कास बामणोलीचे निसर्ग सौंदर्य...

  • श्रीनिवास वारूंजीकर
    सातारा -

यावर्षी दिपावलीचा उत्सव हा दोनच दिवसांचा असल्याने आणि दोन दिवसांच्या मध्ये एक भाकड दिवस मध्ये आल्याने रविवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास परिसर आणि बामणोली येथे पर्यटकांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाली. वाहनांच्या रांगा उपहारगृह यांमधील गर्दी आणि विविध पर्यटन स्थळांवर छायाचित्रण करण्यात गुंग झालेले पर्यटक तसेच बामणोली येथील बोटिंग साठी उडालेली झुंबड पाहतात अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पर्यटकांनी मनस्वास्थ्य मिळवण्यासाठी कास बामणोली परिसराची निवड केल्याचे दिसून आले.
फुलांचा हंगाम संपलेला असल्याने कास पठारावर एक प्रकारची नीरव शांतता आढळून आली. त्यामुळे याठिकाणी थांबण्यास कोणी उत्सुक नव्हते. मात्र कास तलाव येथे विशाल जलाशयाच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रण करणारी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. निळंभोर आकाश, हिरवीजर्द झाडी आणि लालबुंद मातीच्या पार्श्वभूमीवर निळ्याशार जलाशयात तरंगणाऱ्या नौका मनमोहक दिसत होत्या.
तसेच सकाळच्या सत्रात येथे उपहारगृहामध्ये अल्पोपहार यासाठीही गर्दी दिसून आली. शिवपेटेश्वर गुंफा येथेही काही पर्यटक जाताना दिसले. सर्वाधिक गर्दीचा कळस गाठला तो बामणोली येथे कोयना धरणाच्या शिवाजीसागर जलाशयात बोटिंग करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. शेम्बडी येथील नारायण महाराज मठ, त्रिवेणी संगम, ‘मिनी काश्मीर’ तापोळा या तीन ठिकाणी जाण्यासाठी बोट बुक करून नौकानयनाचा आनंद लुटताना पर्यटक दिसून आले.
त्याचबरोबर सर्वत्र करोनाविषयी काळजी घेत घेण्यात येत असलेले दिसले. सॅनिटायझर चा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे भान राखत पर्यटकांनीही आनंद लुटला. सर्व हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये भोजनासाठी सायंकाळपर्यंत नागरिक प्रतीक्षा करताना दिसले.
पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर सह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांनी कास बामणोली परिसर फुलून गेल्याचे पाहायला मिळाले.
बामणोली येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर सर्व हॉटेलचालक आणि बोटक्लब पर्यटकांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचे एक सकारात्मक चित्र रविवारच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

17 Likes

@VARUPOET ,

फार छान वर्णन केलंय तुम्ही! मजा आली. आता थोडे मोकळेपणा अनुभवायला सगळे बाहेर पडलेत, इथल्या व्यावसायिकांना सुद्धा दिलासा मिळाला असेल अरे चित्र दिसतेय. लोक्कानी झुंबड करून शिष्तीचे पालन केले म्हणजे झाले नाहीतर काही खरे नाही.

इथे कसे पोहोचायचे व अजून काय बघण्यासारखे आहे, इथे भेट देण्याचा चांगला कालावधी कुठला ह्या बद्दल थोडे जास्त सविस्तर सांगता येईल का ?

धन्यवाद!

3 Likes

@VARUPOET

अत्युत्कृष्ट वर्णन.

प्रत्यक्ष पर्यटन स्थळावर असल्याचा अनुभव त्यातून मिळाला.

तरीही तुम्ही अजून काही छायाचित्रे सामील करू शकाल? त्यामुळे ही स्थळे न पाहिलेल्या वाचकांनाही त्यांच्या विशेषत्वाची कल्पना येईल.

तसेच योजना पूर्वक मराठीतून लेख लिहिल्याबद्दल आभार.

4 Likes

@VARUPOET

पहिल्यांदा आम्ही गेलो होतो वासोट्याला तिकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे कास पठार बामणोली आणि बामणोली तून नदी मार्गे वासोटा पण आम्हाला नक्की माहिती नसल्याने कसे बसे बामणोली मध्ये पोचलो तो पर्यंत दुपारचे 3 वाजले होते आणि सर्व बोटी निघून गेल्या होत्या वासोटा किल्ला वरती त्यामुळे तो वासोट्याचा प्लॅन पूर्ण पणे फसला होता …

नंतर मागच्या वर्षी पूर्ण प्लॅन करून आम्ही वसोट्याला पोचलो…खूप छान अनुभव होता तो…

4 Likes

nice

2 Likes

नमस्कार,

** @VARUPOET **

छान पोस्ट,

कव्हर फोटो छान, सातारच्या कास पठाराबद्दल मला नेहमी आकर्षक वाटत, कधी तरी जावं, फुलांची उधळण डोळ्यात साठवून ठेवता यावे,

कास बामणोलीचे निसर्ग सौंदर्य बद्दल ची

पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद…