विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज संस्थान,शेगांव.
Covid-19 Lockdown नंतर मी काल प्रथम च शेगांव येथे श्री गजानन महाराज ह्यांच्या दर्शनासाठी गेलो, तिथे गेल्यावर बघितलेल्या व्यवस्थेचा अनुभव मी आज आपल्या समोर मांडत आहे. आपण जर शेगाव येथे जाऊन आलेले असाल तर तेथील अतभूत व्यवस्थेचा व सेवेचा अनुभव आपण अनुभवलाच असेल. परंतु जे कोणी आजतगायत शेगाव येथे गेले नाही,त्यांच्यासाठी ही छोटीशी पोस्ट मी लिहत आहे. आपणास देवस्थान म्हंटल की विचार येणार येथे शिर्डी,पंढरपुर आशा संस्थान पेक्ष्या वेगळ काय असणार परंतु **खर तर गजानन महाराज ह्यांचे शेगांव संस्थान हे आवल्या जगातभारी आशा नियोजन,शिस्तबद्ध पद्धती,स्वच्छता व सेवकाऱ्यांचा नम्रते साठी सुप्रसिद्ध आहे.एखाद्या कंपनी सारखे नियोजन,खाजगी ठिकाण सारखी स्वच्छता व एखाद्या 5 स्टार हॉटेल मध्ये मिळणारी नम्रपणाची वागणूक आपल्याला बघायला मिळते.**शेगाव बद्दल बोलावे असे खूप काही आहे, संस्थान चे इंजिनेरिंग चे कॉलेज,हॉस्पिटल,रोज हजारो चा संख्येने मिळणार जेवण (महाप्रसाद), सुमारे 200 एकर मध्ये असलेले आनंद सागर उद्यान व त्यासाठी असलेली माफक फी,भक्तांसाठी सर्व सुविधांयुक्त भक्तनिवास(राहण्याची वव्यवस्था) व सांगावे तेवढे कमीच.आज शेगाव येथे ११,००० पेक्षा जास्ती सेवकरी प्रतीक्षा रांगेत उभे आहेत. सेवा ज्यात कोणतंही मानधन दिलं जात नाही तर सेवा संपल्यावर एक प्रसादाचा नारळ घेऊन सेवेकरी आपल्या पुढच्या मार्गाला प्रस्थान करतो. १७,००० पेक्षा जास्त सेवेकरी आज शेगाव संस्थानात अश्या प्रकारे निस्वार्थी सेवा देतात.
परंतु ही पोस्ट लिहण्या मागचे कारण म्हणजे संस्थान ने कोरोना नंतर केलेली नियोजन व्यवस्था.
सर्वात प्रथम संस्थान ने जिल्हा बुलढाणा येथे Covid Isolation Ward उभारले.जेव्हा सरकार ने मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली,त्यांनतर दर्शना साठी आशा प्रकारे Online Pass उपलब्ध केल्या.
आपण दर्शना ला प्रत्यक्ष गेल्या नंतर आपल्याला प्रत्येक 100 Meter वरती सेवक Sanitizer घेऊन बघायला मिळतो.
दर्शना साठी रांगेत उभे असताना आशा प्रकारे 6 foot अंतरावरती आपल्याला आखुल दिलेल्या डब्या मध्ये रांगेत उभे राहावे लागते.
रांगेत असताना थर्मल स्क्रिनिंग केल्या जाते.
मंदिरा मध्ये पाय ठेवल्या पासून ते दर्शन होईपर्यंत आपल्याला एकूण ऐका पासून 6 फूट अंतर ठेवून च राहावे लागते व संस्थांन चे स्वयंसेवक आपल्याला तशे निर्देश अत्यंत नम्रपणे देत असतात.
दर्शन झाल्या नंतर महाप्रसाद (जेवण) करताना सुद्धा आपल्याला 6 फूट अंतर ठेवून च जेवण करावे लागते.
हात जर आपल्याला पाण्या नी धुवायचे असल्यास,हाताचा स्पर्श न करता पायांनी प्रेस करणारे यंत्र येथे बसवण्यात आले आहे.
अशी व्यवस्था असलेले देवस्थान कदाचित च आपण बघितले असेल. अगदी सुरुवाती पासून तर शेवट पर्यंत येथे Mask व Social Distancing चे पालन काटेकोर पणे केल्या जाते.
विशेष म्हणजे दिव्यांगासाठी विशेष दर्शना पासून ते जेवण पर्यंत व्यवस्था येथे अगदी पहिल्या पासून करण्यात येते. हा पूर्ण परिसर Wheelchair Accessible आहे.
Accessibility :
Wheelchair Accessible Entrance :Yes
Wheelchair Accessible Ramp :Yes
Wheelchair Accessible Parking :Yes
Wheelchair Accessible Toilet :Yes
आपण कधी महाराष्ट्र च्या बुलढाणा, नागपूर,अमरावती,अकोला व वाशिम ह्या भागात येत असाल तर येथे आवर्जून या व येथील जगात भारी व्यवस्थेचा अनुभव नक्की घ्या.