#Chai pe Charcha challenge
Sustainiblity challenge
@KKShrma
हे चॅलेंज सुरू झाल्यापासून बाहेरचा चहा पिणे माझे खूप वाढले आहे. आजचे एक स्पेशल ठिकाण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जिथे चहा तर छान मिळतोच पण छान ॲम्बिअन्स देखील इथे उपलब्ध आहे.
‘चल यार चाय पिला’ ही शर्टावरील टॅग लाईन मला फार आवडली. टि पोस्ट या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय स्वच्छ असा परिसर आणि अगदी सुंदर रित्या मांडलेली टेबल्स आणि अवतीभवती असणारी झाडी हे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं.
ऑर्डर देण्यासाठी गेल्यानंतर तिथे मी दोन लोगो पाहिले जे मला प्रचंड आवडले त्यामधला पहिला लोगो होता रॉबिनहूड आर्मी चा .ज्यामध्ये ”अन्नाचा आदर करा अन्न वाया घालवू नका” असे प्रबोधन या ठिकाणी केले गेले आहे जे सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाचे आहे.
सोबतच इनर विल क्लबचा देखील एक बोर्ड या ठिकाणी लावला होता ज्यामध्ये पाणी वाचवा अन्न वाचवा असे लिहिले होते. खरोखरच या बोर्डची आज गरज आहे आपण घेतलेल्या अन्न देखील पूर्णपणे संपवत नाही आणि नंतर मग ते फेकून दिले जाते त्यापेक्षा जेवढे संपणार आहे तेवढीच मागणी जर आपण केली तर भरपूर अन्न शिल्लक राहील आणि वाचेल देखील.
मी आणि माझं पार्टनर माझा नवरा आम्ही दोघे या ठिकाणी अतिशय निवांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा चहा घेत होतो खरोखरच हे ठिकाण अतिशय सुंदर आहे आणि मनाला शांती देणारे आहे. शहराच्या धकाधकीच्या वातावरणात अशी शांत ठिकाणी असणं आवश्यक आहे.
टि पोस्ट या दुकानात त्यांनी आपली जाहिरात करताना आपनी चाय की दुकान अशी जाहिरात त्यांच्या फ्रिजवर तयार करून घेतली आहे आणि ती इतकी सुंदर आहे की पाहता क्षणी प्रेमात पडतो.
या ठिकाणी चहा सोबत इतर खाद्यपदार्थ दिले जातात त्यासोबत स्टील कटलरी वापरली जाते तसेच मॉकटेल ज्युसेस सोबत कागदी पाईप्स ज्यूस पिण्यासाठी दिल्या जातात.
या ठिकाणी पेपर कपचा वापर केला जातो चहा देताना देखील त्यांनी दोन प्रकार ठेवले आहेत ज्यामध्ये रेग्युलर चहा जो दीडशे एम एल असून मोठा कप हा 250ml चा आहे म्हणजे ज्याला जास्त चहा प्यायचा आहे तो मोठा कप घेऊ शकतो. तेव्हा ऑर्डर करताना तुमची ऑर्डर रेगुलर चहाची आहे की मोठ्या कपची आहे ते नक्की सांगा.
खाली दिलेल्या मेनू कार्ड मध्ये तुम्ही चहाचे वेगवेगळे प्रकार ऑर्डर करू शकता.
हे ठिकाण माझ्या घराजवळ असून मी खूप दिवस झाले या ठिकाणी जाण्याचा विचार करत होते मात्र तसा योग येत नव्हता कारण टि पोस्ट म्हणजे चहा नक्कीच असणार हे ठाऊक होतं पण फक्त चहा पिण्यासाठी एवढ्या चांगल्या जागी जायचं हा विचार मी केला नव्हता मात्र गणपतीच्या खरेदीसाठी गेल्यानंतर परत येताना चहा पिण्याची खूप इच्छा झाली आणि म्हणून हा चान्स मी घेतला.
तुम्हाला देखील टी पोस्ट या ठिकाणी जायचे असेल तर खाली दिलेल्या मॅपचा नक्की वापर करा.