नांदेड सिटी मधील हे हॉटेल सुरू होऊन 9/10 महिने झालेत पण इथलं रेट्स बघून कधीतरी स्पेशल प्रसंगी भेट द्यावी असे ठरवले होते. एक दोन जणांनी इथल्या जेवणाचे कौतुक पण सांगितले होते तरी देखील इथला व्हिजिट प्लॅन पेंडिंग ठेवला होता.
मागच्या आठवड्यात नांदेड सिटीत फेरफटका मारताना ह्यांच्या एका ऑफरचा बोर्ड दिसला, रेट्स आवाक्यातील दिसले मग दुपारच्या जेवणाचा बेत इथेच ठरवून टाकला.
आम्ही खलील थाळ्या घेतल्या होत्या
#स्पेशल मटण थाळी : इथे मटण बोकडाचे मिळते, मटण फ्राय, रस्यातील मटण, आळणी सूप, उकडलेले अंडे, चपाती किंवा भाकरी चा पर्याय आहे, इंद्रायणी चिकट भात( मेनू कार्ड ला बिर्याणी लिहले आहे पण हा बदल ऑफर साठी केला असावा)
आळणी सूप मस्त लागलं, सूप वाटी थाळीला दिली तेवढीच परत नाही मिळत. तांबडा रस्सा एक नंबर. एकदम कमी मसाले आणि आळणी पाण्यात बनवलेला वाटला. रस्सा खरंच खूप टेस्टी होता. 4 प्लेट तरी पिला. रस्यातील मटण देखील भारीच (4 लहान पिसेस). मटण फ्राय (4 लहान पिसेस) एकदम सुक्का मसाला वापरून बनवलेलं. हे देखील छान होतं. उकडलेले अंडे होते त्यावर थोडा मसाला टाकला होता हे बरं नाहीतर काही ठिकाणी नुसते उकडलेले अंडे देतात ते बरोबर वाटत नाही. चपाती एकदम ताजी गरमागरम बनवून येत होती, आकार देखील मोठा होता. चिकट इंद्रायणी भात तर एकदम वाफाळलेला आला होता, रस्स्याबरोबर मस्त बेत जमून आला. अगदी घरगुती पद्धतीचे जेवण वाटलं.
#स्पेशल चिकन थाळी:
वरच्या सारखीच थाळी फक्त मटण ऐवजी चिकन. रस्यात मटण आणि चिकन शिजवत असल्याने दोन्ही थाळीचे रस्से वेगवेगळे होते.
जेवण अप्रतिम असल्याने अगदी मनसोक्त जेवलो. ह्या अगोदर एकदा तरी यायला हवं होतं याची खंत वाटली. सर्व्हिस चांगली आहे, बैठक व्यवस्था चांगली आहे, फक्त अधून मधून अशी ऑफर काढत राहावी म्हणजे झालं.
काउंटरवर मालक न्हवते पण सर्व्हिस साठी जे होते त्यांना जेवणाचा फीडबॅक दिला.
खादाड भावा: मदनकुमार जाधव.
पत्ता: हॉटेल आविष्कार,
कलाश्री, बागेश्री रोड वर
Nanded City, Nanded, Pune, Maharashtra 411041
#khadad_bhava #madankumarreview #hotelavishkar #nonveg #positivereview