It's family dinner time हाॅटेल वामन द ओरिएंट क्राऊन

बऱ्याच वेळा रविवारचा दिवस हा आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स एकत्र घालून मग त्या दिवशी एखाद्या नवीन हॉटेल किंवा रेस्टॉरंट आम्ही निवडतो. आज आम्ही ज्या हॉटेलला गेलो होतो त्याचं नाव आहे वामन द ओरिएंट क्राऊन. या हॉटेलच्या नावातच फिश म्हणजे माश्याचे चित्र काढले असल्याने आपल्याला अंदाज आलाच असेल की या ठिकाणी मासे हे मिळतात आणि अगदी बरोबर त्याप्रमाणेच येथे मासे हे मुख्य अन्न बनवले जाते.वामन या नावातच मासा तयार करण्यात आल्याने या ठिकाणी मासा मिळतो हे प्रथमदर्शनी पाहताच कळते.



हॉटेलचे मालक हे कोकणी असल्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये माशाचे टॅंक बनवून घेतले असून त्यामध्ये विविध प्रकारचे मासे सोडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लहान मुलांसाठी एक आकर्षणाचा भाग येथे उभा करण्यात आलेला आहे. तसेच उपलब्ध माशांचे प्रकार या ठिकाणी एका कोल्ड स्टोरेज मध्ये दर्शनी भागी ठेवल्यामुळे तुम्हाला कोणता मासा निवडायचा हे कळते.
प्रशस्त असा ॲम्बिअन्स असून तुम्हाला आउटडोर किंवा इंडोअर असे दोन सेक्शन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही आरामात बसू शकतात.
तसेच येथे कराओके संगीत उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही गाणे ऐकत ऐकत जेवण करू शकता.

या ठिकाणी माशा सोबतच तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज पद्धतीचे जेवण मिळवू शकता. तसेच येथे बार फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडते ड्रिंक सुद्धा जेवणासोबत घेऊ शकता.
या ठिकाणी थाळी सिस्टीम सुद्धा उपलब्ध आहे.
स्टार्टर मध्ये देखील विविध प्रकारचे कबाब तंदूर येथे उपलब्ध आहेत.
प्रशस्त अशा ठिकाणी आपण आरामात जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
या ठिकाणी उत्तम अशी वॉशरूमची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
:wheelchair::wheelchair: व्हील चेअर ऍक्सेसिबिलिटी मात्र या ठिकाणी उपलब्ध नाही मात्र विकलांग लोक येथे येऊ शकतात. प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हॉटेल हे रोड साईडला असल्याकारणाने झटपट सापडण्यास मदतही होते. कोल्हापूर स्टँडवरून किमान दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे हॉटेल आहे. या ठिकाणी लॉजिंग असल्याकारणाने राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. समुद्रकिनाऱ्याची ताजी मच्छी खायची असेल तर नक्की या हॉटेलला भेट द्या आणि सागर किनाऱ्याची चव चाखा.

23 Likes

@Supriyadevkar the food looks yummy

1 Like

Food looks tempting :yum:

1 Like

@Supriyadevkar
Eine sehr gute Information zur diesem Restaurant im Hotel und die Bilder zeigen leckeres Essen.:+1:

Yes @Annaelisa it’s very tasty and yummy food.

1 Like