Madankumarj's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 7

Exploring sea food at Hotel Adhiraj

20240412_221354.jpg

 Surmai thali

20240412_221430.jpg

 look at surmai slice size

 

ह्या रेस्टॉरंटच्या पोस्ट्स मागे पाहिल्या होत्या, जाऊ जाऊ म्हणत जवळपास 4/5 महिन्यांनी मुहूर्त आला. अगदी उशिरा प्लॅन ठरल्याने इथे पोहचे पर्यंत 9.30 वाजले होते.

जास्त वेळ न घालवता लगेच ऑर्डर दिली. ऑर्डर यायला तसे 15-20 मिनिटे गेली. सी फूड मिळणाऱ्या रेस्टॉरंटला एवढा वेळ लागतो हे गृहीत धरलेले आहे.

सुरमई फ्राय थाळी: ()
एक भला मोठा सुरमई फ्राय चा पीस, कोळंबी करी, सुकट, सोलकडी, तीवळ, चपाती किंवा भाकरी चा पर्याय आहे. जवळपास 20 सेमी लांब असेल. सुरमई फ्रेश होती, अगदी ओलं खोबरंच. मनसोक्त सुरमई खाल्ली. फिश करी मला जास्त आवडत नाही, इथे कोळंबी करी असल्याने प्रश्न सुटला होता. ही करी आवडली. सुकट मस्त होती पण फार कमी होती, 2 घासात फिनिश. सोलकडी छान. तीवळ फार कमी ठिकणी देतात, ज्यांना किक पाहिजे त्याच्यासाठी मस्त आहे. थाळी मध्ये असलेल्या चटण्या भारी होत्या. सुरमई फ्राय बरोबर मस्त लागल्या.

20240412_221836.jpg

 mutton thali

मटण थाळी:
इथं बोकडाचे मटण मिळत असल्याने हिने तिच्या साठी ही थाळी घेतली होती. आळणी सूप,तांबडा रस्सा, मटण मसाला, खर्डा. मटण मसल्या मध्ये भरपूर पिसेस होते 8/9 पिसेस तरी होते.
आळणी सूप एकदम साधारण वाटलं, जाताना मालकांना ह्याचा फीडबॅक दिला. तांबडा रस्सा छान होता. मटण मसाला देखील भारी होता. पिसेस व्यवस्थित शिजलेले आणि सिलेंक्टेड वाटत होते. खर्डा ताजा ताजा बनवलेला होता, मस्तच.

सोलकडी चांगली लागल्याने एक ग्लास जास्तीची घेतली. तिथल्या फ्रीज मध्ये काय तरी डेझर्ट दिसत होतं त्याच्यावर रिधी चे आल्यापासूम लक्ष होतं. जेवण झाल्यावर बिल द्यायला जाताना शेवटी तिने घ्यायला लावलेच. बिलात बघितलं तेव्हा त्याच नाव कळलं सेराडुरा असं काय तरी आहे, आणि गोवा मध्ये मिळतं असे कळले. घरी पोचल्यावर खाऊन बघितले थोडे मस्त लागलं. चव छान आहे पण त्याची किमंत थोडी जास्त वाटली.

बाकी सगळं जेवण चांगलं लागलं. 8/10 टेबल्स आहेत, आम्ही गेलो तेव्हा सगळ्या फॅमिलीच होत्या.

परत चक्कर होईल.

खादाड भावा: मदनकुमार जाधव

पत्ता: Hotel Adhiraj

ground floor, rasik lodge, 787, 8, Bhandarkar Rd, behind new PALLOD showroom, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

https://maps.app.goo.gl/X1dn18u1og5oKLi29

#khadad_bhava #madankumarreview #positivereview #adhiraj #seafood #surmai

1 comment
Level 9

Betreff: Exploring sea food at Hotel Adhiraj

@Madankumarj 

Diese Gerichte sehen alles sehr gut aus