हा युनिटी वॉक - स्पॅम फ्री भारताचा एक भाग होता, जे १५ ऑगस्ट, २०२० पासून संपूर्ण भारतभर राबविण्यात आला,
भारतातील माझ्या बऱ्याच लोकल गाईड सहकाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता,
मी माझ्या मीटअपच्या ॲप्लीकेशन पोस्टमध्ये म्हणाल्याप्रमाणे,
गूगल नकाशा आता आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे आणि तो लोकांना त्याच्या स्वतःच्या तसेच अनन्य मार्गाने खरोखर मदत करतो, पण नकाशावर चुकीच्या माहितीमुळे, चुकीच्या जागेचे फोटो, चुकीच्या व्हिडिओंमुळे नकाक्षा वापरकर्तांची या अशा चुकीच्या नकाशावरून दिशाभूल होते, मी स्थानिक असण्यामुळे मी 30 ऑगस्ट रोजी या स्पॅमची ओळख पटविण्यासाठी एकटिनेच बैठक घेतली कारण तर तुम्हाला माहितीच आहे कोविड मुळे मुंबईत अजूनही आपल्या महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर विनाकारण करण्यास मनाई आहे, म्हणून कोणत्याही जागेवर प्रत्यक्ष भेट न देता, घरी बसून नकाशा उघडून त्यातील माझ्या ओळखीच्या गूगल मॅपमधील जागांवर स्पॅम मला जमेल त्या पद्धतीने शोधून काढून रिपोर्ट केला आहे…
मीटअप दरम्यान, मी स्पॅम ओळखण्याचे हे कार्य माझ्या एकटिनेच पार पाडले त्यामुळे मीटअप अटेंडिंज चा काही प्रश्नच उद्भवत नव्हता, तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे माझ्या मीटअपच्या दिवशी स्पॅमच्या अहवाल मी येथे रिकॅप मध्ये या लींक द्वारे मांडत आहे…