Recap: [Hybrid] India, February 02, Shegaon Support Local Business LG10 Meet-up

शेगाव कचोरी सेंटर स्थानिक व्यवसाय समर्थन मेळाव्याचा आढावा

नमस्कार
रविवारी २ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष उपस्थितीची वेळ होती सकाळी १०.०० से १०.3०. तसेच
वर्चुअल उपस्थितीची वेळी १०.४५
मी महाराष्ट्रातील शेगांव, भारत मध्ये
#SuportSmallBusiness चा भाग म्हणून,
गगनस् शेगाव कचोरी येथील मीट अपचे एक छोटा स्थानिक व्यवसाय समर्थन मेळावा आयोजित केला होता.
या मीट अप चे मुख्य उद्दिष्ट स्थानिक व्यवसायिकांशी प्रत्येक्षात भेटून त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन गुगल मॅप व #GoogleMyBusiness ची फिचर्स कसे त्यांना उपयोगी आहेत ते समजवून सांगितले तसेच या उपक्रमात त्यांचा सहभाग जाणून घेतला, गुगल मॅप मध्ये त्यांच्या व्यवसायाबद्दल काहि तृटी नाही आढळल्या पण त्यात त्यांना काही सुधारणा समजून सांगितल्या, Google Maps Local Guides म्हणून, त्यांची ऑनलाइन उपस्थिती आणि दृश्यमानता वाढवण्यासाठी कसे योगदान देऊ शकतो ? हे शोधणे हा या मेळाव्याचा उद्देश होता, तो उद्देश मी सर्व उपस्थितांच्या मदतीने पुर्ण केला.
आमच्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हि आहेत उपस्थितांची नावे
@Nilesh @MohanG
@SagarKanherkar @PTrivedi
@ShubhamWaman @Raj_Tayade @Gagan009

शेगाव कचोरी सेंटरचे मालक गगन शर्मा (जे खुप जूने भारतीय लोकल गाइड देखील आहेत) त्यांच्या गगनस् शर्मा शेगाव कचोरी सेंटरमधील सर्व प्रकारच्या कचोऱ्या व चहा कॉफी स्वादिष्ट होते आणि सॅन्डविच कचोर्‍या तर खूपच उत्कृष्ट होते, ज्याचे क्रियेशन त्यांच्या मोठ्या मुलाने केले,
मालकांनी आमचे खूपच छान स्वागत केले.

त्यांचा हा पहिला लोकल गाइड मेळावा असल्यामुळे ते खूप उत्साही होते.
आम्ही आभार आणि समर्थन म्हणून, आम्ही मालकाला वस्तू भेट, तसेच स्टिकर्स दिलेत आणि व मालकाने त्यांच्या दुकानातील खासियत असलेल्या काही फेमस खाद्यपदार्थ आम्हा सर्व अटेंडिज ना भेट म्हणून दिले.

हे मीट अप स्मॉल बिझनेस ला सपोर्ट करणारे तसेच
हि मीट अप @NareshDarji यांच्या 10 Year’s of Local Guides
या सेलिब्रेशन उपक्रमात सामील
उपक्रमाचा एक भाग असल्याने प्रणवने मला भेट दिलेले स्टिकर्स मी दुकानावर “Support Local Guides” स्टिकर लावले.

या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊन, आम्ही गगनजींचा निरोप घेत आजूबाजूच्या परिसरात थोडा वेळ फिरलो, इतर व्यवसायांची दुकानाचा दर्शनी भागाचे फोटो घेतले काही प्रमाणात खरेदि केली त्या दुकानात हि आपल्या सपोर्ट स्माॅल बिझनेस चे स्टिकर्स लावले आणि Google Maps वरील माहिती अचूक आणि पूर्ण असल्याची खात्री करण्यासाठी ती संपादित केली. स्थानिक व्यावसायिक समुदायात योगदान करण्याचा हा एक योग्य प्रयत्न केला होता..

या लांब ५५५ + किलोमीटर प्रवास करून शेगाव अकोला महाराष्ट्र च्या भेटित मी काय मिळवले, तर आम्ही उपस्थितांनी शेगाव ते अकोला येथील छोट्या छोट्या उद्योजकाला प्रोत्साहन देत, त्यांच्या कडुन काहि ना काही खरेदी करत सपोर्ट स्माॅल बिझनेस या उपक्रमाला हातभार लावला, तसेच
राज दादा संभाजी नगर, प्रणव अहमदाबाद तसेच शुभम वामन यांच्या दोन दिवस खूप छान घालवले, लोकल गाईड्स च्या आठवणी निर्माण केल्या, प्रत्येक उपस्थित लोकल गाईड्शी छान घट्ट नात निर्माण झाले,
गणेश वाघ @Tiger707 व गगन शर्मा या कमी ऍक्टिव असले तरी मार्गदर्शकपणा रक्तात भिनलेले
लोकल गाईड्स मिळणे म्हणजे नशिबच म्हणावे, त्यांना त्यांच्या शहरात जाऊन भेटणे म्हणजे योगच यावा लागतो.

शेगाव संत श्री गजानन महाराजांचे दर्शन तसेच अकोला लोकल गाईड आणि माझे आदल्या दिवशी चे होस्ट मोहन व को होस्ट सागर यांनी माझा प्रवास व शेगाव अकोला येशील माझे किंवा आमचे राहणे अगदि सुखकर केले, त्यांचे आभार..
तसेच उपस्थिततांनी येताना आमच्या साठी लोकल गाईड्स चे स्टिकर्स आणलेले,
तसेच प्रणवने लोकल गाईड्स प्रोग्राम ला दहा वर्षे पूर्ण झाली त्याचं टिशर्ट आम्हाला भेट म्हणून दिले त्याबद्दल प्रणव व राज दादा व शुभम चे धन्यवाद..

वर्चूअल उपस्थिती साठि यांचे मना पासून धन्यवाद :folded_hands:
@indahnuria @PrinceKumar @RosyKohli
@nomadicsatyam @Mahabubmunna
@Gurukrishnapriya @saksham_tambe @Soniak @Ajitthite @TusharSuradkar @Viranchi Ancharwadkar @ModNomad @NareshDarji @deepakjhic @WonderMacHingura @Tejal @The_Shreeish @SARATH

शेगाव गगनस् कचोरी सपोर्ट स्माॅल बिझनेस फोटो लींक

Check out this review of Gagan’s Shegaon Kachori on Google Maps

#10YearsofLocalGuides #LocalGuides10
#LetsGuide
#LocalGuides
#LG10Meet-up

35 Likes

छान पुनरावलोकन आणि फोटो! तुमचा हा उपक्रम खूप चांगला होता आणि छोट्या व स्थानिक उद्योगांना गुगल नकाशावर योग्य प्रकारे मदत करणारा ठरला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

6 Likes

@Shrut19
श्रुतिका ताई वा छान recap.
अतिशय सुंदर

5 Likes

कव्हर फोटो मस्त

6 Likes

Good recap for meet-up please add link of location and photos links @Shrut19

5 Likes

छान आहे रिकॅप आणि फोटो सुद्धा. @Shrut19 ताई, तुझा हा उपक्रम अगदी योग्य प्रकारे हाताळला गेला आणि छोट्या आणि लोकल उद्योगाला गूगल मॅप्स वरती योग्य प्रकारे मदत देणारा ठरला ह्याबद्दल अभिनंदन.

धन्यवाद.

4 Likes

छान recap लिहिलात…:ok_hand:t2:त्यातून meet up ची पार्श्वभूमी कळली.,
सर्व photo’s देखील छान आहेत…:ok_hand:t2::hugs:
खूप खूप अभिनंदन…:hugs:

3 Likes

Congratulations :tada::tada:

2 Likes

Wow… Great RECAP, dear @Shrut19 ,
I tried to join you… but unfortunately, there was severe connectivity problem (I was in Kerala).
I fully agree with our @Raj_Tayade… Your cover photo is very impressive :+1:
Well covered RECAP… highly appreciate…
Thanks for sharing…
:handshake::tada:

3 Likes

@Shrut19
Excellent event at Shegaon

2 Likes

Well written recap @Shrut19 . I felt as if I attended your meetup in person. Hopefully we should meet soon. Thanks for tagging me.

3 Likes

नमस्कार
@NareshDarji
वा छान मराठी,
धन्यवाद :pray:
पुनरावलोकन आणि फोटो आवडले हे पाहून छान वाटले,
हा उपक्रम तुमच्या उपक्रमाचा एक भाग होता, आणि नेहमी प्रमाणे मला छोट्या व स्थानिक उद्योगांना गुगल नकाशावर योग्य प्रकारे मदत करता आली, त्याबद्दल तुमचे आभार!

3 Likes

नमस्कार
@MohanG
धन्यवाद …
तुझी व सागर ची खुपच मदत झाली, शेगाव व अकोला, तुझ्या घरचा पाहुणचार अविस्मरणीय अनुभव होता…

@Raj_Tayade
नमस्कार दादा,
छान वाटले तुम्हाला फोटो आवडला,
तुमच्या उपस्थिती साठी खूप धन्यवाद, ती आमच्या साठी अमूल्य होती…

2 Likes

छान रिकॅप @Shrut19 ताई :+1:

लहान उद्योगांना प्रात्साहं देऊन स्वादिष्ट कचोरी असा दुहेरी आनंद लोकल गाईड्सनी मिळवला
सर्वांचे अभिनंदन :bouquet:

3 Likes

वा मस्त रिकॅप :ok_hand:t2: @shrut19 ताई.
तुझ्या मीट च्या निमित्ताने लघु उद्योगांना प्रोत्साहन देता आले. खूप छान वाटले सर्वांना भेटून.
लवकरच भेटूया परत आपण सर्व :pray:t2:

3 Likes

@Ptrivedi
नमस्कार
आप गुजरात से शेगांव इतनी दूर ट्रैवल करके आए इसीलिए आपकी उपस्तिथि और स्मॉल बिजनेस को बढ़ावा देने की जानकारी हम सभी के साथ शेयर करने के लिए शुक्रिया।
और 10 साल के सेलिब्रेशन की टीशर्ट के लिए धन्यवाद :pray:

1 Like

@AjitThite
नमस्कार दादा,
वा छान तुला फोटो आवडला,
सर्व बॅकग्राऊंड पाठिंब्या साठि धन्यवाद…

@Shubhu1

नमस्कार,
छान वाटले तुला फोटो आणि रीकॅप आवडला,
शुभेच्छां साठी खूप धन्यवाद.

1 Like

@Shrut19
Wow beautiful photos and recap,i enjoyed attending Virtually.Sorry couldn’t join you & @MohanG Meet up physically my mom needed me .My sister went to Prayagraj so couldn’t join you all.
But was happy to see you all , having :yum: yummy breakfast Kachori next time get for us who ever goes shegaon.

Caption: Screenshot taken by me.

3 Likes