Shalini palace kolhapur

रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील भागात असणारी ही वास्तू म्हणजे शालिनी पॅलेस अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झालेले आहे मात्र आता या इमारतीत चित्रीकरण केले जात नाही. ही वास्तु अतिशय सुंदर रित्या मांडणी केलेली आहे मधोमध घुमट आणि त्या घुमटाखाली घड्याळ हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. सभोवती नारळाची झाडं त्याचबरोबर समोर असणारा रंकाळा तलाव हा मनाला मोहरून टाकतो .

तसंतास तिथे बसावे आणि शहराच्या गर्दीच्या ठिकाणी असून सुद्धा शांतता मनाला आनंद देणार असं हे ठिकाण आहे.

रंकाळा तलावात बोटिंग करताना दिसणारे हे मनोरम दृश्य म्हणजे शालिनी पॅलेस समोरील असणारी नारळाचीं झाड होय.

प्रवेश निषिद्ध असल्या कारणाने ही वास्तू आपण रंकाळा पासूनच आरामात पाहू शकता बाहेरून.

निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं .रंकाळ्यातील पाण्यातून पोहणारे पक्षी, पाण्यावर तरंगणाऱ्या बोटी आणि सायंकाळचा सूर्यास्तावेळी शालिनी पॅलेसच्या मागे मावळतीला निघालेला सूर्य हे एक अप्रतिम अद्वितीय समीकरण म्हणता येईल. याच सोबत तुम्हाला खाद्य भ्रमंती करायची असेल तर तीही तुम्हाला या रंकाळ्याच्या जवळ करता येईल तेथे असलेल्या खाऊ गल्लीत.

नक्की भेट द्या.अशाच ठिकाणांची माहिती घेऊन पुन्हा येणार.

इथे यायला तुम्हाला आधी कोल्हापूर ला यावे लागेल.कोल्हापूरला तुम्ही :blue_car: :motorcycle: :oncoming_bus: :small_airplane: :steam_locomotive: ने येवू शकतात.

इथे तुम्ही लोकल बस किंवा रिक्षाने प्रवास करा.रंकाळा साठी बसेस सहज उपलब्ध होतात.

16 Likes

नमस्कार,

** @Supriyadevkar **

चांगली पोस्ट,

रंकाळा बद्दल बरंच ऐकून आहे, पण कधी योग नाही आला भेट देण्याचा,

शालिनी पॅलेस रंकाळ्या बद्दलची पोस्ट तुम्ही शेअर केल्याबद्दल धन्यवाद…

2 Likes

रंकाळा तलाव हे खरोखरच निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाण आहे.

शालिनी पॅलेसची दृश्ये देखील मनमोहक आहेत.

शेजारील चौपाटी आनंददायी अनुभवात भर घालते :+1:

अप्रतिम फोटो आणि उत्तम माहिती साठी आपले आभार @Supriyadevkar

1 Like

वाह, फारच छान पोस्ट, बरेच वर्षे झाली रंकाळा, शालिनी पॅलेस आणि अंबा बईचे दर्शन घेऊन, पुढच्या सांगलीच्या ट्रीपला ऍड करतो तिकडे जाऊन यायला.

आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद, @Supriyadevkar ताई!

2 Likes

That’s a beautiful building @Supriyadevkar . Clock in middle of the gopuram is stunning to watch. Can I know who build it and in which era. Rankala lake is so beautiful and I can imagine it would be so beautiful in early morning. Thank you for sharing with us this beautiful place.

2 Likes

@Supriyadevkar

Ein wunderbarer Ort und so gut beschrieben.

Dieses Gebäude mit den schönen Rundbögen Fenstern und der Turmuhr sieht Klasse aus.

Dazu noch der See, zur Erholung :+1:

1 Like

@Supriyadevkar mega interesante! Será que van abandonar el edificio?

2 Likes

@Shrut19 नक्की भेट द्या जवळपास बरीच ठिकाणे आहेत पाहण्यासाठी.

2 Likes

@AjitThite नक्कीच बकेट लिस्ट मध्ये ठेवा.या ठिकाणांना कितीही वेळा भेट दिली तरी कंटाळा येत नाही

1 Like

@TusharSuradkar हो नक्कीच खूप सुंदर ठिकाण आहे हे.

2 Likes

It is good to know you enjoyed your outing there @Supriyadevkar

Who did you go with and was it for any specific event or just a tour visit?

Hi @Supriyadevkar fantastic post. The place and the palace does look really good. The architecture does look kind of British time. Nice. Hopefully it is being taken care of by the government.

Keep Guiding!

@AnithaM thanks for appreciation.yes this palace is very old.This palace is built for princess shalini.its very nice architecture and nicely maintained.