ज्यांना वायरल झालेल्या अनिकेत सारखे वेगवेगळे पदार्थ खाण्याचे सुख मिळत नसेल त्यांच्यासाठी एक भन्नाट स्कीम सापडली आहे. नवले ब्रिज पासून अगदी मिनिटाच्या अंतरावर असलेल्या "पिझ्झा बस्ट’ या ठिकाणी.
ह्यांची ऑफर ची जाहिरात पहिली मग इकडे धाड टाकूया म्हणलं.
ऑफर मध्ये लिहल्या प्रमाणे इथं पाणीपुरी, 2 प्रकारचे सूप, 8 प्रकारचे हॉट स्टार्टर, 20 प्रकारचे फ्लेवरड स्टार्टर्स, 1 प्रकार चा सँडविच, 2 प्रकार चे चीझ गार्लिक ब्रेड, 4 प्रकार चे पिझ्झा, 1 स्वीट डिश (मर्यादित), 1 सॉफ्ट ड्रिंक (मर्यादित).
आता एवढे सगळं खायचं म्हणजे भिंत बांधताना जशी एक विटेवर वीट ठेवत जातो तसे एक एक करत पदार्थ खात गेलो. भरपूर व्हरायटी असल्याने सगळं काय लिहीत नाही पण ठळक गोष्टी लिहतो.
पाणीपूरी आणि सूप: खाल्लेच नाही, अनलिमिटेड मेनू असताना चाट आयटम आणि सूप पिऊन पोट भरणे म्हणजे माझ्यासाठी पाप आहे. फोकस मेन पदार्थांकडेच.
फ्लेवरड स्टार्टर्स मध्ये पास्ता, मॅक्रोनी, स्प्रिंग पास्ता याचेच 7/8 प्रकार आहेत. जवळजवळ सगळे मस्त लागले. महागडे ऑलिव्ह टाकलेले सुद्धा काही पास्ता होते. सॅलड चे पण बरेच 5/6 प्रकार होते आणि प्रत्येक सॅलड चवीला वेगळं होतं.
हॉट स्टार्टर मध्ये फ्राईड मोमोज, स्प्रिंग रोल मस्त होते, नूडल्स आणि फ्राइड राईस पण होता पण ते पास्ता आणि बाकीच्या डिशेस मुळे थोडे मागे पडले.
एक गोष्ट आवडली ती म्हणजे ह्या स्टार्टर च्या काउंटर वरील ट्रे मध्ये अगदी 3/4 जणांना पुरेल एव्हढेच भरलं होतं, कमी झाले की नवीन रिफिल होत होते.
पोटाचा 50% कोटा ह्यांनीच भरला. आता वेळ होती अजून 49% भरायची 2 प्रकार चे गार्लिक ब्रेड आणि 4 प्रकार चे पिझ्झा, सगळे ट्राय केले. सगळे आवडले. पिझ्झा मध्ये चीझ दाबून टाकलं होतं, पिझ्झा बेस एकदम बारीक असा होता त्यामुळे रिधी ने देखील काठ न काढता संपवला.
पोटाचा उरलेला 1% कोटा ब्राऊनी विथ आईस्क्रीम खाऊन भरून टाकला. हे पण छान होतं.
रिधीच्या आवडीचा मेनू असल्याने रिधी तर जाम खुश होती.
बैठक व्यवस्था ऐसपैस आहे, 15/16 टेबल्स असतील, एक रिझर्व्ह पार्टीज साठी छोटा सेक्शन पण आहे. सर्व्हिस चांगली आहे, पिझ्झा, गार्लिक ब्रेड घेऊन वेटर दर थोड्या थोड्या वेळाने फिरत होता. साफसफाई वाला देखील जरा काय पडलं, सांडले की लगेच हजर.
जाताना पोटाचा बनपाव करणाऱ्या ह्या आउटलेट च्या मलंकाना भेटून वरील फीडबॅक दिला. त्यांच्या कडून कळले की स्टार्टर्स मधील मेनू आहेत हे रोजच्या रोज बदलत असतात. “पिझ्झा बस्ट” ही मोठी चेन असून ही ब्रँच पुण्यातील पहिली ब्रँच आहे. आणि आमच्या सासुरवाडीला म्हणजे कोल्हापूर मध्ये देखील एक ब्रँच आहे.
रिधीला तर खूप आवडला असल्याने परत परत येणं होईल असे दिसतेय.
खादाड भावा: मदनकुमार जाधव.
अखिल भारतीय अनिकेतवर जळणारे नवरे यांच्या संघटनेचे मेम्बर.
https://maps.app.goo.gl/MfbiinUBvZb4xTVK8
#madankumarreview #khada_bhava #pizzaburst #veg #affordable #unlimited #pizza #pasta