काकणबर्डी…

खंडेरायाच वास्तव्य असलेलं हे ठिकाण एका उंच टेकडीवर आहे…

Location :-
काकणबर्डी
बर्डी म्हणजे डोंगरावरची उंच जागा आणि येथे येऊन देवानं काकण सोडले म्हणून… काकणबर्डी…अस या ठिकाणाला म्हणतात…
- या ठिकाणाला काकणबर्डी…
हे नाव कसे पडले…,
:-
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांनी बानुबई सोबत लग्न करून इथे येऊन आपले काकण सोडले होते असे सांगतात…म्हणून या ठिकाणाला काकणबर्डी असे नाव पडले.
तेव्हापासून इकडे अशी प्रथा आहे…की नवविवाहित वधु-वर इथे येऊन देवासमोर आपले काकण सोडतात…देवाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात… 
आधी कच्च्या आणि उंच चढाव असलेल्या रस्त्याने इथे जावे लागायचे आता मात्र इथे छान पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत…,
जेणकरून लोकं सहजपणे वर जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकतील… मंदिराच वातावरण विशेष करून पावसाळ्यात अतिशय सुंदर वाटत… आजूबाजुची सुंदर हिरवळ उंचावरून बघायला खूप छान वाटते…
- या ठिकाणी जाण्याचा मार्ग :-
काकणबर्डी हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात येते.
नविन माणसालाही या ठिकाणी पोहोचणं सोप आहे…, गिरड- पाचोरा
रोडवरच हे ठिकाण आहे…जवळच येथे धरण आहे…आजूबाजूला शेतजमीन आहे म्हणून परिसर छान वाटतो.
तुमच्या या प्रवासात बाइक
असेल तर प्रवासाचा छान आनंद तुम्हाला घेता येईल…त्याशिवाय खाजगी
वाहन असेल तर तेही खूप सोयीचे होईल.
… यळकोटयळकोट जय मल्हार… 
I hope ही post वाचून तुम्हा सर्वांना आवडली असेल…लवकरच अशीच नवीन post घेऊन येईल… तोपर्यंत धन्यवाद…

22 Likes
Thanks @Shubhu1
For sharing such a virgin beauty of holistic and historical importance.
Really i was not knowing about it.
Even after spending 15 years in maharashtra.
Keep shairing such unique and hidden gems
Regards
Anil
5 Likes
खुप छान, @Shubhu1 सुंदर वर्णन वाचून खूप छान वाटल.
यळकोट यळकोट जय मल्हार

5 Likes
अतिशय सुंदर माहिती @Shubhu1
उत्तम प्रकारे मांडली आहेस.
छायाचित्रे पण छान आहेत.
4 Likes
खूप छान माहिती, आपल्या कडच्या लग्नातला हा शेवटचा विधी असतो, कंकण किंवा काकण सोडणे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे लग्नविधीची सांगता होते असे म्हणतात. त्यात खंडोबा रायाच्या लग्नाचे काकण इथे झाल्यामुळे खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.
बरीचशी माहिती प्रथमच वाचतोय त्यामुळे ज्ञानात भर पडतेय, अशीच छान छान माहिती देत रहा, @Shubhu1 . धन्यवाद.
4 Likes
@Shubhu1
Sehr gut erklärte Tempelanlage und die Bilder zeigen es sehr schön
4 Likes
@Shubhu1 no sabía la verdad de eso, gracias por compartir.
3 Likes
@Maximilianozalazar thank you max for like my post …

2 Likes
Que interessante sua postagem @Shubhu1 . Aqui em Pindamonhangaba tem um templo que me lembrou muito o demplo que você descreveu. Fica na Fazenda Nova Gokula, é o templo de Hare Christna.Um local muito agradável em contato com a natureza que traz muita paz espiritual.
Minhas saudações de felicidade e paz!
4 Likes
@rosanabtl
Es ist eine Übereinstimmung bei den Ansichten und sieht auch sehr schön aus
4 Likes
@Annaelisa Thank you Anna…

2 Likes
It feels very nice to see this place in the photos, and read the story behind the tradition.
Very well written post @Shubhu1 
The best part are the steps to reach the temple, very convenient.
3 Likes
Hi @Shubhu1
Please edit your post and change rhe topic from Local Stories to Travel.
3 Likes
छान फोटो आणि वर्णन आहे.
धन्यावाद! @Shubhu1
येथे भेट द्यायला नक्कीच आवडेल.
2 Likes