A
रविवार म्हणजे रस्सावार एकतर वाशाटाचा किंवा मिसळीचा. ह्या रविवारी माझ्या एका पोस्ट वर @user_not_found
chimbalkar सुचवलेल्या अमित मिसळ ह्या स्पॉटला गेलो होतो.
तिघांसाठी तीन मिसळी सांगितल्या, रिधीसाठी उपवासाची मिसळ (70), हिच्यासाठी साधी मिसळ (70) आणि माझ्या साठी स्पेशल मिसळ (120). आपला कोटा जरा मोठा आहे ना!.
5/7 मिनीटात मिसळी आल्या.
उपवास मिसळ: तुपात बनवलेली खिचडी, उपवासाच्या चिवड्याचे 2 प्रकार, कुस्करून केलेला बटाटा, उपवासाची शेंगदाणा चटणी, भरभरुन शेंगदाणे टाकलेली उपवासाची आमटी. खिचडी, शेंगदाणा चटणी आणि आमटी मी थोडी थोडी खाऊन बघितली छान लागली. रिधीला ही मिसळ आवडली.
साधी मिसळ/दही मिसळ: मिसळ मिश्रण, दही, आळणी (हो आळणी सारखीच वाटली मला अगदी) वाटी.
स्पेशल मिसळ: वरील सगळे पदार्थ, सोबत मटकी, फरसाण, शेव, उपवास शेंगदाणा चटणी.
इथलं मिसळ मिश्रण मला आवडले, प्रमाण पण चांगलं आहे. मटकी मस्त होती आणि रस्स्या मध्ये देखील भरपूर प्रमाणात होती. रस्याची तर्री मस्त झनका देणारी होती. 2 बादल्या तरी रस्सा खाल्ला. थाळी मधील थोडेफार आळणी सारख लागणारे काय होतं हे मात्र विचारायचे राहिला. पाव मात्र थंडीने गारठून गेलेले वाटले. हे सोडलं तर बाकी अनुभव चांगला होता.
खादाड भावा : मदनकुमार जाधव
पत्ता: Amit Misal
Hirabaug Chowk, Lokmanya Bal Gangadhar Tilak Rd, Dadawadi, Shukrawar Peth, Pune, Maharashtra 411030
https://maps.app.goo.gl/UmRnFPn9TUJShD5y7
#khadadbhava #madankumarreview #misal #positivereview #amitmisal