विजयादशमी vijyadashmi (दसरा) निमित्त होणारी आतिषबाजी

कवठे एकंद : महाराष्ट्राच म्हैसूर,

सांगली- तासगाव मेन रोड वर, सांगली पासून १७ km आणि तासगाव पासून ५ km आंतरवर वसलेले गाव, जेमतेम १५ ते २० हजार लोकवस्ती, तरी ही शोभेच्या आतिषबाजी साठी देशभरात प्रसिद्ध. गावातील हिंदू, मुस्लिम, गावातील प्रत्येक गावकरी अगदी लहाना पासून ते थोरा पर्यन्त हा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडतो. या मध्येच सामाजिक एकता दिसते. ज्यांना म्हैसूरचा दसरा आणि त्यानिमित्ताने होणार शोभेचे दारूकाम बघण्यासाठी या गावाला आवश्य भेट देतात. दरवर्षी विजयादशमीच्या रात्री हे गाव आतिषबाजीने उजळून निघते.

महाराष्ट्रात गणेशोत्सव,नवरात्रोत्सव ज्या उत्साहाने पार पडतो, अगदी तसच इथ विजयादश्मीसाठी अवघ गाव नवरात्रोत्स्वापासूनच तयारीला लागलेल असतं. या गावा मध्ये ही परंपरा २०० वर्ष्यापासून सुरू आहे. गावातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आतिषबाजीसाठी लागणारी शोभेची सर्व दारू गावातच बनवली जाते. रुई, शेवरी, चुना पावडर, हरताळ, विविध रंगाचा खार, हजार स्फोटकं असं साहित्य वापरुन शोभेची दारू बनवली जाते. मिश्रणातील प्रत्येक घटकाचा वेगळेपणा गुपित ठेवला जातो. संशोधन करत हे प्रमाणाचं रहस्य गुपित ठेवलं जातं. शोभेची दारू काम करणार्‍या मंडळातील ज्येष्ठ व्यक्ति किंवा म्होरक्या यांच्या कडे हे प्रमाणाचे शास्त्र असतं, त्याला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं, तो गोलंदाज आपल्यातील .

गावातील रस्त्याच्या एका बाजूला तीन फुटाचे खड्डे काढले जातात, ग्रामपंचायत कडून प्रत्येक मंडळाला जागा नेमून दिलेली असते त्याच ठिकाणी खड्डे काढून त्यावर मंडळाचे नाव लावले जाते. चार फुट लांबीचा चिंचेच्या झाडाचा बुंधा कापून त्याला चार इंच व्यासाचे आरपार होल पाडून त्यात करलाच्या मातीचा दट्ट्या मारला जातो . त्यात लकडी मुसळाने शोभेची दारू ठासून भरली जाते. लाकडी शिंगाट याला गावातील लोक शिंगाट असे संबोधतात. शिंगाट भरल्यानंतर ही शिंगट त्या खड्ड्यात उभी केली जातात .शिंगटातून निघणारी ज्वाला किंवा जोत ही ३ ते ४ फुटाची असते व त्यापासून तयार होणारा पिसारा १५० ते २०० फुट वर जातो . गावातील लोक याचा आवाजाचा आंदाज घेवून पिसर्‍याच्या खाली आनंदाने नाचतात. काही शिंगटाचा आवाजाचा दरारा इतका असतो की आवाज ऐकून गावातील लोक शिंगाटा जवळ जाण्याचं धाडस देखील करत नाहीत तसेच याच्या अवजावरून आणि पिसर्‍याच्या ऊंची वरुण शिंगाट कोणत्या मंडळाचे आहे हे अचूक सांगतात.

औट प्लॅस्टिक चा चेंडू पासून औट तयार केला जातो. पहिला जुनी लोकं नारळाच्या कवटी पासून औट बनवायचे, औट हा ३ इंच पासून १२ इंचे पर्यन्त असतो. हा आकाशात भिरभिरत जाऊन फुटतो अन् रंगीबिरंगी तुषाराचे मनमोहक चित्र बघायला मिळते . डिस्को, सोनेरी झाड, कारंजे, सुदर्शन चक्र, फुगडी, मोर, स्वागत कमान, धबधबे, भारताचा नकाशा, गेटवे ऑफ इंडिया, चांद्रयान, ढगफुटी देखावा. अमेरिकेतील र्वल्ड ट्रेड सेंटरचा नजारा आतिषबाजीतून थेट आकाशात दाखविण्याची किमया या गावकर्‍यांच्या हाती आहे. यातील एक ही फटाका कुठल्या कंपनीचा नाही, स्वत: तयार करतात. लहान मुलापासुन ते ज्येष्ठापर्यंत सर्वच हिरीरीने सहभागी होतात. दांडपट्टा आणि पत्रीबाण (रॉकेट)

मंदिर दसर्‍या दिवशी गावाचे आराध्य दैवत मानल्या जाणार्‍या सिद्धराज/बिर्‍हाडसिद्ध व नक्षत्रस्वामी यांची पालखी काढली जाते. पालखी रात्री ९ वाजता मंदिरातून निघते व बस स्टँड जवळ येते, या ठिकाणी आपटा पूजन केले जाते व इथून पालखीची सुरुवात होते,व गावाच्या मेन रोडवरून रात्रभर ही पालखी मिरवणूक सुरू असते. रात्री ९ वाजले पासून सकाळी ८ वाजेपर्यंत पालखीच्या समोर डोळ्याचे पारणे फेडणारे नयनरम्य आताषबाजी पहायला मिळते . येथील सदाशिव माळी नावाच्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तयार केलेले औट फुटल्यावर त्यांचं स्वत:चं नाव आकाशात झळकायचे. मात्र त्याच्यासोबत ही कलाही संपल्याच ग्रामस्थ सांगतात. भारताचे पहिले लष्करप्रमुख जनरल करिअप्पा यांनी हे काम पाहून काही लोकांना शोभेची दारू बनवण्याचा परवाना मिळवून दिल्याचं संगितले जाते. दरवर्षी देशांतर्गत विविध घटनावर आधारित देखावा आकाशात बघण्यास मिळतो. या गावात दोन मंडळ एकमेकासमोर आली की हर हर अशी आरोळी मारतात.दसरा 18-19

पण यावर्षी कोरोंना मुळे हा पालखी सोहळा रद्द केला आहे**,** यावर्षी आताषबाजी पाहता येणार नाही.

17 Likes

कवठे एकंद : महाराष्ट्राच म्हैसूर,

सांगली- तासगाव मेन रोड वर, सांगली पासून १७ km आणि तासगाव पासून ५ km आंतरवर वसलेले गाव, जेमतेम १५ ते २० हजार लोकवस्ती, तरी ही शोभेच्या आतिषबाजी साठी देशभरात प्रसिद्ध. गावातील हिंदू, मुस्लिम, गावातील प्रत्येक गावकरी अगदी लहाना पासून ते थोरा पर्यन्त हा सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडतो. या मध्येच सामाजिक एकता दिसते. ज्यांना म्हैसूरचा दसरा आणि त्यानिमित्ताने होणार शोभेचे दारूकाम बघण्यासाठी या गावाला आवश्य भेट देतात. दरवर्षी विजयादशमीच्या रात्री हे गाव आतिषबाजीने उजळून निघते.

महाराष्ट्रात गणेशोत्सव,नवरात्रोत्सव ज्या उत्साहाने पार पडतो, अगदी तसच इथ विजयादश्मीसाठी अवघ गाव नवरात्रोत्स्वापासूनच तयारीला लागलेल असतं. या गावा मध्ये ही परंपरा २०० वर्ष्यापासून सुरू आहे. गावातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आतिषबाजीसाठी लागणारी शोभेची सर्व दारू गावातच बनवली जाते. रुई, शेवरी, चुना पावडर, हरताळ, विविध रंगाचा खार, हजार स्फोटकं असं साहित्य वापरुन शोभेची दारू बनवली जाते. मिश्रणातील प्रत्येक घटकाचा वेगळेपणा गुपित ठेवला जातो. संशोधन करत हे प्रमाणाचं रहस्य गुपित ठेवलं जातं. शोभेची दारू काम करणार्‍या मंडळातील ज्येष्ठ व्यक्ति किंवा म्होरक्या यांच्या कडे हे प्रमाणाचे शास्त्र असतं, त्याला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं

गावातील रस्त्याच्या एका बाजूला तीन फुटाचे खड्डे काढले जातात, ग्रामपंचायत कडून प्रत्येक मंडळाला जागा नेमून दिलेली असते त्याच ठिकाणी खड्डे काढून त्यावर मंडळाचे नाव लावले जाते. चार फुट लांबीचा चिंचेच्या झाडाचा बुंधा कापून त्याला चार इंच व्यासाचे आरपार होल पाडून त्यात करलाच्या मातीचा दट्ट्या मारला जातो . त्यात लकडी मुसळाने शोभेची दारू ठासून भरली जाते.लाकडी शिंगाट याला गावातील लोक शिंगाट असे संबोधतात. शिंगाट भरल्यानंतर ही शिंगट त्या खड्ड्यात उभी केली जातात .शिंगटातून निघणारी ज्वाला किंवा जोत ही ३ ते ४ फुटाची असते व त्यापासून तयार होणारा पिसारा १५० ते २०० फुट वर जातो . गावातील लोक याचा आवाजाचा आंदाज घेवून पिसर्‍याच्या खाली आनंदाने नाचतात. काही शिंगटाचा आवाजाचा दरारा इतका असतो की आवाज ऐकून गावातील लोक शिंगाटा जवळ जाण्याचं धाडस देखील करत नाहीत. लाकडी शिंगाट विडियो तसेच याच्या अवजावरून आणि पिसर्‍याच्या ऊंची वरुण शिंगाट कोणत्या मंडळाचे आहे हे अचूक सांगतात.

**औट : औट विडियो **प्लॅस्टिक चा चेंडू पासून औट तयार केला जातो. पहिला जुनी लोकं नारळाच्या कवटी पासून औट बनवायचे, औट हा ३ इंच पासून १२ इंचे पर्यन्त असतो. हा आकाशात भिरभिरत जाऊन फुटतो अन् रंगीबिरंगी तुषाराचे मनमोहक चित्र बघायला मिळते .

डिस्को, सोनेरी झाड,कारंजे,सुदर्शन चक्र,फुगडी,मोर,स्वागत कमान,धबधबे,भारताचा नकाशा,गेटवे ऑफ इंडिया चांद्रयान, ढगफूटी, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नजारा या आतिषबाजीतून थेट आकाशात दाखविण्याची किमया या गावकर्‍यांच्या हाती आहे. यातील एक ही फटाका कुठल्या कंपनीचा नाही, स्वत: तयार करतात. लहान मुलापासुन ते ज्येष्ठापर्यंत सर्वच हिरीरीने सहभागी होतात. दांडपट्टा

पत्री बाण (रॉकेट) सोडताना स्वत: मी

सिद्धराज महाराज मंदिर दसर्‍या दिवशी गावाचे आराध्य दैवत मानल्या जाणार्‍या सिद्धराज/बिर्‍हाडसिद्ध व नक्षत्रस्वामी यांची पालखी काढली जाते. पालखी रात्री ९ वाजता मंदिरातून निघते व बस स्टँड जवळ येते, या ठिकाणी आपटा पूजन केले जाते व इथून पालखीची सुरुवात होते,व गावाच्या मेन रोडवरून रात्रभर ही पालखी मिरवणूक सुरू असते. रात्री ९ वाजले पासून सकाळी ८ वाजेपर्यंत पालखीच्या समोर डोळ्याचे पारणे फेडणारे नयनरम्य आतिषबाजी पहायला मिळते . येथील सदाशिव माळी नावाच्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तयार केलेले औट फुटल्यावर त्यांचं स्वत:चं नाव आकाशात झळकायचे. मात्र त्याच्यासोबत ही कलाही संपल्याच ग्रामस्थ सांगतात. भारताचे पहिले लष्करप्रमुख जनरल करिअप्पा यांनी हे काम पाहून काही लोकांना शोभेची दारू बनवण्याचा परवाना मिळवून दिल्याचं संगितले जाते. दरवर्षी देशांतर्गत विविध घटनावर आधारित देखावा आकाशात बघण्यास मिळतो. या गावात दोन मंडळ एकमेकासमोर आली की हर हर अशी आरोळी मारतात.

पण यावर्षी कोरोंना मुळे हा पालखी सोहळा रद्द केला आहे**,** यावर्षी आतिषबाजी पाहता येणार नाही.?

5 Likes

@nitin0964

नमस्कार नितीनजी

अतिशय आकर्षक व सुयोग्य वर्णन.

शोभेच्या दारुबाबाबत तुमचे गाव पूर्वीपासूनच आत्मनिर्भर आहे हे वाचून मनापासून आनंद झाला.

तसेच हे दारुकाम एकट्याने न करता एक समुदायिक कार्यक्रम म्हणून होते हे महत्त्वाचे वाटते.

महितीबद्दल धन्यवाद. या वर्षी नाही पण पुढील वर्षी नक्कीच एक बघण्यासारखा उत्सव असेल अशी आशा करतो.

2 Likes

नमस्कार,

** @nitin0964 **

खुपच छान थरार आतिषबाजी चा व सुंदर लिहिले आहे, हा सर्व अनुभव ज्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो ते भाग्यवान आहेत…

लाकडी शिंगाट,

दांडपट्टा आणि पत्रीबाण (रॉकेट) मंदिर

बद्दल नवलच खास करून औट बद्दल जाणून तर प्रत्यक्ष अनुभवायची उत्सुकता वाढली आहे,

आमच्या सोबत सामाईक केल्याबद्दल धन्यवाद…

3 Likes

ऐकावे ते नवलच @nitin0964

अद्भुत कहाणी आहे या गावाची.

आपल्या महाराष्ट्रात इतके प्रतिभावंत लोक आणि जोपासलेल्या परंपरा यांचे वर्णन ऐकून अंगाला शहरे आले आणि अभिमान देखील वाटला.

फोटो अल्बम मधून लिंक करण्याऐवजी आपण ते डायरेक्ट पोस्ट मध्ये नाही टाकले याचे कारण समजू शकेल का?

3 Likes

धन्यवाद @TusharSuradkar फोटो खूप आहेत आणि सगळे मी Google photos

ला सेव्ह असल्याने मी ते लिंक दिली आहेत…

आणि जमलेच तर पुढच्या वर्षी नक्की भेट द्या.

3 Likes

आमंत्रणासाठी आभार मित्रा , नक्की यावे लागेल तुमच्या गावाला @nitin0964 अनोखे आहे सर्व :blush:

2 Likes

धन्यवाद :pray: @Shrut19 ही पोस्ट सामाईक करणे तुमच्या मुळेच साध्य झाले आहे. आणि विशेष हे की पत्रीबाण सोडणार मीच आहे.

तुम्ही ही पुढल्या वर्षी प्रत्यक्ष भेट देऊन हा उत्सव अनुभवू शकता.

1 Like

केवळ अदभूत मित्रा @nitin0964 !! :sunglasses: :open_mouth:

अशाच नवनवीन ठिकाणची माहिती अँड तिथल्या ह्या परंपरा आणि साजरी करण्याची अजब पण अद्वितीय प्रथा एकदम आकर्षक आहे; पुढच्या वेळेला नक्की यायचा प्रयत्न करू…

@Anil6969 मित्रा, तुला कसे वाटले हे वाचून नक्की सांग, जरूर आवडेल !!

धन्यवाद!!!

3 Likes

धन्यवाद @AjitThite :pray: जरूर या तुमचे स्वागत आहे. आणि तुमच्यासारख्या जाणकार लोकल गाईड

च्या माध्यमातून या गावचा आणि इथल्या परंपरेचा प्रसार होईल.

2 Likes

wow @nitin0964 bhau ,

apratim anokhi parampara yawa lagel tujha gawala @AjitThite bhau plan kar khar pudhchaya varshi sobat jau ya ,

aloukik parampara baghnar cha anand vegde hoil,

rest reader la awadel nahi majhi marathi tari pn bhawna pochel asi asha karto

regards

2 Likes

Thank u :pray: :blush: @Anil6969 ji तुमची

मराठी अडखळत का होइना पोहचली आमच्यापर्यंत . पुढच्या वर्षी जरूर या चांगला प्लॅन करू …

3 Likes

नमस्कार,

** @nitin0964 **

आमंत्रण यासाठी आभार,

हो नक्कीच जेव्हा जमेल तेव्हा आतिषबाजी चा हा सर्व थरार अनुभवायला यायचा प्रयत्न करेन,

आणि हो पाहिलंय मी तुझ्या फोटो लिंक मधले सर्व फोटो व व्हिडिओ रॉकेट उडवताना चे, छान आहे…

3 Likes

@nitin0964

नमस्कार

दसरा साजरा करण्याच्या एका अनोख्या महितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

यावर्षी नाही तरी पुढच्या वर्षी तरी नक्कीच भेट द्यावी असे आता वाटते आहे.

शोभेच्या फटाक्यांसाठी तुमचा गाव फार पूर्वीपासून आत्मनिर्भर आहे हे वाचून खरोखरच आनंद झाला.

2 Likes

This content has been removed.

2 Likes

@user_not_found wel come

1 Like

खूपच छान @nitin0964 सुंदर मांडणी केली आहे. लिखाण सुंदर आहे. वर्णन विलोभनीय आहे. माझे गाव कोल्हापूर मधील गड मुडशिंगी हे आहे. तिथे सुद्धा बिरोबा क्या यात्रेला अशीच आतिषबाजी व्हायची. मी स्वतः पहिली आहे खूपच सुंदर आणि थरारक असते. आपण इथे आपली पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद…

4 Likes

Thank u @Rohan10 अभारी आहे. आमच्या ईथे बिर्‍हाडसिद्ध आणि बिरोबाची पालखी असते.

धन्यवाद :pray: @C_T

आभारी आहे …दसरा पाहण्या साठी नक्की या तुमचे स्वागत आहे…

Hey @nitin0964

I just wanted to let you know that I have just released your post from our spam filters. They work 24/7 and can be a little harsh at times, so sorry for any inconvenience caused. Check out this article for more information on some of the possible reasons why your publication was caught by the filters.

3 Likes