(बैठक आढावा ) लोकल गाईड्स कनेक्ट चा ८वा वर्धापनदिन मुंबईत साजरा
नमस्कार,
प्रिय स्थानिक मार्गदर्शक मित्रांनो,
माझ्या आमंत्रण पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे यशस्वी झालेली मीट अप आढावा पुढीलप्रमाणे -
तारीख :- 15 January 2023
वेळ :- 4.30 pm to 5.30 pm
ही बैठक/मीट अप
** @NareshDarji @TusharSuradkar @KashifMisidia **. द्वारे स्थानिक मार्गदर्शकांच्या 8 व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनचा तसेच
#LGAnnivmeetup चा एक भाग आहे.
सध्या काही दिवसांपासून माझी तब्येत तितकीशी ठिक नव्हती, पण दर वर्षी प्रमाणे या सेलिब्रेशन मध्ये भाग घ्यायचाच होता,
म्हणून मी ठरवलं होतं कि ज्या दिवशी @Rohan10 ची Knowledge Sharing Outdoor Meet-up होती त्याच वेळी त्याच ठिकाणी येणाऱ्या लोकल गाईड्स सोबत ८ वा वाढदिवस साजरा करावा.
ठरल्याप्रमाणे मिट अपला वेळेवर पोहचण्यासाठी मी व मयुरी, रोहन व त्याच्या कुटुंबीयांसह निघालो, मयुरी व मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटलो, श्रीमती भाग्यश्री रोहन हि देखील पहिल्यांदाच भेटली पण आम्हाला अनोळखीपण अजिबात जाणवले नाही, मस्त गप्पा मारत आम्ही प्रवास केला, रोहनच्या मिट अप ला वेळेवर सुरूवात झाली, तेथे स्मिता व ईशा ह्या हि मला प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटल्या, पण आम्ही एकमेकांना कनेक्ट व आॅनलाईन मिट अपला अनेकदा भेटलो होतो, त्यामुळे अगदि छान मैत्री आधीच जुळली होतीच, रोहनच्या मिट अप मध्ये लोकल गाईड्स च्या बर्याचश्या माहिती ची देवाणघेवाण झाली, आणि नंतर माझ्या मिट अप च्या वेळेवर माझी मीट अप सुरू झाली, आदित्य व सुमित माझ्या मिट अपचे जुने जोडीदार नेहमी प्रमाणे माझ्या या मिटअपला वेळेवर हजर झाले, श्रीमती भाग्यश्री रोहन यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतः छान व चविष्ट केक बनवून आणला होताच, तसाच तो दिवस भारतीय सणाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मकरसंक्रांतीचा, मग सण आपला साजरा केलाच पाहिजे म्हणून आपल्या भारतीय महिला कनेक्ट मॉडरेटर ईशा ने सर्व उपस्थितांसाठी तीळगुळ लाडू व साखर फुटाणे (मकर संक्रांत विषेश ) न चुकता आणले होते,
अश्या प्रकारे गप्पा मारत, धमाल करत, आपले लोकल गाईड्स व कनेक्ट चे अनुभव शेअर करत, आम्ही मिळून केक कापून कनेक्ट चा आठवा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला…
उपस्थित लोकल गाईड्स पुढील प्रमाणे :-
** @Globe_trotter_Ish , @MayuriKubal , @SUMEET1 , @Aditya_Patil ,**
** @Rohan10 ,**** @Smita_Patil त्यांच्या कुटुंबीयां सोबत**
आणि
@Rohan10 च्या बरोबर त्याची बायको भाग्यश्री व मुलगा अर्हत
उल्लेखनीय उपस्थिती:- लहान लोकल गाईड्स अर्हत व छोटा विराजस
आणि
ऑनलाईन उपस्थिती
**@RosyKohli @Shreeish **
हेही सामील झाले होते,
योगागोगाने माझा वर्ग मित्र राजेश त्याच्या परिवारासोबत त्या ठिकाणी आला असता आमची अनायासे भेट झाली व तेही आनंदाने या आपल्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झाले…