शुद्ध शाकाहारी प्रीती डायनिंग हॉल, सोलापूर

सोलापूर शहर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राची संस्कृती एकत्रितपणे जपणारे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचा पुरस्कार केलेला दिसतो. या ठिकाणच्या खाण्यात आपल्याला कर्नाटक की झणझणीत पणा आणि महाराष्ट्रीयन सात्विक पणा एकत्र पाहायला मिळतो. सोलापुरी जेवणात काळा मसाल्याचा वापर जास्त केला जातो हा काळा मसाला अतिशय तिखट असतो त्यामुळे सोलापूर मधील जेवण हे तुम्हाला झणझणीत तिखट खायला मिळते. मात्र माझ्यासारख्या कमी तिखट खाणाऱ्या माणसाला जर या ठिकाणी जेवायचे असेल तर अशी काही हॉटेल शोधावी लागतात की जिथे कमी तिखट जेवण मिळते किंवा तुमच्या सांगण्यावरून तिथे कमी तिखट जेवण बनवले जाते असेच एक हॉटेल म्हणजे प्रीती भोजनालय.

या भोजनालयाची पुढील बाजू पाहिली तर अतिशय साधी आणि सरळ आहे रस्त्याच्या कडेला असलेले हे भोजनालय आहे मात्र तुमच्या स्वागतासाठी येथे दारात रोजच्या रोज रांगोळी काढली जाते.
बाहेरील बाजूस तुम्हाला बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही तुमचे पार्सल तिथे बसून सुद्धा घेऊ शकता किंवा गर्दी असल्यास बाहेर थांबू शकता.
दहा ते अकरा टेबलांचं हे हॉटेल मात्र अतिशय स्वच्छ आणि नीट नीट आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त व्हेज जेवण उपलब्ध होते.
व्हेज थाळी हा प्रकार येथे उपलब्ध आहे आणि तोही अगदी तुमच्या खिशाला परवडणारा ज्यामध्ये दोन भाज्या एक गोड पदार्थ भात चपाती किंवा भाकरी कांदा लिंबू पापड असा सराजम ताटात असतो आणि तोही फक्त 180 रुपयात. या ठिकाणी थाळी खरेदी केल्यास तुम्हाला अनलिमिटेड भाज्या कोशिंबीर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तुम्ही मनसोक्त जेऊ शकता आणि पोट भरून खाऊ शकता.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी पोळी सुद्धा मागू शकता ज्याचे दरही अगदी तुमच्या खिशाला परवडणारे आहेत. या ठिकाणी मी वरती उल्लेख केल्याप्रमाणे जर तुम्हाला तिखट कमी हवे असेल तर तुम्ही ते सांगू शकता आणि त्यानुसार तुम्हाला भाजी करून दिली जाते.
इतके साधे हॉटेल असून देखील या ठिकाणी खूप प्रसिद्ध लोक जेवायला येतात याचं कारण म्हणजे त्यांनी ठेवलेला जेवणाची कॉलेटी हे आहे. गरमागरम जेवण ताटात वाढणे ही यांची संस्कृती आहे.
तसेच त्यांनी हॉटेलमध्ये ठीक ठिकाणी जेवण ताटात शिल्लक ठेवू नये याकरिता सूचना दिलेल्या आहेत अन्न वाया घालवणे हे किती चुकीचे आहे हे त्यांनी सांगितले आहे.
याकरिता त्यांना उत्तम जेवण याचा पुरस्कार देखील मिळालेला आहे.
तुम्ही थाळी ऑर्डर केली तर तुम्हाला लगेचच जेवण वाढले जाते मात्र जर तुम्ही काही ठराविक पदार्थ मागितले तर ते बनवून दिले जातात त्याकरिता किमान दहा मिनिटे तरी वेळ त्यांना द्यावा लागतो.
सोलापूर भागात पाणी कमी असल्याकारणाने ठिकठिकाणी पाणी मर्यादित वापराण्याचे बोर्ड लावले गेले आहेत.
या ठिकाणी पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहे.
आता या ठिकाणी कसं जायचं म्हणलं तर रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती हे हॉटेल आहे जागता तुम्ही रिक्षा घेऊन जाऊ शकता किंवा स्वतःच्या गाडीने जाऊ शकता.
या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ जसे की खवा पोळी ,पुरणपोळी ,शेंगदाणा पोळी अशा प्रकारच्या कधीतरी उपलब्ध होणाऱ्या गोष्टी खायला मिळणार आहेत अगदी कमी दरात.
स्वच्छ वातावरणात जेवण करायला आपल्याला नक्कीच आवडेल आणि त्याकरिता आपल्याला प्रीती भोजनालय येथे भेट दिली पाहिजे.
या ठिकाणी मी मेनू कार्ड चा फोटो सुद्धा जोडलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की भाज्यांचे दर देखील आपल्या खिशाला परवडणारे आहे.
हे हॉटेल ग्राउंड लेव्हलला असल्या कारणाने या ठिकाणी :wheelchair::wheelchair: विल चेअर ऍक्सेसिबिलिटी उपलब्ध आहे. तसेच येथे एअर कंडिशन सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.

25 Likes

अप्रतिम , फार छान स्वादिष्ट थाळी दिसतेय , सोलापूरचं पुढच्या भेटीत नक्की जैन इथे .
धन्यवाद , @Supriyadevkar .

4 Likes

The food looks delicious :yum:.
Thank you for sharing.

1 Like

@Supriyadevkar Congratulations on such a well-crafted and detailed review of Preeti Bhojanalaya in Solapur! Your description beautifully captures the essence of the place, highlighting its unique features, delicious food, and customer-friendly services. It’s wonderful to see how you’ve shared insights about accessibility and affordability, which will surely help many visitors.

Your effort to provide such a comprehensive and authentic review reflects your dedication as a Local Guide. Keep up the fantastic work, and I look forward to more such amazing contributions from you. Well done!

2 Likes

@Supriyadevkar, Thank you for sharing. Foods look so yuuuuummmmy!

1 Like

Thanks a lot @Gazi_BD for such wonderful appreciation.I will definitely try to share places which are helpful to people

1 Like

Thanks a lot for your appreciation @Mehedi_LGC

1 Like

Thanks a lot for your appreciation @NareshDarji .

That looks simply amazing… dear friend @Supriyadevkar
Yummy yummy photo…
Nice post…
Thanks for sharing…
:handshake::gift_heart:

1 Like

Thanks for your appreciation @TravellerG

@Supriyadevkar the food looks yummy :yum:… And the Kolam gives the shop and authentic traditional feel …

1 Like

Delicious food, thank you for sharing @Supriyadevkar

1 Like

नमस्कार
@Supriyadevkar

वा वा मस्त, महाराष्ट्रियन थाळी हि माझं प्रेम, आणि शाकाहारी थाळी मी हे समीकरण…
शेअर केल्याबद्दल धन्यवाद…

1 Like

Kolam looks so welcoming… food is so tempting… thanks for sharing

1 Like

धन्यवाद श्रुती ताई मला ही महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात

1 Like

धन्यवाद @ShreyaMusings

1 Like