सर्वप्रथम सर्वांना इंटरनॅशनल कॉफी डे च्या हार्दिक शुभेच्छा. चाय चाय कॉफी कॉफी हा आवाज जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये ऐकतो तेव्हा आपसूकच आपल्याला चहा किंवा कॉफी प्यायची तलप येते.
सकाळी उठल्यावर बेडमध्ये असतानाच काही जणांना कॉफी प्यायची सवय असते.
*सकाळी सकाळी कॉफी पिल्याने वजन घटते.
कॉफीमध्ये असणारे क्लोरोजनिक ऍसिड आपल्याला लठ्ठपणापासून मुक्ती देण्यास मदत करते. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही भरमसाठ कॉपी पिली पाहिजे.
*ब्लॅक कॉफी ही शरीरासाठी चांगली असते कारण त्यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. जे आपला मूड फ्रेश करायला मदत करते. आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण ही करते.
आरोग्य तज्ञांच्या मते कॉफी ही आपल्याला फायदेशीर आहे कारण ती आपला मेंदू मजबूत करण्याचं काम करते कॉफीमध्ये अँटिऑक्सिडन्स आढळतात जे मेंदूचे कार्य व्यवस्थित चालण्यास मदत करतात.
दिवसभरात एक कॉफी चा कप पिल्यास तो तुम्हाला आरोग्यदायी आहे हा तुम्हाला शक्तीवर्धक आहे तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी हा कॉफीचा एक कप मदत करतो.
कॉफी हे जगभरातील एक सामान्य पेय आहे
कॉफीमुळे झोप कमी येते त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास करताना कॉफीचे सेवन करताना दिसतात.
डोळ्याखालील काळी वर्तुळे कॉफीमुळे कमी होतात.
पित्ताशयातील खडे रोखणे, मधुमेह, पार्किन्सन यासारख्या आजारातही कॉफी फायदेशीर आहे हे दिसून आले आहे.
कॉफी ही प्रौढांसाठी योग्य आहे कॉफीचे जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत
कॉफीमुळे निद्रानाश, मळमळ, पोट दुखी उलट्या यांसारख्या गोष्टी अति कॉफी पिल्यामुळे घडू शकतात.
फिल्टर न केलेली कॉफी पिल्याने रक्तातील चरबीचे प्रमाण वाढू शकते
दिवसभरात पाच कप कॉफी पिणे हे हृदयरोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
गर्भवती महिलांनी दोन कप पेक्षा जास्त कॉफी पिली नाही पाहिजे
तर अशी ही कॉफी तुम्ही अति प्रमाणात घेऊ नका आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्या.
तुमच्याकडे ही काही कॉफीचे सुंदर सुंदर फोटोज असतील तर मला नक्की खाली कमेंट मध्ये शेअर करा.