How to use Google Automatic voice typing to translate names of places to local language

नमस्कार लोकल गाईड्स

ह्या पोस्टमध्ये एखाद्या जागेचे नाव आपल्या स्थानिक भाषेत स्वयंचलित गूगल व्हॉइस टायपिंग द्वारे कसे भाषांतर करावे ह्याची माहिती देत आहे.

ह्यासाठी आपल्या फोनमध्ये खालील दोन गोष्टी असाव्यात.

१. फोनची भाषा - स्थानिक भाषा सेट करा - मराठी

२. जी बोर्ड ॲप्लिकेशन इन्स्टॉल असावे

१. एखाद्या जागेची निवड करा

२. Suggest an edit वर क्लिक करा

जागेचे नाव स्थानिक भाषेत सुचवताना छायाचित्र

३. मराठी मध्ये नाव जोडा हे क्लिक करा

स्वयंचलित गूगल व्हॉइस टायपिंग निवडीचे छायाचित्र

४. स्वयंचलित हे क्लिक करा

५. जागेचे नाव स्थानिक भाषेत उच्चारावे.

६. उच्चारलेले नाव बरोबर आहे का हे खात्री करून घेणे

बरोबर उच्चारलेले नाव ह्याचे छायाचित्र

७. खात्री करून घेतली की संपादन सबमिट करावे.

ही युक्ती वापरल्याने आपले काम खूप पटकन होते व वेळही वाचतो. तुम्हाला ही कल्पना कशी वाटली हे नक्की कळवा.

19 Likes

खूपच छान पद्धत आहे. जलद गतीने आपण भाषांतराचे काम करू शकतो. फक्त सार्वजनिक स्थानांचे नाव भाषांतर करताना काळजी घ्यावी लागेल. कारण त्या शब्दांचे मराठीत किंवा स्थानिक भाषेतील नाव आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. अशी उपयुक्त आणि जलद गतीची भाषांतर करण्याची पद्धत इथे शेअर केल्याबद्दल अभिनंदन आणि तसेच धन्यवाद @MayuriKubal :blush:

9 Likes

This is an interesting method @MayuriKubal I do echo the words of @Rohan10 though - its a good short cut but please make sure you check the translation with your own knowledge before saving. Place names often don’t translate particularly well as place names might have words that only make sense locally.

Paul

6 Likes

Thanks a ton @PaulPavlinovich Yes, I do agree with you, indeed I keep a tab on the translation been done correctly before submitting it.

4 Likes

@MayuriKubal @Rohan10

चालता बोलता नावे एडिट्स करण्यासाठी खरंच खूप छान आहे.

मला नवल वाटते तुमचे अजून नवीन काही तरी शिकता आले.

अतिशय छान मार्ग आणि सुकर असे हे आहे

6 Likes

मनःपूर्वक धन्यवाद @Rohan10 खरंच खूप कमी वेळात एडिट होते. हो, मी सगळे तपासून मगच सबमिट करते.

5 Likes

खूप धन्यवाद @mohanghyar अगदी बरोबर बोललात. सोप्या पद्धतीने एडिट होते.

4 Likes

@MayuriKubal

ही उत्कृष्ट सूचना दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि पोस्ट बद्दल अभिनंदन

या पद्धतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे भाषांतर आपणच करत असतो. त्यामुळे गूगल ट्रान्सलेट वापरताना जो अनाहूत चूक होण्याचा धोका असतो तो यात राहत नाही. अर्थात उच्चार स्पष्ट पाहिजेत. पण सहसा आपण ऍक्सेन्टेड उच्चार करत नाही!

6 Likes

तुमच्या कडून मिळालेल्या प्रेरणेतून हे सुचले @C_T अगदी सोपी आणि सहज पद्धत :heart_eyes: :heart_eyes: ही पोस्ट पण मी ह्याच पद्धतीने लिहिली. खूप धन्यवाद :blush:

5 Likes

@PaulPavlinovich @MayuriKubal

I haven’t tried this method but believe this is a phonetic translation of the word from English to native and not a language translation,

Further, since the purpose of localizing it is to help the locals discover and understand the place name, I think there should be least of worries about it not making sense to someone else.

5 Likes

नमस्कार @MayuriKubal

@mohanghyar ने म्हंटल्या प्रमाणे “चालता बोलता नावे एडिट्स करण्यासाठी” एक अतिशय सोपी पद्धत सखोल तपशीलांसह शेअर केल्याबद्दल अनेक आभार :pray:

ह्या पद्धतीने @C_T देखील प्रभावित झाले हे माझ्या लेखी उपयुक्ततेची पावती आहे, अर्थातच मी देखील ही पद्धत डेस्कटॉपवर वापरत येऊ शकते का? याची पडताळणी करून पाहतोय.

3 Likes

नमस्कार @TusharSuradkar

अगदी सहमत आहे तुझ्याशी दादा :blush: हो, नक्की पडताळून पहा आणि जर जमले तर सामायिक पण कर.

4 Likes

नमस्कार…

** @MayuriKubal **

खूप सोप्या पद्धतीने सर्व समजावून सांगितले आहे…

धनयवाद…

** @Mahesh_Dilip_Salvi **

** @Aditya_Patil **

** @SUMEET1 **

4 Likes

Thanks for sharing @MayuriKubal

Really this post will really help to the marathi speaking or even non english speaking Friends,

very good attempt to help the community

thanks @Shrut19 for sharing with me

regards

3 Likes

नमस्कार @Shrut19 ताई

धन्यवाद. तुझा पाठिंबा असाच कायम राहो :heart_eyes: :heart_eyes: :heart_eyes:

4 Likes

Hello @Anil6969

Happy to help. Thank you so much for your kind words :blush:

3 Likes