Support women business through maps

#supportwomenbussinesswithmaps
#mapsforall
#localguides
#supportwomen

मागच्या महिन्यात ह्या क्लाऊड किचन मधून काही युनिक मटणाच्या डिशेस मागवल्या होत्या, त्या बद्दल पोस्ट देखील केली होती. ह्यावेळी नवीन काय तरी ऑर्डर करणार होतो

मागील काही दिवसात चिकन मटण खाऊन झाले होते त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये क्वचीत मिळणाऱ्या डिशेस त्यांना बनवायला सांगितल्या. त्या म्हणजे खाऱ्या मासळीच्या डिशेस. वाडीलांमुळे मटण, मासे, खारे मासे यांची आवड निर्माण झाली. ते पुण्यात आले की त्यांच्यासाठी मांसाहारी बेत असायचाच. मी देखील कराडला गेलो की रविवारी न चुकता मटण किंवा मासे आणलेलेच असायचे.

खालील डिशेस ताईना सांगितल्या होत्या.

#सोड्याचे कालवण: सोडे म्हणजे वाळवलेल्या कोळंबी. थोडे झणझणीत आणि घट्ट ग्रेव्ही मध्ये अगदी मुक्त हस्ताने सोडे वापरले होते. ग्रेव्ही थोडी पातळ असती तर अजून मजा आली असती. सोडे व्यवस्थित शिजले होते, जरा देखील चिवट लागत न्हवते. आवडली ही डिश.

#सुरमई खारा मासा मसाला फ्राय: खारा मासा बनवणं म्हणजे दिव्य आहे. अगोदरच खारा असलेल्या माश्याला मसाल्यांची व्यवस्थित जोड मिळाली तरच तो व्यवस्थित लागतो. ज्यांना खारट खायची सवय नाही त्यांना हे प्रकरण अवघड जाऊ शकते. हा मासा अगदी टोचून टोचून चवी पुरता घेवुन खायचा असतो. ह्यात असलेली सुरमई चे पीस चांगले होते. मसाला देखील मस्त होता. ही डिश अगदी दुसऱ्या दिवशी देखील खाल्ली.


#गावरान कोंबडीचा पांढरा रस्सा: बायको साठी हा मागवला होता. यांची खास गोष्ट म्हणजे पांढऱ्या रस्यात हे पिसेस देखील देतात. गावरान कोंबडीचा रस्सा असल्याने एकदम चविष्ट लागत होता.

एक ग्राहक म्हणून त्यांच्या जेवणाबद्दल दिलेला अभिप्राय आणि त्यावरून त्यांना मिळालेला इतर ग्राहक वर्ग आणि त्यांच्याकडून देखील झालेले कौतुक म्हणजे यांच्या मेहनती चे फळ आहे.

कोल्हापूर अँड को ला पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.

खादाड भावा: मदनकुमार जाधव

पत्ता:
Kolhapur and co
Kimaya Building, Flat Number 3, Vidhate vasti, New DP Rd, Aundh, Pune, Maharashtra 411007

https://maps.app.goo.gl/kX96QY8rsZ6GXvro8

#khadad_bhava #madankumarreview #kolhapurandco #cloudkitchen

10 Likes

@Globe_trotter_Ish my entry for #supportwomenbussiness challenge.

The story about your father and the traditions around food is powerful. It immediately makes the review more than just about the taste; it’s about memory, connection, and heritage. This is what will really resonate with readers. You’ve got a really compelling starting point. Focus on the details of the food and your personal connection to it, and you’ll have a fantastic review!