कोकण ट्रिप आणि खाद्यभ्रमंती भाग 4
श्रीवर्धनच्या रिसॉर्ट मधून चेक आउट करायच्या अगोदर रिसॉर्ट पासून जवळ असलेल्या जिवणा बंदर ला गेलो, इथे सकाळी 8,8.30 च्या आसपास माश्यांच्या लिलाव असतो, ह्या दोघींना तो बघायला घेऊन गेलो होतो. तिथला वास बघून ह्यांनी नाकं मुरडली. जेव्हा बोटी यायला सुरुवात झाली आणि वेगवेगळे मासे क्यारेट मधून यायला लागले मग ह्यांचे लक्ष तिकडे गेले. कधी न पाहिलेले काही मासे बघून खुश.
इथुन पुढे आमचा हरिहरेश्वरला जायचा प्लॅन होता. 11/11.30 च्या आसपास तिथे पोचलो, दर्शना साठी 10 मिनिटांची लाइन होती, अगदी व्यवस्थित दर्शन झाले. इथे मंदिरात ढकला ढकली, आरडाओरडा अजिबात न्हवता.
दर्शन झाल्यावर मिनी ट्रेक करून प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केला. ह्या मार्गात खडकामध्येच समतल असा भाग तयार झाला आहे , तिथे एकदम भारी फोटो येतात.
मार्ग पूर्ण करत असताना काही स्टॉल्स होते तिथे जांभूळ ताक पिले, काहीतरी नवीनच. मसाला ताक पण घेतले होते ते थोडे जनवण्या इतके खारट होते. जांभूळ सरबत देखील मिळत होता तो देखील युनिक.
एव्हाना 2 वाजत आले होते त्यामुळे इथेच काहीतरी खाऊन घरी जायला निघायचं होतं. सागर कृपा म्हणून एक खानावळ आहे त्याचा अलीकडेच एक घरगुती ठिकाण आहे त्यांचा आंबोळी आणि घावन उपलब्ध असल्याचा बोर्ड बघून तिथेच थांबलो.
आम्ही ऑर्डर दिल्यानंतर त्या आजींनी बनवायला घेतलं. गरमागरम घावणे आणि आंबोळी जसे बनत होते तसे येत होते आणि त्याच स्पीड ने आमच्याकडून त्याचा फडशा पडला जात होता. जेवण संपत आल्यावर मोदक पण घेतले पण दिवेआगर बीच वर खाल्लेले मोदक सरस ठरले. ह्या खानावलीचा पत्ता किंवा नाव लक्षात नाही आहे आत्ता, कारण कडाडून भूक लागली होती फक्त आंबोळी ,घावणे मिळेल हा बोर्ड वाचून आत गेलो होतो. इथे बसायला एकाच टेबल आहे.
खाऊन झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो. दिवेआगर, आर्वी, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या चारी पैकी मला जास्त आवडलेले ठिकाण म्हणजे हरिहरेश्वर.
कोकण ट्रिप आणि खाद्यभ्रमंती समाप्त.
खादाड भावा: मदनकुमार जाधव
खाली असलेले लोकेशन आम्ही जेवलो त्या खानावलीचे नाही पण त्याचा जवळ च आहे.