खोजा नाईकांचा किल्ला
Location:-
https://maps.app.goo.gl/NDuj3e5rdxAR9YcP9
नस्तनपुर या गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे., एक या ठिकाणी असलेले प्रभू श्रीराम स्थापित शनिदेव मंदिर आणि दुसरे म्हणजे राजा खोजा नाईक यांचा किल्ला…
खोजा नाईक हे एक आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होते.,
खोजा नाईक हा राजा समाजाने भिल्ल होता आणि या ठिकाणी भिल्ल समाजाची वस्ती खूप मोठ्या प्रमाणात होती.,
खोजा नाईकाची गोष्ट अशी सांगतात की हा सुरूवातीला शेती करत असे एकदा शेती करत असताना त्याच्या नांगराला परिसाचा स्पर्श झाला आणि त्याचं नांगर पूर्णपणे सोन्याचं झालं आणि यामुळे त्याला खूप आनंद झाला
टीप :- (परिस म्हणजे अशी वस्तू जीचा कोणत्याही गोष्टीला स्पर्श झाला तर ती सोन्याची होते.)
त्याच्याकडे अमाप संपत्ती निर्माण झाल्याने त्याने स्वरक्षणासाठी एक प्रशस्त आणि मोठा भुईकोट किल्ला बांधला या किल्ल्याला त्याने चारी बाजूंनी भक्कम असा कोट बांधला.
त्याला आपल्या किल्ल्यावरून दिल्लीचा दिवा बघण्याची इच्छा होती यासाठी त्याने आपला किल्ला उंच आणि भक्कम बनवलेला होता.
त्याच्याकडे असलेल्या अमाप संपत्तीचा इंग्रजांना संशय आला आणि त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी आपल्या फौजा पाठवल्या पण इंग्रजांना तो कधीही सापडला नाही.,
त्याने आपल्या पराक्रमाने आणि शौर्याने इंग्रजांशी सतत संघर्ष केला आणि आपल्या आदिवासी समाज स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले.,
एकदा इंग्रजांनी त्याचा खूप पाठलाग केल्यावर त्याने किल्ल्यातील एका विहिरीमध्ये आपल्या बायको व मुलांसह त्याचप्रमाणे सर्व संपत्तीसह घोड्यावरून विहिरीत उडी घेतली व इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन खुजा राजा पसार झाला असं सांगतात नंतर इंग्रजांनी ती विहीर बघितली असता इंग्रजांना त्या विहिरीत एक मोठे भुयार आढळले त्या विहिरीची उंची 12 खाटांचे सुंभ म्हणजेच 12 खाट विणायला जितका दोर लागेल इतकी खोल आणि लांब होती.
यानंतर खुजा राजा कुठे गेला हे कुणालाही माहिती नाही राजाच्या नंतर या किल्ल्याची दुरावस्था झाली आणि आज आपल्याला या किल्ल्याची दुरावस्था बघायला मिळते.
या किल्ल्याच्या सुरुवातीला श्री गणेशाचे एक छानसे मंदिर आहे जे खोजा नाईकाने दर्शनासाठी म्हणून बांधले होते.,
या किल्ल्याचा परिसर अतिशय शांत आहे., हा किल्ला जवळपास नऊ एकर क्षेत्रामध्ये दक्षिण उत्तर पसरलेला आहे.
ऐतिहसिक वारसा लाभलेले महाराष्ट्रात अनेक लढवय्ये होऊन गेले त्यातील एक राजा खोजा नाईक हे देखील होते.
- कसे पोहचाल:-
- नाशिकहून मनमाडमार्गे चाळीसगावला जाताना नांदगाव ओलांडल्यानंतर महामार्गाला लागूनच नस्तनपुर नावाच एक छोटेसे खेडे गाव आहे.,
- याठिकाणी तुम्ही खाजगी वाहनाने किंवा रेल्वे किंवा बसने देखील येऊ शकता.
तुम्हाला खोजा नाईकाची ही गोष्ट माहिती होती का…??Let meknow in the comment…
भेटूया परत एका अशाच पोस्ट मधून तोपर्यंत धन्यवाद…