Quick Hack - How I am translating the names of POI in local language quickly?

माझ्या सर्व एलजी मित्रांना नमस्कार,
आज आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन (आयटीडी) आहे. भाषेचा अडथळा येऊ नये यासाठी Google द्वारे बरेच उपयुक्त साधन आहे आणि ते भाषांतर आहे. जी वेबवर तसेच मोबाईलवरही खूप उपयुक्त आहे. गूगल नकाशे भाषेतील अडथळ्यांपासून मुक्त आहेत. आपण ज्या नकाशेमध्ये आरामदायक आहोत त्या भाषेची निवड करू शकतो.
म्हणूनच, आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन (आयटीडी) २०२० च्या निमित्ताने मी आपण परिचित असलेल्या स्थानिक भाषेमध्ये भाषांतर साधन वापरुन आपल्या आवडीच्या जागेचे नाव मोबाइलवर कमी वेळात कसे अनुवादित करावे हे सामायीक करीत आहे.

त्यासाठी तुमच्या मोबाईलवर खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.

  1. फोनवर स्थानिक भाषा सेट करा. मी मराठीला सेट केले.
    २. भाषांतर ऍप स्थापित केलेला असणे आवश्यक आहे.

अनुवाद करण्यास किती वेळ लागेल?
उत्तरः 30 सेकंदांपेक्षा कमी. अर्थात, आपण स्थानिक भाषेसोबत फारच चांगले familiar असले पाहिजे.

ते कसे करावे?

  1. पीओआय निवडा.
    २. एक संपादन सुचवा यावर क्लिक करा
    ३. तुम्हाला पीओआय चे इंग्रजी नाव दिसेल आणि खाली तुम्हाला निवडलेल्या स्थानिक भाषेत नाव जोडण्यास सांगितले जाईल. मी मराठी भाषा सेट केल्यावर “मराठीत नाव जोडा” असा संदेश मराठी भाषेत दिसतो.
    ४. पूर्ण शब्दावर दाबून संपूर्ण इंग्रजी शब्द निवडा.
    ५. शब्दाच्या निवडीनंतर तुम्हाला सर्व सिलेक्ट, कट, पेस्ट आणि ट्रान्सलेशन असे पर्याय मिळेल.
    ६. भाषांतर वर क्लिक करा.
    ७. भाषांतर अ‍ॅपचा छोटा पॉप अप बॉक्स येईल जिथे आपण स्थानिक भाषेत निवडलेल्या शब्दाचे भाषांतर पाहू शकाल. आपण दुसर्‍या भाषेत शब्द पाहू इच्छित असल्यास तेथे आपण भाषा देखील निवडू शकता.
    ८. उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स वरती क्लिक करून तुम्हाला भाषांतरित शब्द कॉपी करण्याचा कॉपी पर्याय मिळेल. ते कॉपी करा.
    ९. त्यानंतर स्थानिक भाषेत नाव जोडण्यास सांगितलेलया दुसऱ्या ओळीत पेस्ट करा.
    आणि नंतर सबमिट करा.

आपण पत्त्याचे भाषांतर देखील करू शकता. पण माझ्या मते आम्ही एका वेळी एक संपादन केलेच पाहिजे. आपण एकाच वेळी एकाधिक संपादने केल्यास, संपादनांपैकी एक नाकारल्यास सर्व संपादने नाकारण्याची शक्यता आहे.

हि प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजावी या करीता मी प्रक्रियेचा स्क्रीन व्हिडिओ बनविला आहे जो खालील प्रमाणे आहे.

अश्याच प्रकारे डेस्कटॉप वर सुद्धा कमी वेळेत असे भाषांतर करता येते. त्या साठी translate चे क्रोम एक्स्टेंशन इन्स्टॉल करावे लागेल. आणि अश्याच प्रकारे भाषांतर जलद गतीने करता येईल. आणि तसेच सार्वजनिक जागेंची नाव शक्यतो काळजीपूर्वक भाषांतरित करावी. त्यामध्ये आपल्याला थोडे टाईप करावे लागू शकते.

मला आशा आहे कि ही पोस्ट आपणास उपयोगी वाटेल व आपण आपल्या स्थानिक भाषेचा वापर मॅप्स वरती कराल जेणेकरून प्रत्येकाला मॅप्स चा वापर चांगल्या रीतीने करता येईल.

धन्यवाद

18 Likes

नमस्कार रोहन @Rohan10

अतिशय सुरेख लिहिला आहेस लेख - इंग्रजीत short and sweet म्हणतात तसा आणि to-the-point :+1:

या स्टेप्स वापरून सहजरित्या स्थानिक भाषेचा वापर लोकल गाईड्स करू शकतील आणि कनेक्ट तसेच मॅप्स वर गुणांचा वेग सशा :rabbit2: वरुन चित्या :leopard: प्रमाणे होईल यात तिळमात्र शंका नाही.

आणखी एक उपयुक्त आणि बहारदार लेख लिहिल्याबद्दल अनेकानेक आभार :pray:

4 Likes

@Rohan10

एका उपयुक्त लेखाबद्दल अभिनंदन.

गूगल ट्रान्सलेट बऱ्याच प्रमाणात यशस्वी रित्या भाषांतर करते.

परंतु स्वयंचलित भाषांतरालाही काही मर्यादा येतात. त्यामुळे होणाऱ्या भाषांतरावर एक नजर टाकून त्यानंतरच सबमिट करणे योग्य ठरते.

ता. क. लेखमधील सर्व मजकुराचे इंग्रजी भाषांतरही तंतोतंत होत आहे. त्याबद्दल विशेष अभिनंदन

6 Likes

छानच मित्रा @Rohan10 !!

खूप सोप्या भाषेत सविस्तर लेख व त्यासाठी व्हिडिओची मदत असल्यावर बहुतेकांना चांगली मागत होईल; नवोदितांना तर नक्कीच होईल. @C_T नी सांगितलेले बारकावे पण लक्षात ठेवले तर अजून सोप्पे होईल. :pray:

धन्यवाद !

4 Likes

खूप बारकाईने लिहिलेली एक उत्तम पोस्ट @Rohan10 मला अजूून एक पर्याय सुचवावासा वाटतो तो म्हणजे Google voice typing. हा पर्याय वापरून मी अनेक संपादने खूप सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकले. मात्र @C_T यांनी म्हटल्याप्रमाणे एकदा नजरेखालून घालून मगच सबमिट करायचे.

6 Likes

@Rohan10

खरंच अप्रतिम माहिती आहे मी भाषांतर करून बघितले सहज होते आणि त्यामुळे एडिट पण जलद होतात.

4 Likes

Hi @Rohan10

It is not often that automatic translation into English works perfectly. But your text came out perfectly. Did you test and adjust to help it along?

In my experience translation of names is not so easy. Normally I would check if the business has a relevant language version of their website. And then copy the name from there. Or do some other kind of quality control.

Cheers

Morten

3 Likes

@MortenCopenhagen

आपली टिप्पणी आवडली.

दुर्दैवाने, बहुतेक पीओआय त्यांची नावे फक्त इंग्रजीमध्येच नोंदवतात.
तसेच ही सर्व विशेष-नामे असल्यामुळे मजकूर फक्त देवनागरी लिपीत रूपांतरित करण्यापलीकडे पर्याय उरत नाही.
तथापि, सार्वजनिक किंवा सरकारी संस्थापनांची नावे अनुवादित करताना आम्हाला थोडेसे स्वातंत्र्य मिळू शकते.

कोणत्याही लेखाच्या मराठी स्क्रिप्टच्या इंग्रजी भाषांतरातील अचूकते बद्दल, आम्ही ते गूगल भाषांतर मध्ये पूर्व निर्धारित करू शकतो. मला वाटते
@Rohan10
ते तंत्र वापरले आहे.

3 Likes

@Rohan10 khup chaan lekh lihila aahes tu. Abhinandan ! Video mule ajun clarity miltiye! Dhanyawaad !

3 Likes

धन्यवाद @TusharSuradkar तुला ही पोस्ट उपयुक्त वाटली मला आनंद झाला.

हो हे खरे आहे की याचा वापर करून पॉइंट्स चा वेग खूप जास्त होईल. पुन्हा एकदा धन्यवाद मित्रा…

1 Like

धन्यवाद @C_T सर… तुमच्याकडून शिकत

आहे. तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. अजुन खुप काही शिकायची इच्छा आहे. तुमच्या आशादायी प्रतिक्रिये मुळे मला फार आनंद झाला. आणि अजुन अश्या पोस्ट लिहायची इच्छा निर्माण झाली. आपले मनापासून खूप खुप धन्यवाद सर…आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो.

1 Like

धन्यवाद @AjitThite दादा. अगदी बरोबर. थोडे लक्ष देऊन आणितपासून केले तर उत्तम. पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. पण तरी सुद्धा ९५% तरी काम सोपे होतेय. आपण दिलेल्या चांगल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार… :blush: :pray:t2:

2 Likes

धन्यवाद @MayuriKubal आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल व सुचवलेल्या अजुन एका चांगल्या पर्यायबद्दल. मी नक्कीच वापरून बघेन. हो भाषांतर तपासूनच सबमिट करावी जेणेकरून मॅप वर चुकीची माहीत जाऊ नये. हे खूप महत्त्वाचे आहे. आपले पुन्हा मनःपूर्वक आभार.

2 Likes

धन्यवाद @mohanghyar … आपला अभिप्राय वाचून बरे वाटले आणि आपण भाषांतर करत आहात हे वाचून पण आनंद झाला. खूप खूप आभार…

1 Like

Yes @MortenCopenhagen sir. You have said right. But as @C_T sir mentioned here most of the buiseness are registered in English. So we are getting more than 98% correct result while translation. And I always take care before submitting and always translate public places like government offices, hospitals as per pure local language. But till now i did not find difficult in this method. I like and appreciate your feedback sir :blush: . Thanks a lots for giving the feedback and took you valuable time to read my post. Many thanks. Cheers…

2 Likes

हॅलो @Globe_trotter_Ish

माझी पोस्ट उपयुक्त वाटली हे जाणून मला आनंद झाला. तुम्ही दिलेल्या चांगल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. :blush: :pray:t2:

1 Like

@Rohan10

मॅप्सवर मराठी नावे सामील करण्याचे चालू केल्यापासून बँका व सरकारी कचेर्यापासून दूर राहिलो आहे.

केवळ खासगी बिजनेस, त्यातही लहान नावे असलेले :grin: अशांचेच नाव सध्या मराठीत टाकण्याकडे कल आहे.

मोठी आणि संदिग्ध नावे बदलणे वेळखाऊ ठरते.

3 Likes

होय @TusharSuradkar मी सुद्धा बँक च्या स्थळाला संपादने ही सुचवत नाही. कारण ते मंजूर होत नाही. जे संवेदनशील स्थळ आहेत तिथे कदाचित असे होत असावे असे मला वाटते.

1 Like

नमस्कार…

धन्यवाद भावा…

** @Rohan10 **

मराठी भाषिक व मुळ भाषिकांला अनुकरणीय लोकल गाईड्स साठि हि तुझी हि पोस्ट उपयुक्त ठरेल…

2 Likes

नमस्कार ताई … तू दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद @Shrut19 .

2 Likes