कोकण ट्रिप आणि खाद्यभ्रमंती भाग 2
आर्वी इथून घावणे चटणी चा नाष्टा करून आम्ही दिवेआगर कडे निघालो, जातानाचा रस्ता एकदम छान आहे डाव्या बाजूला मस्त समुद्राचा नजरा दिसतो. शिखडी, भरदखोल करत दिवेआगरला पोचलो.
गाडी पार्क करून दिवेआगर बीच कडे जाताना रुप नारायण मंदिर दिसले, छोटेच मंदिर आहे पण सुरेख आहे. बीच वर बरीच गर्दी होती. तिथे किनाऱ्यावर बरेच स्टार फिश पडलेले, रिधी ने पहिल्यांदाच खरे स्टार फिश बघितले त्याचा तिला आनंद. तिचा किल्ला बनवणं चालू असतानाच एक आज्जी मोदक विकत फिरत होत्या त्यांच्याकडून मोदक घेतले, केळीच्या पानातून त्यांनी ते दिले. एकदम मस्त चव. ह्या ट्रिप मध्ये खाल्लेल्या मोदकात सगळ्यात बेस्ट.
दुपारचे 1.30 वाजले असतील तेव्हा भुकेचे कावळे ओरडू लागले असल्याने जवळपास चांगले कुठले रेस्टॉरंट आहे ते गुगल केले. चांगल्या रेटिंग चे पाटील खानावळ, राणे खानावळ, पोतनीस खानावळ इ दिसले पण बीच वरील गर्दी पाहता ह्या ठिकाणी तुडुंब गर्दी असणार हे ध्यानात घेऊन, रेटिंग चांगले असलेले पण नवीन असे ठिकाण शोधले. सी फूड पॉइंट रेस्टॉरंट हे ठिकाण फायनल केले. आम्ही गेलो तेव्हा एकाच फॅमिली इथे जेवत होती, त्यामुळे आमचा वेटिंग चा वेळ वाचणार हे तर बघून बरं वाटलं. आम्ही खालील थाळ्या घेतल्या. ऑर्डर दिल्यावर जेवण बनवले जाते असे दिसत होते त्यामुळे 15 मिनिटे तर गेली
पापलेट थाळी (₹400): छोटा पापलेट फ्राय, सुकट चटणी, कोळंबी करी,सोलकडी, गरमागरम चपाती. पापलेट एकदम छान फ्राय झाला होता आणि फ्राइड असून देखील तेल अगदी नगण्य दिसत होते. सुकट चटणी पण चांगली होती. कोळंबी करी मला आवडते तशी होती. सोलकडी घरी आणि ताजी बनवलेली वाटत होती.
कोळंबी थाळी: (₹450): वरील सारखीच थाळी फक्त ह्यात पापलेट ऐवजी कोळंबी चे 10 पिसेस. कोळंबी फ्राय मस्त होता. रिधीला तर फारच आवडलं.
इथे चपाती जास्तीची घेतली होती , काउंटर वर बिल बनवताना चपाती बद्दल सांगितलं तर त्यांनी त्याचे पैसे लावले नाहीत. घरातील सर्व मेम्बर ह्या रेस्टॉरंट मध्ये काम करताना दिसून आले. फेमस असलेल्या खानावळी सोडून इथे आल्याच्या निर्णय योग्य ठरल्याचे समाधान, आम्ही जेवण करत असताना बाकीचे 5/6 टेबल्स देखील भरून गेले आणि वेटिंग सुरू झाले होते.
इथून आता श्रीवर्धन कडे जायचा बेत होता त्याची स्टोरी तिसऱ्या भागात.
खादाड भावा: मदनकुमार जाधव
पत्ता: हॉटेल सी फूड पॉइंट रेस्टॉरंट. भट्टी विभाग, कावरे आइस्क्रीम जवळ, दिवेआगर.
https://maps.app.goo.gl/E7ujG3EUDo2F4PTz7
#khadadbhava #madankumarreview #hotelseafoodpoint #seafood #kokan #diveagar #positivereview

