली गेली आहे विहिरीचे बांधकाम रेखीव असून चिऱ्याचे आहे जे चुन्यापासून घट्ट केलेले आहे.
या विहिरीची लांबी 120 बाय 90 फूट इतकी आहे.
कराड परिसरातील लोक आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून या विहिरीची देखभाल केली जाते.
कराड शहराला कोयना आणि कृष्णा नदीचा विहंगम संगम होतो जो या पंताच्या कोटालगतच आहे. बहामनी राजवटीत पंथाच्या कोटामध्ये भुईकोट किल्ला उभा केला गेला होता आता मात्र त्याचे अवशेष उध्वस्त झालेले दिसून येतात.
या विहिरीचे देखभाल आता केंद्रीय पुरातत्व विभागाकडून केली जाते त्यामुळे त्यांनी आता या विहिरीला गेट बसवलेले आहे.
अप्रतिम असे बांधकाम असलेले ही विहीर शहराच्या एका बाजूस असल्यामुळे ती व्यवस्थित रित्या सांभाळली गेलेली आहे. कृष्ण कोयना नदीचा संगम म्हणजेच प्रीती संगम हा अगदी जवळूनच गेला असल्याने या प्रीतीसंगमावर लोकांची प्रचंड वर्दळ असते या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी असल्याकारणाने व येथे मोठी बाग निर्माण केली गेली असल्याने येथे लोकांची सतत वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.
या प्रीती संगमावर आपल्याला दोन नद्या एका ठिकाणी मिळतात ते ठिकाण पहावयास मिळते . स्थापत्य कलेचा अद्भुत असा नमुना पाहण्यास कराड या ठिकाणास नक्की भेट द्यावी.
या विहिरीसोबतच आपल्याला कराड मधील प्रसिद्ध मनोरे देखील पहावयास मिळतात. पूर्वी या मनोऱ्यांना पाहण्यास आतून पाहण्याची परवानगी होती आता मात्र ती बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण हे मनोरे बाहेरूनच पाहू शकतो उंचच्या उंच असे हे मनोरे शहराच्या बरोबर मधोमध उभे आहेत आणि चांगल्या अवस्थेत आहेत.
प्रितिसंगम कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी असून मोठी बाग आहे जिथे विविध प्रकारची खेळणी तसेच बोटिंग हॉर्स रेडींग खाऊ गल्ली हे उपलब्ध आहे.
संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दी असते. सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक लोक येथे जमतात.
या ठिकाणी येण्याकरिता कराड स्टॅन्ड वरून तुम्ही रिक्षा करू शकता. या ठिकाणी रस्ते छोटे असल्याकारणाने बसेस जाऊ शकत नाही. या ठिकाणी अनेक मंदिरे देखील उपलब्ध आहेत जी अतिशय पुरातन आहेत यामध्ये कृष्णामाई चे मंदिर, हटकेश्वर कमळेश्वर मड्या मारुती ही मंदिरे आपणास पाहायला मिळतात. दिवाळीमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम या घाटावरती असतो.
कराड येथील मनोरे म्हणजेच मिनार हे अतिशय जुने म्हणजेच निजामाबाद चे बादशहा आदिलशहाच्या काळातील आहेत. याची उंची 100 ते 200 मीटर इतकी आहे.
ही ठिकाणे पाहायला नक्की कराडला भेट द्या