Tempting Nonveg thali at Dhaba Desi chulha

A

रिधीला बाहेर खायचे होते त्यामुळे नांदेड सिटी गेट समोर असलेल्या फूड पार्क घेऊन आलो, तिथं एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालं आहे, अगदी 2, 4 दिवसच झालेत वाटतं. तिकडे जायचा ठरवलं. निळू फुलेंच्या भाषेत गावात नवीन पाखरू आलय, म्हणून जाऊन बघून यावं म्हणलं.

दोन दिवस अगोदर बाहेर व्हेज खाल्ले असल्यामुळे, नॉन व्हेज खाऊन जरा दातांना पॉलिश करावं म्हणलं, रिधीला तिच्या बर्गरच्या चॉइस ऐवजी काहीतरी दुसरं खाऊया म्हणून तयार केलं.

मेनू मध्ये कॅफेचा पण मेनू आहे आणि चायनीज,पंजाबी व थाळी चे पण पर्याय आहेत. थाळी चा मेनू बघत असताना एक चिकन बार्बेक्यू थाळीचे पान दिसले, त्या थाळीत भरपूर पदार्थ दिसत होते. अधिक माहिती साठी काउंटर वरील मलंकाना विचारलं तर त्यांनी ही थाळी जर तुम्ही घेणार असला तर 15% डिस्काउंट मिळेल कारण ही थाळी घेणारे तुम्हीच पाहिले कस्टमर असणार. आता डिस्काउंट मिळतोय म्हणल्यावर तो सोडणारा कॉमन मॅन नसतो. होऊन जाऊदे खर्च. थाळी 2 व्यक्ती मध्ये शेरिंगला परवानगी आहे,त्यामुळं रिधीचा पण प्रश्न मिटला होता.

15 मिनिटांनी थाळी हजर. ह्या थाळीचा पहिला वहिला ग्राहक असल्यानं थाळी मस्त सजवून आली होती.
थाळी मध्ये आळणी रस्सा (1 पीस), तांबडा रस्सा, चिकन काळा मसाला फ्राय (2 पीस), बटर चिकन (4/5 बोन लेस पिसेस), बॉईल्ड अंडा भुर्जी, चिकन बिर्याणी(1 पीस) ,1 तंदुरी चिकन लेग पीस, चिकन कबाब (3 पीस) , अंडा पकोडा (2), फिश फ्राय नसल्याने त्यांनी 1 लॉलीपॉप दिले होते आणि रुमाली रोटी.

प्रथेप्रमाणे आळणी रस्सा सुरुवातीला पिला, रस्सा छान होता, गरमागरम असल्याने मजा आली. तांबडा रस्सा देखील पातळ पिण्यायोग्य, तिखटपणा सुसह्य होईल असा. काळ्या मसल्यातील चिकन फ्राय ,हे मस्त शिजलं होते जरा अजून तिखट असतं तर अजून भारी लागलं असतं. बटर चिकन तर एक नंबर होते, रुमाली रोटी बऱ्याच दिवसांनी खाल्ली, बटर चिकन सोबत मस्त मेळ जमून आला होता. थाळी मध्ये नेहमी दुर्लक्ष होणारा पदार्थ म्हणजे अंडे, पण ह्या थाळीला असलेली बॉईल्ड अंडा भुर्जी क्या बात, बऱ्याच दिवसांनी अशी भुर्जी खाल्ली.

रिधीचा फोकस थाळी मधील स्टार्टर च्या पिसेस वर होता.
तंदुरी चिकन व्यवस्थित तंदूर केलेलं दिसत होते, चिकन कबाबला मॅरीनेट मस्त उतरले होते. लॉलीपॉप आणि अंडा पकोडे काय मला चवीसाठी पण दिले नाहीत.

3/3 वाट्या रस्सा वडत वडत, बिर्याणी पर्यंत पोचलो होतो. बिर्याणी मध्ये नुसता भात असेल असं वाटलं होते मला पण त्यात एक चिकन पीस लपून बसला होता. बिर्याणीची चव देखील छान होती.

मालक येता जाता जेवणाबद्दल चौकशी करत होते. सर्व्हिस देखील वेळेत मिळत होती.

इथलं जेवण तर चांगलं वाटलं, ह्यांचे रेट्स शेजारी असणाऱ्या 1/2 फ्रांचयसिझ पेक्षा थोडे जास्त आणि उरलेल्या 2/3 हॉटेल्स ला मॅच होतील असे आहेत.

बैठक व्यवस्था प्रशस्थ आहे. वरच्या भागात कॅफे आणि पूल टेबल पण आहे. पूल टेबल ग्राहकांना फ्री असेल (जेवण येई पर्यंत आणि पेड कस्टमर नसतील तेव्हाच), बाकी इतर वेळी चार्जेस आहेत. जाहिरातीचे प्लाम्प्लेट्स अजून आजूबाजूला वाटले नाहीत ते लवकरच वाटणार असे कळले.

त्यांची स्पेशल बार्बेक्यू थाळी चा पहिला ग्राहक म्हणून माझा वाईच कमी शाल श्रीफळ देऊन सत्कार तेव्हढा करायचा राहिला एवढंच.

असो नवीन पाखरू आलंय एकदा भेट देऊन बघा

खादाड भावा: मदनकुमार जाधव

: ढाबा देसी चुल्हा,
नांदेड सिटी गेट समोरील फूड पार्क, सिंहगड रोड, पुणे

गुगलला लोकेशन अजून आलेले नाही.
https://maps.app.goo.gl/URguvfyo83tPjkVZ9

#khadad_bhava #madankumarreview #dhabadesichulla #nandedcity #nonveg #barbequethali

21 Likes

फार छान पोस्ट आहे मित्रा, @Madankumarj . एक सांगावेसे वाटते, तू सांगतो आहेस की त्याची गुगल मॅपस वर अजून नोंद झालेली नाही तर तूच कर की, तुला त्याचे पॉइंट्स पण मिळतील. लोकांना शोधायला मदत पण होईल. कोणाची वाट न बघता ऍड कर लगेच.

2 Likes

@Madankumarj die Speisen sind auch sehr gut angerichtet und die Bilder zeigen es sehr gut.

Thank you for suggesting, i have added that place in Google map

1 Like