ह्या रविवारी नवीन ठिकाणी मिसळ खायला जवळपास कुठेतरी जायचे म्हणून बाहेर पडलो. सिंहगडरोड खाऊ गल्लीत असलेल्या सुदामा मिसळ हाऊसला गेलो.
रिधी साठी एक साबुदाणा खिचडी आणि आमच्यासाठी 1 पावभाजी आणि एक मिसळ सांगायची होती पण पावभाजी ला वेळ लागेल असे सांगितले म्हनुन दोघांसाठी मिसळ थाळी मागवली.
आता येईल मग येईल वाट बघत बसलो 10 मिनिटे झाली तरी येईना म्हणून ऑर्डर घेणाऱ्याला विचारले तर सांगितले रस्सा संपला आहे तो बनवत आहे, तो झाला की मिळेल.
रिधी साठीची खिचडी 15 मिनीटात आली, 1/2 घास खाऊन बघितलं एव्हडी खास नाही वाटली.
शेजारील टेबलावर पावभाजी मागितली होती ती आली पण जवळपास 30 मिनिटे झाली तरी आमची मिसळ थाळी अली न्हवती. अजून 5/10 मिनिटांनी अली एकदाची, ती पण एकच थाळी दिली. ती मी हिला दिली, आता माझी थाळी येईल म्हणून वाट बघत बसलो 5 मिनिटे झाली तरी येईना म्हणून विचारलं तर तुम्ही एकाच थाळी सांगितली होती असे म्हणाला. दे बाबा दुसरी पण म्हणल्यावर थोड्या वेळात मिळाली.
थाळी मध्ये, मिसळ मिश्रण, शेव फरसाण वाटी, मटकी वाटी, दही, कांदा, पाव, शिरा आणि बॉब्या.
मिसळ मिश्रण आणि रस्सा चांगला वाटला, लय भारी असा न्हवता पण चांगला होता. रस्सा झणझणीत आला होता. मटकी रस्यामध्ये पण भरपूर होती, आणि थाळीच्या वाटी मध्ये पण.
थाळी मधला शिरा ठीकठाक होता.
दुपारचे 2 वाजले होती तरी बऱ्यापैकी गर्दी होती, शेजारील बऱ्याच टेबल्स वर पंजबी डिशेस मागवलेल्या दिसल्या, नेक्स्ट टाइम ट्राय करेन.
चव ठीक आहे पण सर्विसवर लक्ष दिले पाहिजे.
खादाड भावा: मदनकुमार जाधव
#madankumarreview #khadad_bhava #sudamamisal #misallover #veg