नमस्कार,
प्रिय स्थानिक मार्गदर्शक समुदाय,
मी कृतज्ञतापूर्वक जाहीर करू इच्छितो कि मी आणि एलजी @TusharSuradkar (सह-होस्ट) यांच्या सोबत मराठी मीट अप-०२ यशस्वीरित्या पार पाडली.
मराठी भाषिकांच्या चर्चासत्र ०२ मध्ये
०१. @Tushar_Suradakar तर्फे कनेक्ट वर कश्या प्रकारे मराठीचा वापर
आणि
०२. माझ्या तर्फे नकाशावर रोड कसे संपादित करावे यासाठी
असे आम्ही एकत्र येण्याचे ठरविले.
मला असे वाटते की आम्हाला खरोखर ज्ञान सामायिकरण व्यासपीठाची आवश्यकता आहे म्हणून आपल्यातील काहींनी एकत्र येऊन यासाठी संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. या चर्चा सत्राची तयारी करताना खूप काही नवीन शिकायला मिळाले. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाला अडचण आली तर निस्वार्थ पणे मदत करणारे माझे सर्व लोकल मार्गदर्शक सहकाऱ्यानी मुळे एखादी मीटअप होस्ट करणे काय असतं आणि त्याची पूर्व तयारी कशी करावी हा सर्व अनुभव मिळाला आणि बऱ्याच मित्रांची साथ पण मिळाली.
सुरुवात झाली ती मीटअप चे बॅनर कसे तयार करावे ??
बॅनर तयार करायला हाती घेतला पण मला त्यात खूप अडचणी आल्या पण म्हणतात ना “a friend in need is a friend indeed” असेच काही घडले माझ्या सोबत आणि सर्व मित्र धावून आले व काय छान बॅनर तयार झाला. हि तर माझ्यासाठी एक प्रेरणाच होती, बॅनर पाहूनच मीटिंग बद्दल काय लिहावे असा विचार करता करता मी ते लिहले व अश्या प्रकारे एप्लीकेशन मॅटर तयार झाले.
चर्चासत्राची माहित नव्हती अडथळे खूप आले पण ते नाहीसे होत गेले फक्त माझे LG मित्रानं मुळे.
मीटिंग ची वेळ जवळ येत असतांनाच तर त्याच दिवशी सकाळी उठून घरातील कामे आटपून घेतली आणि मीटअपची तयारी करायला बसणारच तोच पावसाचा जोर वाढला वडिलांनी कॉल करून मला शेतात बोलावले कि सर्व पिक पाण्यात आहे तू लवकर ये मी तसाच उठून शेतात गेलो आणि बराच वेळ माझा शेतात गेला. शेवटी ते काम झाले पण काय मीटअपची तयारी अधुरीच राहीली, तरी ही घरी मी थोडा वेळ मीटअप व तयारीसाठी काढला. पण म्हणतात ना काही चांगल्या कामात अडथळा येतो. तो अडथळा होता विजेचा. आता त्यातही वीज गेली होती . हा प्रश्न निर्माण झाला काय करावे काही सुचेना मोबाईल बॅटरी चार्जे कशी तरी पूर्ण चार्ज झाली.
वेळ आली माझ्या मीटअप ची.
हो आणखीन एक अडथळा म्हणजे माझ्या कडे कॉम्पुटर नाही पण मग मला मदत मिळाली ती LG मित्रांची त्यांनी मला कॉम्पुटर साठी आवश्यक ते बाबी घेऊन स्वतः ती जिम्मेदारी उचलली.
आभार आहेत त्यांचे सर्वांचे ज्यांनी मला हि मीटअप बद्दल सर्व प्रकारची मदत केली.
मिटिंगचा शेवट आमचे सहकारी LG @ModNomadDeepak Modgekar सर यांनी शोले चित्रपटातील “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे” या गाण्याचे माऊथ ऑर्गनचा वापर करून उत्तम असे सादरीकरण करून मिटिंग चा शेवट गोडच केला.
गुगल मॅप व कॅनेक्ट वर सक्रिय असणारे वरिष्ठ एलजी @C_T यांच्याकडून मार्गदर्शन साठी उपस्थिती मिळविणे हे एक भाग्यच आहे,
रिकॅप वाचून प्रतिक्रिया नोंदवावी अशी मी मोहन व सह-होस्ट Tushar Suradakar विनंती करतो सोबत तुमचे आभार मानतो.
मीट अप दरम्यानचे काही स्क्रीन शॉट खाली दिलेल्या लिंक मध्ये जोडले आहेत.
अरे वाह @mohanghyar खूप छान रिकॅप लिहिला आहेस. आणि मीट अप पण खूप मस्त झाली. रस्ते जोडणी बाबतीत चांगली माहिती दिलीस. मीट अप मध्ये चर्चा हि छान झाली तसेच सर्वांनी चर्चेमधे सहभाग पण घेतला. तुझी पहिली मराठी मीट अप यशस्वी झाल्याबद्दल तुझी खूप खूप अभिनंदन. तसेच @TusharSuradkar चे सुद्धा आभार…
सर्व प्रथम यशस्वी मीट अप बद्दल अभिनंदन. खरंच मीट अप सर्व अडचणींवर मात करून खूप छान निभावून नेली तुम्ही आणि सर्व सहकाऱ्यांनी सर्वांचे मिळालेले मार्गदर्शन आणि तुम्ही शिकवलेली रस्ते जोडणीची पद्धत अतिशय उपयोगी ठरेल. असे म्हणतात “शेवट गोड तर सारेच गोड” @ModNomad यांनी तर बहार आणली छान रिकॅप
तुझ्या सोबत मीटप आयोजित करून खरोखर फार आनंद वाटला.
तुझी तयारी छान झाली होती आणि रस्ते जोडणीचा अतिशय अवघड डेमो देखील उत्तम झाला.
तुझे या बाबतचे ज्ञान सखोल आहे आणी ते तू सहज सोप्या पद्धतीने मांडलेस.
तसेच आपण सर्वानी मिळून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवली यात या मीटपचे यश सामावले आहे.
@C_T सरांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले ही आपल्या सर्वांसाठी पर्वणीच.
यापुढे देखील महत्वाच्या विषयांवर सीके सरांच्या चौफेर माहिती खजिन्याची सर्वानी लूट करून घ्यावी ही अपेक्षा आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या @AjitThite दादाने एकहाती तुझे मिटप आपल्या कॉम्पुटर वरून होस्ट केले याचे विशेष कौतुक आणि मी वैयक्तिकरित्या अजितचे आभार मानतो.
इतरांचा सर्वाधिक विचार करणारी @Shrut19 ताई हे आपले प्रेरणास्थान - तुझे आभार आणि कौतुक कितीही करावे, कमीच ठरेल.
@MayuriKubal - पुढील मीटप साठी पुढाकार घेतलास याचे आपल्या ग्रुपला औत्सुक्य आहे. यावर लवकरच तुझ्याकडून काही माहिती मिळेल अशी अशा करूया.
Congrats for successful meet up, thanks for the recap, I never did map editing you had explained in so easy & simple way thanks. Waiting to attend such more meet up. Your this poster slide is awesome.
@Shrut19 Thanks for letting me know about the marathi meet up.
खूप छान रिकॅप लिहिला आहे @mohanghyar ! तुझी पहिली मराठी मीट अप यशस्वी झाल्याबद्दल तुझी खूप खूप अभिनंदन.रस्ते जोडणी बाबतीत चांगली माहिती दिलीस आणि मीट अप मध्ये चर्चा हि छान झाली. अभिनंदन !
खूपच छान लिहिला आहेस वृतान्त! मजा आली, तू खुप सोप्या भाषेत सांगितले त्यामुळे खूप सहज लक्ष्यात आले. सगळे जण आवर्जून आले त्याचाही खूप आनंद झाला. ही भरारी अशीच राहू दे हि आशा करतो. सर्व सदस्यांनी भाग घेऊन मीटिंगला रंगत आणली, @MayuriKubal ने सांगितलेली व्हॉइस टायपिंग चे तंत्र सर्वांना उपयोगी पडायला लागले. @Shreeish चे न संपणारे प्रश्न आपण सर्वांनी मिळून त्याला दिलेली उत्तरे हे सर्व मिटिंग साठी अतिशय उपयुक्त वातावरण निर्मिती करणारे होते. , @RosyKohli मॅम ने मीटिंगला आल्याचा आनंद पण झाला. @Rohan10@TusharSuradkar@C_T सर @Shrut19 ताईंनी हा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे त्याचा मी एक भाग होऊ शकतोय त्याचा मला खूप आनंद आहे. @DBMSysFoto शेवटी शोले च्या ट्यून ने “चार चांद” लावले.
तसेच सर्व मार्गदर्शक सहकाऱ्यांच्या उपस्थिती मुळे चर्चासत्रात रंगत आली व @Shreeish या नवीन सदस्याचे सर्व काही एकाच दमात जाणून घेण्यासाठीची धडपड ( उत्कंठा ) हि जणू आपल्या अनुभवाांची परीक्षाच असल्याचा भास होत होता…
वरीष्ठ मार्गदर्शक श्री @C_T सर यांचे खरंच खूप आभार नेहमी धावून येणारे .
चर्चासत्राचे माझे सहभागी @TusharSuradkar दादा यांचे काय खरंच खूप अनुभव देऊन जातात आणि बरेच काही शिकून पण जातात.
ताईचा तर स्वभावच भारी सरळ बोलून टाकते राग येऊ का नको असे होते तिचे बोलणे तसे आहे पण काय ताई हि ताईच असते ना परत तिचं आपल्याला मदत करण्यास धावून येते. @Shrut19
अजित दादा म्हटले कि फक्त समजूतदार पण असे म्हणतात. आपण कितीही चुका करा पण ते कधीच राग नाही किंवा जीवावर नाही येणार कितीही चुका करून मला त्याच्या कडून दुरावा नाही वाटला. @AjitThite
एक तरी मित्र हा जिवाभावाचा असावा आपल्या मूल्यवान वेळ काढून काही गरज असली तर फोन कर असे म्हणणारा. असा आहे रोहन @Rohan10
इशा ताई जरी विदेशात असली तरी मन मात्र तिचे स्वदेशीच आहे. तेथून का होईना ती संपर्कात नेहमी असणार प्रत्येक मीटिंग ला उपथितही राहणार. @Globe_trotter_Ish
रोझी जी ची गोस्ट न्यारी मराठीचा शोक भारी. @RosyKohli
“ये दोस्त हम नहीं छोडेंगे” या गाण्याचे बोल माऊथ ऑर्गन या वाद्यावर सर्वाना मंत्रमुग्ध करणारे दीपक जी नेहमी काही तरी नवीनच करून दाखवत असतात. @ModNomad
काही का होईना मला या मराठी मीटिंग मधून एक अनुभव नक्की आला कि " मित्राची साथ तर संकटावर मात"
लय भारी मित्रा @mohanghyar एकदम काव्यात्मक लिहीले आहेस. खरंंच, जर असेल दोस्तांंची साथ तर कशाला उद्याची बात ही मैत्री कायम अशीच रााहो. @AjitThite मस्त animation
उत्कृष्ट चर्चा सत्र आणि त्याहूनही सुरेख वृत्तांत लिहिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मित्रांनो
मराठी चर्चा सत्राची साखळी सुरु झाली याचा मला खूप अभिमान आहे. “𝐴𝑝𝑝𝑟𝑒𝑐𝑖𝑎𝑡𝑖𝑜𝑛 𝑖𝑠 𝑡ℎ𝑒 𝑔𝑟𝑒𝑎𝑡𝑒𝑠𝑡 𝑚𝑜𝑡𝑖𝑣𝑎𝑡𝑜𝑟” असे म्हणतात. इथे सहभागी झाल्यावर मला माहेरी आल्याचा आनंद होतो, कारण आपण सर्वांवर कौतुकाचा वर्षाव करून सतत एकमेकांना प्रेरणा देत असता. हीच खरी उत्तम संघ-भावनेची गुरुकिल्ली आहे.
खरे सांगायचे झाले तर मॅप्स च्या बाबतीत आपण सर्व जण खूप जाणकार (miles ahead) आहात आणि माझ्या सारख्या कायम नवशिख्याला खूप काही आत्मसात करायला मिळते. इच्छा असूनही कनेक्ट वर ताबडतोब उत्तर देणे मला काही जमत नाही - त्याबद्दल क्षमस्व . आज जेव्हा पाहिले तेव्हा माझ्या एका छोट्याश्या कामगिरीबद्दल आपणा सर्वांनी तोंड भरून कौतुक केले आहे. अतिशय बरे वाटले.