प्रिय लोकल गाईड मित्रमैत्रिणींनो, गूगल नकाशा आता आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे आणि तो लोकांना त्याच्या स्वतःच्या तसेच अनन्य मार्गाने खरोखर मदत करतो, पण कधीकधी नकाशावर चुकीच्या माहिती, चुकीच्या जागेचे फोटो, चुकीच्या व्हिडिओंमुळे नकाक्षा वापरकर्तांची या अशा चुकीच्या नकाशावरून दिशाभूल होते, मी स्थानिक असण्यामुळे गूगल मॅप व रिपोर्टमध्ये स्पॅम ओळखण्यासाठी मला माझी कर्तव्ये मार्गदर्शन करतात. हे लक्षात घेऊन मी 30 ऑगस्ट रोजी या स्पॅमची ओळख पटविण्यासाठी एकल बैठक घेण्याचे विचार करीत आहे. हा युनिटी वॉक - स्पॅम फ्री भारताचा एक भाग असेल, जे १५ ऑगस्ट, २०२० पासून संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे… मीटअप दरम्यान, मी स्पॅम ओळखण्याचे हे कार्य माझ्या एकटिनेच पार पाडणार आहे म्हणूनच मी एकटिच उपस्थित राहण्याची मर्यादा केली… मी तुम्हाला आश्वासन देते की माझ्या मीटअपच्या दिवशी स्पॅमच्या बर्याचशा अहवाल घेऊन मी रिकॅप मध्ये मांडणार आहे… पुन्हा भेटू… धन्यवाद…
@Shrut19
नमस्कार
मराठीतून “मीट-अप” ची प्रस्तावना लिहिल्या बद्दल अभिनंदन.
आम्हाला मॅप्स तसेच कनेक्ट ची उपयुक्तता वाढवावयाची असेल तर आम्ही प्रादेशिक भाषांचा अधिकाधिक उपयोग जरूर केला पाहिजे.
पण गेल्या आठवड्यामध्ये एका चर्चे मधून एक मजेदार गोष्ट जाणवली.
प्रादेशिक भाषा वापरणे अवघड जाते असा त्या चर्चेचा एकंदरीत सूर होता.
परंतू त्याच भाषेचा प्रयोग काही भारता बाहेरील गट मात्र विशेषत्वाने करतात!