[Recap] Unity Walk - Shantivan, Borivali - East, Mumbai, Maharashtra, India.

A Unity Walk - the great initiative taken by an active Local Guides from India to help small businesses in rebuilding the community during this Pandemic.

Meet up link : https://maps.google.com/localguides/meetup/a-unity-walk-mumbai

21st June, 2020, as it was a Father’d Day, International Yoga Day, World Music Day and Solar Eclipse day. We have also organised around 100+ meet ups as A Unity Walk for helping Small Business in Refocus, Rebuild and Renew or we can say Rising again… a concept and guidance by @TPattanaik @AmbrishVarshney @NareshDarji @deepakjhic .

My heartiest thanks :pray: to @Shrut19 by whom i got inspired to host this meet up. She always helps me. She guided me well by which i hosted this meet up successfully.

In Mumbai, still the lock down is live with some release in restrictions of Shop opening. After lock down of nearly 3 months all small businesses are reopening but people might be unaware of it. So we decided to edit the maps.During meet up we have strictly followed the safety guidelines issues by Government of India i.e. wearing mask and keeping social distancing.

I had choose Shantivan, Borivali - East, Mumbai, Maharashtra, India as my near by area. I started the meet up around 12:00 Hrs. Due to lock down restrictions the it was behind the schedule by 1 Hr.

By visiting one by one shop, i asked shopkeepers about the new timing, reopen status, new phone numbers, delivery service, whats app ordering service etc and also made them aware about the Unity Walk program. They happily gave me full information about their businesses. Like wise i have made following edits during Unity Walk.

  1. Places Reopen: 03 No.
  2. Edits: 12 Nos.(Phone nos and Hours)
  3. Add new places: 03 Nos.
  4. Facts Checks: 43 Nos.
  5. List: 01 No. (List of Chemist in Shantivan, Borivali (E), Mumbai)
  6. Reviews: 14 Nos.
  7. Add Photos: 18 Nos.

Some of the photos during the Meet up are as follows…

06. Glance at Contributions

This was my first meet up as a Host. Its quite a very good experience and nice feeling to help small businesses. I did, not only map edits for small Businesses but also bought something from each and every one as small helping hand towards them. I saw a smile and hope on their faces while doing this meet up. I made aware them about the Google maps which is very useful for their small businesses.

I want to thank everyone who helped me in this meet up. Thank you to you too for reading this post and supporting me .

At last i just want to write a quote by Zig Ziglar that, “You Never Know When Your Helping Hand Will Change Another Person’s Entire Life…”

That why its best to Keep Helping and Keep Contributing…

Thank you…

Stay Safe… Stay Happy…

35 Likes

** @Rohan10 **

नमस्कार…

खुप चांगला रिकॅप ( पुनरावलोकन) मांडला आहेेस भावा, टाळेबंदीच्या कठिण काळात योग्य ती काळजी घ्येेत, तु आपल्या जवळच्या ( युनिटि वॉक) छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी जेे प्रयत्न केलास, नक्कीच वाखाणण्याजोगा आहे…

मीट-अप पुर्ण करुन यशस्वी पार पाडत, अनूभव लेखन हि छान केलेस, आणि ते येथे सामाईक केल्याबद्दल धन्यवाद…

**मित्रांनो तुमचे काय मत आहे ते नक्की कळवा, @SUMEET1 @AjitThite @C_T @TusharSuradkar @RosyKohli @Anil6969 @FalguniP @Rajpatil @yagokd **

आभार…

8 Likes

@Rohan10

Congrats for your successful meet up, in this situation also you went out took the risk God bless you for helping them. Well drafted recap. & photo. Thanks for sharing your experience of unity walk.

6 Likes

@Rohan10 ,

खूप सुंदर रित्या तू हा उपक्रम पार पाडलास त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन!!
एखादं काम मनापासून केले व त्यात आनंद घेतला असेल की त्याबद्दल सांगायला पण एक उत्स्फुर्तता येते आणि खूप छान लिहिले जाते तसे झालेय बघ, अतिशय योग्य मांडणी करत सविस्तर लिहिले आहेस.
पुन्हा एकदा अभिनंदन!! :+1:t3:

मला इथे मत मांडायला प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद @Shrut19 ताई!

5 Likes

टॅग केल्याबद्दल धन्यवाद
@Shrut19

एका युनिटी वॉक चे यजमानपद यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन.
@Rohan10

स्थळांना प्रत्यक्ष भेट दिल्यावर अचूक माहिती मिळते हे नक्कीच.
गेम्बा कायझेन मधून मिळणारे परिणाम नेहमीच ठसठशीत असतात.

या अभ्यासासाठी तुम्ही एखादी तपास-सूची नक्कीच केली असणार. त्या सूचीचा फोटोही येथे समाविष्ट करता यईल? आणि एखादा ग्रुप फोटो?

तसेच, या मोहिमेत काही दुकानदार त्यांचे व्यवसाय क्लेम करण्यासाठी तयार झाले का?

अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे यामधील किती व्यवसायांची नावे नकाशे मध्ये मराठीत दिसतात? ते सहजरित्या आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला सर्वसाधारण पणे जी देवनागरी अक्षरे दिसतात ती मराठीमध्येच असतील हे ठामपणे सांगता येत नाही.
त्या साठी, सेंटिन्ग मध्ये “मराठी” भाषा निवडावी लागते. नंतर, संपादन करण्यासाठी ते स्थळ आपण उघडल्यावर , जर एक रिकामा “प्लेस होल्डर” आणि त्यावर “मराठी मध्ये नाव जोडा” अशी सूचना दिसली, तर ती त्रुटी लक्षात येईल.

अर्थात नकाशे तसेच कनेक्ट वर आपल्या स्थानिक भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करावा हे मी सतत सुचवत असतोच. आणि भाषांतरामध्ये होणारे विकृतीकरण आपल्याला टाळता येते हे ही मी उदाहरणा सहित दाखवून दिले आहे.

6 Likes

Wow, you did a really great job my dear @Rohan10

Congratulations for your successful meetup.

Take care and stay safe.

7 Likes

Hi @Rohan10

Nice Meet up an great job my friend!

Thanks a lot for sharing to us this great works!

Have a nice day my friend?

By the way I am missing you at posts from last few days!!

Are you ok my dear friend?

Pls keep safe and healthy as well⚘⚘ :green_heart: :pray: :handshake:

5 Likes

धन्यवाद @Shrut19 . तुझ्यामुळेच हि युनिटि वॉक करू शकलो…तुला खूप खूप धन्यवाद ताई… :blush:

6 Likes

Thank you so much @RosyKohli madam. Thank you for your kind words :pray::blush:

6 Likes

खूप खूप धन्यवाद @AjitThite दादा… तुमच्या दिलेल्या प्रोत्साहनामुळे अजून आनंद होतो. तुमचे मनःपूर्वक आभार… :blush: :pray:

5 Likes

मनःपूर्वक धन्यवाद @C_T जी… आपल्या खालील काही प्रश्नांचे उत्तर मी देत आहे…

१. या अभ्यासासाठी तुम्ही एखादी तपास-सूची नक्कीच केली असणार. त्या सूचीचा फोटोही येथे समाविष्ट करता यईल? आणि एखादा ग्रुप फोटो?

उत्तर. यायुनिटी वॉक साठी आम्ही एक whats app ग्रुप तयार केला होता. त्यात नक्की काय काय करता येईल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नकाशे संपादने, तथ्य तपासणी, नवीन स्थळे जोडणे, प्रश्न व उत्तरे याबद्दल एक नमुना विडीओ सुद्धा तयार करण्यात आला होता. तो @deepakjhic यांनी बनवला होता. यामुळे हि युनिटी वॉक भेट सादर करायला काही त्रास नाही झाला. सध्याच्या या परिस्थितीमुळे माझ्यासोबत कोणी नव्हते. म्हणून ग्रुप फोटो पण नाही.

२. तसेच, या मोहिमेत काही दुकानदार त्यांचे व्यवसाय क्लेम करण्यासाठी तयार झाले का?

उत्तर. होय, त्यांना याविषयी सांगितल्यावर त्यांचा होकार आला आणि मग मी त्यांचा व्यवसाय नकाश्यावर जोडला. काही जणांना तर असेही वाटले कि यासाठी त्यांना पैसे भरावे लागतील कि काय. पण त्यांना सगळे सांगितल्यावर याबाबतीत ते अवगत झाले.

३. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे यामधील किती व्यवसायांची नावे नकाशे मध्ये मराठीत दिसतात?

उत्तर. हे वाचून मी स्वतः प्रयत्न केला. तेव्हा असे आढळून आले कि मी सेंटिन्ग मध्ये न जाता सरळ मराठीत नाव टाईप केले तर जे हवे आहे ते स्थळ येते पण तेव्हा मोठ्या फोंट मध्ये इंग्लिश नाव असते आणि त्याच्या खाली मराठीत नाव असते. आता मी सेंटिन्ग मध्ये जाऊन मराठी भाषा निवडली. तर आता उलटे झाले. मोठ्या फोंट मध्ये मराठी नाव आले आणि इंग्लिश नाव त्याच्या खाली आहे.असे मला निदर्शनास आले.

तुमच्याशी मी सहमत आहे. कि आपल्या स्थानिक भाषेला प्राधान्य दिले पाहिजे.

सर्व जण आपली whats app ग्रुप आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुनःश्च एकदा धन्यवाद :blush: :pray:

5 Likes

Thank you so much @NareshDarji bhai… Your help and guidance met this unity walk successful… :blush: :pray:

5 Likes

Hello dear @MAHBUB_HYDER sir… Thank you so much for your kind words :blush: :pray: .

Yes i am absolutely fine. Yes my next post will be posting soon. I am so much thankful for your concern sir :blush: :pray: .

Thank you once again…

4 Likes

great work @Rohan10

it is an amazing way to contribute on maps and help local business…

as we are still under lock down having latest updates about near by places is very helpful for all

4 Likes

Hey @FalguniP thank you so much for your support and kind words… Thank you… :blush: :pray:

3 Likes

उत्तरा बद्दल धन्यवाद
@Rohan10

माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी पीओआय शांतीनाथ ड्राई-फ्रूट आणि जनरल स्टोअर्स घेतल्या. आपला फोटो त्या ठिकाणी कव्हर म्हणून दिसतो.
मी संपादनासाठी पीओआय उघडला. त्या चा स्क्रीनशॉट याप्रमाणे.

मराठी मध्ये नाव जोडा ही सूचना सुस्पष्ट आहे.

तुम्ही यात “शांतोनाथ ड्राय फ्रुट आणि जनरल स्टोअर्स” किंवा “शांतीनाथ सुकामेवा आणि सामान्य भांडार” यापैकी कुठलेही एक नाव तेथे समाविष्ट करू शकता. आणि, माझ्या अनुभवाप्रमाणे अशी संपादने सहसा नाकारली जात नाहीत.
तसेच हे दुकान मला रस्त्याच्या मधोमध दिसत आहे. पिन लोकेशन दुरुस्त करणेही गरजेचे आहे.

तुमच्या लेखात दिसलेली अन्य स्थळेही मी तपासली. बहुतेक सर्व ठिकाणी तीच परिस्थिती आहे. आपल्या सभोवतीच्या परिसरात आपण मराठी नावे समाविष्ट करू शकलो तर एक महान काम होईल.

4 Likes

मस्तच…आता सगळे स्पष्ट झालं आहे… खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितले. नक्कीच मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे सगळे संपादन करेन. तुम्ही दिलेल्या अमूल्य मार्गदर्शन बद्दल खूप खूप धन्यवाद @C_T जी… :blush: :pray:t2:

3 Likes

नमस्कार @C_T जी…

आपण सांगितलेल्या प्रमाणे मी मराठी भाषेत दुकानाचे नाव संपादन केले आहे. पण त्यातले काही मंजूर झाले आणि काही बाकी आहेत. आता हळू हळू मी सगळे मराठीत नावे संपादन करायला सुरुवात केली आहे. काही स्क्रिन शॉट जोडत आहे त्यात अजुन काही सुधार करावयाचा असल्यास कृपया कळवावे. आपण केलेल्या मार्गदर्शन बद्दल खुप धन्यवाद… :blush: :pray:t2:

3 Likes

उपक्रम मनापासून चालू केल्याबद्दल धन्यवाद
@Rohan10

भाषांतरे ठीक आहेत.
मूळ नावे इंग्रजी सज्ञांचा वापर करीत असल्यामुळे त्यात बदल करण्यास फारच कमी वाव आहे.

तरीही, मी या लेखामध्ये त्यावर काही भाष्य केले होते. त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.

अशा संपादनामध्ये मी ६० ते ७० टक्के “स्ट्राईक रेट” पाहिला आहे.
जसजसा तुमचा “ट्रस्ट स्कोअर” वाढत जाईल त्याप्रमाणे यशस्वी संपादनाची संख्याही वाढत जाते.

परंतु पॉईन्ट्स च्या पुढे जाऊन मला त्यात इतरही अनेक फायदेही दिसतात.

स्थान निर्मात्यांनी केलेल्या अनेक चुका लक्षात येतात. यात मूळ इंग्रजी नावातील चुकाही तसेच “कॅटेगरी” च्या चुकाहीअंतर्भूत आहेत आणि त्या सुधारण्यातही काहीच गैर नाही.

मला अनेक मनोरंजक चुकाही पाहायला मिळाल्या. काही उदाहरणे म्हणजे उच्च शिक्षणासाठी “Collage”, लेखन साहित्य विकणारी “Stationary” दुकाने,
“panchar shap” म्हणजे काय हे फक्त टायरचे चित्र बघितल्यावरच कळेल.
मिठाई आणि “bakary” तर अगणित!
आणि पूर्वी एका छोट्या उपक्रमा मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने या सर्वांचे शब्दशः भाषान्तर केले हा तर मोठाच विनोद.

अनावधानाने निर्माण झालेली “डुप्लिकेट” स्थाने पाहण्यात येऊन ती मिटवता येतात.

मूळ मराठी नावाचा उच्चार काय आहे ते इतरांना समजू शकते.

आपण मराठी भाषांतर अंतर्भूत केल्यावर त्यापुढे एक “स्पीकर आयकॉन” दिसायला लागते आणि नक्की उच्चार काय आहे त्याची
अ-मराठी भाषिकानाही कल्पना येते.

पुढील प्रयत्नांमध्ये तुम्हाला शुभेच्छा.

1 Like

Nice recap @Rohan10