Homemade food Crab masala

रिधी बऱ्याच दिवसापासून Squid/माकुळ पाहिजे म्हणून मागे लागली होती. 2 वीकएंड ला फिश मार्केट ला चकरा मारल्या तरी काय भेटला नाही. ह्या वेळी पण गेलो तेव्हा पण उपलब्ध न्हवते, पण मार्केट मध्ये फिरत असताना एक भला मोठा समुद्री खेकडा दिसला, पण नको म्हणलं बघू परत. माझं प्राधान्य काळ्या पाठीचा खेकडा किंवा चिंबोरीला असते. गाडी पर्यंत आलो पण जश्या लोकांच्या नजरेतून गौतमी पाटील जात नाही तसं माझ्या डोळ्यासमोरून ह्या खेकड्याच्या नांग्या काय जाईनात, मग परत गेलो आणि घेतलाच.

जवळपास 900 ग्रॅम चा एकाच खेकडा होता. अजून एक खेकडा घेऊन दीड किलो वजन केले. काउंटर वर असलेल्या मालकांनी खेकड्याचा आकार बघून पाटी वर लिहलेल्या पेक्षा जास्त रेट लावला का तर म्हणे हा मोठा चुकून ह्या क्रेट मध्ये होता, त्याचा रेट जास्त आहे. थोडा भाव करून 50 ऐवजी 20 दिले आणि मिटवले.

घरी आणून मस्त साफ करायला घेतले, मोठा खेकडा तर ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जवळपास 2फूट लांब होता. आज रिधीची आणि माझी मज्जाच होती.

साफ करून मोठ्या भांड्यात खेकडा मसाला बनवायला घेतला. दोन्ही खेकडे आकाराने मोठे असल्याने मसाल्यात फ्राय करताना जरा जास्तच प्रयत्न करावे लागले. शेवटी एकदाच खेकडा मसाला तयार झाला.

फोटो बिटो काढून , नांग्या कडाडा फोडून खाल्ल्या. एकदम ज्यूसी आणि सॉफ्ट सॉफ्ट, वा मज्जा आणि लय. खेकडा खाऊन रिधी पण खुश आणि तिचा डॅडु पण खुश. जिंदगीत मजाच मजा.

खादाड भावा : मदनकुमार जाधव.

#khadad_bhava #crab #crabmasala #seafoodlover

Final plating

jumbo crab

Juicy m

Look at this claw size

eat claw

It was almost 2 ft strech

14 Likes

मस्त रे!! छान लिहिले आहेस.

@Madankumarj

Pफोटो सुद्धा छानच.

1 Like

@Madankumarj

Schöne Fotos von diesen großen Krabben

1 Like

Such a huge crab must be very tasty indeed. Thanks for sharing with us, Mitra, @Madankumarj .

Cheers!

1 Like