महाराष्ट्रात प्रत्येक सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा भरते. या यात्रेचा बगाड्या होण्यासाठी देवाला प्रती वर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथाच्या मंदिरात कौल लावला जातो. होळी पौर्णिमेनिमित्त बागड कोणावर आलाय याचा कौल नाथाच्या कृपेने पंच मंडळी घेत असतात. बगाडाच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिरासमोर हे बगाड उभे केले जाते यानंतर देवाचा छबिना बगाड्या सह सोनेश्र्वर मंदिराच्या दिशेने वाजतगाजत पाठवला जातो.यात्रेच्या मुख्य दिवशी राज्यात सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असताना साताऱ्यातील वाई तालुक्यात बावधन मध्ये बगाड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
8 Likes
