थंडी कमी होऊन ऊन जाणवायला लागले आहे आणि ऊन म्हणजे आइस्क्रीम खाणं आलच.खरतर आइस्क्रीम हे उष्ण असते तरीही ते आपण उन्हाळ्यात आवडीने खातो.काल मी आणि माझे कुटुंब आम्ही पोलर बिअर याठिकाणी आईस्क्रीम खाण्यास गेलो होतो. हे ठिकाण आमचे आवडीचे ठिकाण आहे कारण या ठिकाणी अतिशय स्वच्छता असते तसेच नीटनेटकेपणा या ठिकाणी नेहमी दिसून येतो.
यांच्याकडे नेहमी वेगवेगळ्या आईस्क्रीमच्या थीम ठेवल्या जातात म्हणजेच सध्या स्ट्रॉबेरीचा सीजन असल्याकारणाने इथे त्यांनी स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची एक वेगळी रेंज सुरू केली आहे मात्र ही मर्यादित काळापूर्वीच आहे.
आज आम्ही एक वेगळा आईस्क्रीमचा प्रकार ट्राय केला ज्यामध्ये गुळाचा वापर केलेला होता. सोबत आलमंड्स भरपूर वापरले होते ज्यामुळे आईस्क्रीम ला एक वेगळीच टेस्ट येत होती.
चॉकलेट ब्राऊनी विथ आईस्क्रीम तीही मस्त डेकोरेशन करून दिलेली आहे जीखाताना खूप मजा येत होती. मध्येच चॉकलेटचा स्वाद मध्ये कॉफीचा स्वाद आणि सोबत ब्राउनी आणि चॉकलेट आईस्क्रीम सगळं कसं चॉकलेटमय झालं होतं अर्थात ही मुलांची आवड आहे.
ओरिओ व्हॅनिलाआईस्क्रीम सोबत हे देखील आणखी वेगळच कॉम्बिनेशन जे मुलांना फार आवडतं.
तर अशी विविध आईस्क्रीम खायला आमच्या घरातले नेहमी तयार असतात आणि मी आणि मग आम्ही निघतो ते पोलर बिअरला. खूप वरायटी आईस्क्रीम या ठिकाणी उपलब्ध आहे विविध प्रकारचे शेक्स या ठिकाणी तयार केले जातात शंभर टक्के व्हेजिटेरियन असणारे आईस्क्रीम या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात तर मग तुम्हाला कोणते आईस्क्रीम आवडतात हे मला नक्की कळवा आणि तुमच्या आवडत्या आईस्क्रीम चा फोटो देखील मला पाठवा.
या ठिकाणी बाहेर बसण्याची सुद्धा सोय आहे विलचेअर ऍक्सेसिबिलिटी म्हणाल तर बाहेर ज्या ठिकाणी बसण्याची सोय आहे त्या ठिकाणी बसून नक्कीच ते आईस्क्रीम खाऊ शकतात.
पार्किंगची सोय म्हणाल तर हे रोड टच असल्यामुळे तुम्हाला रोडवरतीच पार्किंग करावी लागेल