एका अतिप्रचंड उल्केच्या आघातामुळे निर्माण झालेला लोणार येथील जलाशय पाहण्याची उत्सुकता मला अनेक वर्षांपासून होती.
मी या ठिकाणाला मागील आठवड्यात भेट दिली आणि एक ऐतिहासिक चमत्कार पाहण्याचे समाधान मिळाले.
तलावाच्या पूर्व परिघावर तीन ठिकाणी निरीक्षण मनोरे उपलब्ध आहेत.
सरोवराच्या काठा भोवतीने जाणारा एक कच्चा रस्ता आहे त्या मार्गे आपण त्या मनोऱ्यांकडे जाऊ शकतो. परंतु अंतर मात्र बऱ्यापैकी आहे.
आपण कारचा वापर करू शकतो. परंतु त्या रस्त्यावरून एका वेळेस फक्त एकच कार जाऊ शकते.
मनोऱ्यावरून पाहिल्यावर तलावाच्या खोलीची कल्पना येते.
आश्चर्य म्हणजे तलावाच्या काठावर तीन मंदिरे आहेत.
जाण्यासाठी पाऊलवाट देखील आहे.
पण तळ्याची खोली पाहिल्यावर तिथे जाण्याचा विचार मी सोडून दिला.
त्यापैकी एका मंदिराचे दृश्य.
लोणारला जाण्यासाठी सर्वात जवळचा विमानतळ औरंगाबाद येथे एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.
जवळचे रेल्वे स्थानक परतूर हे सत्तर किलोमीटर वर आहे.
त्यामुळे स्वतःचे वाहन घेऊन लोणारला जाणेच इष्ट ठरते.
अतिशय सुंदर लेख सर. फोटोज मनमोहक आहेत. ते बघून मला तिथे भेट द्यायची इच्छा झाली. नक्कीच भेट देईन. ३६० अंशातल फोटोची स्ट्रीट व्ह्यू लिंक शेअर करायची विनंती करत आहे. या सुंदर लेखाबद्दल खूप खूप धन्यवाद @C_T .
मनोऱ्यावर किती लोकांनी एका वेळेस जावे यावर काहीच बंधन नाही.
वरच्या चौथऱ्यावर चार ते पाच व्यक्ती सहज उभ्या राहू शकतात.
परंतु, मनोऱ्याच्या पायऱ्या चढणे अतिशय कष्टदायक आहे.
पायऱ्या म्हणून प्रत्येक ठिकाणी दोन सळया वेल्ड केल्या आहेत. त्यावरून पाय सहजपणे घसरतो.
हे सर्व पाहिल्यावर निम्म्या व्यक्ती मनोऱ्यावर जाण्याचे टाळतात.
“प्रवेश अयोग्यतेचे” एक उत्कृष्ट उदाहरण.
व्यवस्थापनाने कुंडामध्ये उतरण्यास मनाई केली आहे. परंतु त्याचे कारण COVID मुळे आणलेली बंधने हेच आहे.
It is 2 to 2 and 1/2 hour journey from my hometown jalna. This place was created by a strike of meteorite has we hear from our grandparents. It is said that this lake never get dry but when we visited in 2016 at that time it was drought in maharthwada but still there was some water.
@TusharSuradkar in 2016 when we have gone it was not so peek time for tourists that time we have gone at gomukh kund people were even standing below it as it is said that it is holy water. Know don’t know if allowed or not
सर्व फोटो छान आहेत पाहुन लोणारला भेट देण्याची इच्छा होण हे सहाजिकच आहे, तुम्ही तलावाच्या काठावर तीन मंदिराबद्दल नमुद केले आहे आहे, अजून हि काहि वाट असेल तेथे पोहचण्यासाठी तर छान झाले असते, माझी उत्कंठा तिथे वाढते, असो…