नमस्कार
@ShailendraOjha यांनी सुरु केलेल्या Architecture-of-Temples चॅलेंज साठी ही माझी एन्ट्री :
पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर वरील माळशिरस, सासवड येथे वसलेले हे भुलेश्वर मंदिर.
कथा अशी कि पार्वती मातेने महादेवाचे मन जिंकून घ्यायला येथे तपस्या केली, अर्थात, भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वती मातेशी विवाह केला, तेव्हापासून या मंदिराचं नाव भुलेश्वर पडले.
वनवासात असताना पांडव सुद्धा काही काळ इथेच वास्तव्यास होते अस ही म्हणतात. राजामाता जिजाऊ बाळ शिवाजींना येथे घेऊन येत असत. या जागेचे पूर्वीचे नाव, दौलतमंगल किल्ला , आज सुद्धा उतार रस्त्यावर किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात.
भुलेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. सुंदर नाकाशीकाम, कोरवी मुर्त्या, पौराणिक प्रसंग, पतयके वेळो अवाक करून टाकणारी वास्तुकला खरंच कौतूकास्पद आहे. परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिराचे बांधकाम बाहेरून थोडेसे मुघल पद्धतीचे असावे.
मंदिराच्या काही भागात सूर्य प्रकाश लपंडाव खेळात असतो, त्या प्रकाशाने मुर्त्या, किंवा तो कोपरा उजळून येतो ते शब्दात मांडता येत नाही, ना छायाचित्रात पकडता येत.
येथील शिवमंदिरास यवतेश्वर सुद्धा म्हणतात. यादवकालीन मंदिर असावे. प्राचीन वास्तू कलेचा अविष्कार येथे पाहायला मिळतो. काळ्या रंगाच्या बेसाल्ट दगडात केलेले कोरीव काम, गोलाकार घुमटीचा कलश, देव देवतांच्या कोरलेल्या मुर्त्या, अप्रतिम कोरीव काम केलेला नंदी , सुंदर असा गाभाऱ्याचा दरवाजा, खांबावर कोरलेला नृत्य गणेशा, मंदिरात ठिकठिकाणी कोरलेले रामायण , महाभारतातील प्रसंग , दर्पणीका , चामुंडा, कोरलेल्या खिडक्या सर्व काही मंदिराचे सौंदर्य दर्शवतात.
जरी १७ व्य शतकात मुघलांनी आक्रमण करून या मंदिराचे सौंदर्य भग्न करायचा प्रयत्न केला,पण आज हि या छिन्न विछिन्न झालेल्या मुर्त्या मोहक वाटतात आणि इतिहासाची साक्ष देतात. मंदिरात जाण्यासाठी गाडी जाईल असा चांगला रस्ता आहे, पायथायपासून ३०-३५ पायऱ्या चढून आपण मंदिरापाशी पोचतो. आजू बाजूला लहान लहान पूजेची, आणि काही प्रसादाची दुकाने आहेत.
या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करतात, तसेच श्रावणात प्रत्येक सोमवारी जत्रा भरते.
कृपया मंदिरातील नियमांचे पालन करा, नीटनेटके कपडे परिधान करा आणि मंदिर स्वच्छ ठेवण्यास मदत करा
मंदिराची वेळ : सकाळी ५ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते ८
आरतीची वेळ : सकाळी ५.३० वाजता
पायऱ्या : ३०-३५
पूजेचे सामान : पायथ्याशी आणि मंदिराजवळ दुकाने आहेत
जेवण/पाणी : पायथ्याशी आणि मंदिराजवळ दुकाने आहेत, पाणी स्वतःचे आणावे
पार्किंग : पे अँड पार्क, पायथ्याशी
कसे पोहोचाल? : पुणे सोलापूर हायवे पासून ४५ किमी
जवळपासची मंदिरे : जेजुरी मंदिर, रामदरा मंदिर, थेऊर चा अष्टविनायक मंदिर