मागच्या वेळी रिधी साठी squid/माकुळ काय मिळालं न्हवतं, ह्या वेळी पुन्हा शोध घेतला तर मिळालं.
मी आणि तिने गोव्यात खाल्ले आहे, Absolute Barbeque मध्ये खाल्ले आहे पण पहिल्यांदाच घरी बनवणार होतो.
फिश मार्केट मधून आणतांनाच साफ करून आणि रिंगज कट करून आणले होते. घरी आणल्यावर एक बटर गार्लिक प्रिप्रेशन आणि एक फ्राईड असे ठरवलं.
बटर गार्लिकला काय जास्त वेळ।लागला नाही आणि व्यवस्थित तयार झाल. फ्राइड डिश करताना मात्र किचन ची अर्धी भिंत उडणाऱ्या तेलाने माखली. मोठ्या परतीचा उपयोग ढाली सारखा करून कसेतरी सगळे फ्राय करून घेतले.
दोन्ही डिशेस बनवून झाल्या, अनिकेत च्या कंटेंट वर रिल्स पण बनवून झाल्या. डिशेस खायला घेतल्या तेव्हा कळले की 10 पैकी 4/5 च मार्क पडतील अशी अवस्था त्या squid ची झाली होती.
ह्यातून बोध घेतला की squid काय अपल्याच्याने होणार नाही, गप गोव्याला गेले की मनसोक्त खायचा.
पुण्यात कुठे मिळत असतील तर सुचवा.
खादाड भावा: मदनकुमार जाधव
#khadad_bhava #homemadefood #seafood #squid #failedattempt