कोकण ट्रिप आणि खाद्यभ्रमंती भाग 1:
मोठा विकएंड होता त्यानिमित्ताने अचानक प्लॅन केलेली ही कोकण ट्रिप. अचानक ठरल्याने अगदी महाड मध्ये पोचल्यावर होमस्टे चे बुकिंग कन्फर्म झाले ते पण एका रात्री साठीच. संध्याकाळी 7 ला पोचलो असेन. आर्वी बीच ला पेवेकर खानावळ ह्यांच्याकडे राहायचा बुकिंग केले होते,ह्याचा गुगल रेटिंग 4.8 आहे आणि हितचिंतकांनी देखील हेच सुचवलं होतं. थोडं फ्रेश होऊन, जेवणाची ऑर्डर दिली आणि तो पर्यंत 2 मिनिटाच्या अंतरावरच असलेल्या बीच कडे रिधी आणि मी धूम ठोकली. गार वारा, लाटांचा नाद एकदम मस्त मोहोल. 10/15 मिनिटं वेळ घालवून जेवायला आलो.
आम्ही खालील थाळ्या घेतल्या होत्या.
सुरमई थाळी (400): सुरमई फ्राय, कोळंबी करी, सोलकडी, भात, चपाती, भाकरी चा पर्याय आहे. सुरमई फ्राय एकदम भारी होता, फिश करी मला जास्त आवडत नाही त्यामुळे ही मला ठीकठाक वाटली. सोलकडी मस्त.
खेकडा थाळी (450): थाळी वरच्या सारखीच फक्त सुरमई ऐवजी एक मोठा भरलेला खेकडा आणि फोडायला पक्कड. खेकडा एकदम भारी होता. त्यात भरलेला मसाला तर एक नंबर.
दोन्ही थाळ्या लिमिटेड होत्या, जे काय जास्तीचे घ्याल ते चार्जेबल होते. हे जरा खुपले. असो चव छान होती. जेवून झाल्यावर मस्त शेकोटी भोवती शेजारील रूम्स मधील फॅमिली सोबत गप्पा टप्पा मारत बसलो.
सका सकाळी अंघोळीला डायरेक्ट समुद्रावर आणि तिकडून आल्यावर इथे एक छोटा हौद आहे त्यात डुंबून इन्फिनिटी पूल असल्यासारखा आनंद घेतला.
अवरल्यावर नाश्त्याला घावणे (₹ 60/प्लेट) सांगितले होते, मी तर पहिल्यांदाच खात होतो, आवडले मला. त्यामुळे एक प्लेट अजून खाल्ले.
इथल्या रूम्स जास्त हायफुंडू नाही आहेत, एकदम बेसिक आहेत. टॉवेल, साबण इ आपले आपण घेऊन जावा. गरम पाण्याची सोय आहे. आत आल्यावर सगळ्यात डाव्या बाजूची रम घेऊ नका, त्याच्या पाठीमागे असलेली पाण्याची मोटार, रात्रभर ऑटो स्टार्ट होत होती. केअर टेकर ना सांगून ते बंद करता येते का ते बघा. रात्र बरीच झाली असल्याने आम्ही तो मोटर चा आवाज बँक ग्राउंड म्युझिक समजून स्वतःच समाधान केले.
बीच अगदी जवळ आहे, भरपूर नारळाची झाडे, डुंबायला पाण्याचा हौद, परवडणारं रुम चे भाडे, मस्त जेवण, या साठी हा पर्याय ठीक आहे. आम्हा तिघांचे राहणे, खाणे सगळे मिळून 2600 मध्ये झाले. गुगल पे साठी नेटवर्क आहे.
खादाड : मदनकुमार जाधव
पत्ता : पेवेकर खानावळ.
72767 91970
https://maps.app.goo.gl/DQ1mq2XG3HRo5hKg9
#khadad_bhava #madankumarreview #kokan #pevekarkhanaval #seafood #aarvibeach