नमस्कार,
लोकल गाईड्स मित्र मैत्रिणींनो,
पुन्हा एकदा लोकल गाईड्स कनेक्ट च्या आठव्या वाढदिवसाच्या
आपणा सर्वांना भरभरून शुभेच्छा…
मीट अप च्या अगदी ५ दिवस आधी मी ठरवलं कि हा कनेक्ट चा वर्धापनदिन आपण वेगळा म्हणजे मला वाढदिवस भारतीय पद्धतीने साजरा करायला आवडतो, तसा साजरा करण्याचा जवळपास प्रयत्न करुया.
सर्वांच्या परीचयाच्या श्रीमती रोसी यांनी सहकार्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी तैयारी दाखवली, तसेच नंतर ठरवले कि आपण मयुरीला जमत असेल तर तिला हि मिट अप
मधे सामील करू घेऊ, कारण सेलिब्रेशन म्हणजे कमी लोकात मजा येत नाही.
एकत्रित पणे साजरा करण्याचे ठरवलेले खरे, पण अगदी ऐन दिवशी सकाळपासून
पावसाने धुमाकूळ घातला होता, अश्यातच केक बोरीवली ते अंधेरी रेल्वेतुन व बाकिच्या
प्रवासात नेणे शक्य नव्हते, पावसा मुळे मयुरी हि सोबत येईल कि नाही अशी शंका होती पण मयुरी अगदी ठरलेल्या वेळेत आली, आणि आम्ही मीट अप वेळेच्या अगदि थोडा वेळ आधी रोसी यांच्या कडे पोहचलो, वेळेत सर्व जुळून आले, मीट अप साठी घरून निघायच्या आधी रोसी ने मला कळवले कि, ती केक व पाणी-पुरी ची व्यवस्था करेल, आणि रोसी ने केक ब्राऊनी, पाणीपुरी बरोबर मराठमोळी गरमागरम पुरणपोळी चा हि बेत केला होता, मीट अपचे सेलिब्रेशन छान व्हावे यासाठी केलेल्या रोजच्या या सर्व प्रयत्नांना साठी खुप धन्यवाद
अश्या प्रकारे भारतीय पदार्थांमुळे व केक ब्राऊनी, फुगे, बर्थडे कॅप इत्यादी सजावटिमुळे कनेक्ट चा वाढदिवस भारतीय आणि विदेशी, अश्या दोन्ही पद्धतीचे फ्युजन साजरा झाला.
मीट अप जवळपास ३० उपस्थितांसोबत ठरलेल्या वेळी सुरू झाले,
मला खुप छान वाटत आहे, कारण हे माझ होस्ट केलेले जवळपास वर्षांनंतरचे
तसेच या वर्षीचे पहिले मीट अप होते, जे अगदी व्यवस्थित पार पडले,
मीट अप च्या वेळी मी खुप नर्व्हस झालेले, कारण माझ्या फोन मधुन काहिच नीट ऐकु येत नव्हते,
तसेच माझ्या मोबाईल मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे, माझा थोडासा गोंधळ झाला होता पण को-होस्ट @Rosykohli ने मिट अप पुढे व्यवस्थित चालू ठेवले,** @MayuriKubal **
यांच्या मदतीने आणि उत्साहि उपस्थितांनी मिट अप चांगले केले. उपस्थितानी त्यांच्या पहिल्या स्वतःच्या वाढदिवसाला काय केले, कसा वाढदिवस साजरा केला या अनुभवाने मिट अप ची वेळ छान रंगली.
कनेक्टच्या आठव्या वाढदिवसाच्या या सेलिब्रेशन साठी भर पावसात रोसीच्या मुलानी
छोटासा का होईना केक / ब्राऊनी शोधून आणला, त्या बद्दल त्याचे धन्यवाद,
तसेच रोसी च्या मदतनीस च्या मुलाने पाणीपुरी व त्याला लागणारे पदार्थ घेऊन आला
त्याचे हि धन्यवाद.
तुम्ही सर्व हि वर्चुअली शामिल झाल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
पार पडलेले मिट अप माहिती
तारीख :- शनिवारी ३ ऑगस्ट २०२४
वेळ:- संध्याकाळी ५ ते ५.४५
होस्ट : श्रृति @Shrut19
सोबत : रोसी कोहली @RosyKohli
कनेक्ट चा वाढदिवस सेलिब्रेशन उपक्रम - काशिफ मिसिदिया** @KashifMisidia **
**फोटो कोलाज - @Shrut19 **& फोटो क्रेडिट - Ajit Thite, Mayuri, Gurshin, Rosy, TravelerG (Meetup Attendees)
लींक Photo’s - Recap Connect’s 8 Birthday Celebration - Mumbai
अजेंडा होता **फक्त सेलिब्रेशन (**जे तुम्ही फोटो लिंक मध्ये पाहु शकता)
तुम्हा प्रत्येकाला किती वर्षे झालीत कनेक्ट जॉईन करून ?
तेहि जाणुन घ्यायला मला नक्की आवडेल ,तेव्हा कमेंट वर सांगायला विसरू नका.