सर्वाँना नमस्कार…![]()
Shri Samarth Murti-Mutki Bhandar
महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकाने साजरे होतात.
महाराष्ट्रात काही भागात भोंडला, हादगा, भुलाबाई हे महोत्सव साजरा होतो.
भुलाबाई म्हणजे देवी पार्वती.
एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात मग शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून, गाणी गाऊन शंकराला प्रसन्न करून घेते.
यातून शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा असं म्हणतात…तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीच्या मुर्तीची पूजा करतात.
पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच असतो.
भुलाबाई किंवा गुलाबाई हा सण मुलीच साजरा करतात असा महोत्सव आहे., हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत साजरा करतात.
गणपतीच्या आगमनानंतर भुलाबाई- भुलोजी यांचे आगमन होते.
दोन वेगवगळ्या स्वरूपातील भुलाबाई मुर्त्या…![]()
![]()
काही ठिकाणी यांना गुलाबाई- गुलोजी असंही म्हणतात.,
कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी यांचे विसर्जन केले जाते.
हा सण साजरा करण्यासाठी भुलाबाई - भुलोजी यांची मूर्ती स्थापना केली जाते महिनाभर त्यांची आरती आणि पुजा केली जाते… छान-छान विविध प्रकारचा खाऊ पदार्थ त्यांना दिला जातो.
या मुर्त्या पूर्वीपासून कुंभार लोकं बनवतात त्यांना छान आकर्षक रंगांनी रंगवतात आणि मग सणाच्या सुरुवातीला बाजारात विकण्यासाठी आणतात.,
12 बलुतेदारांमध्ये कुंभार हा एक वर्ग आहे ते लोकं हाच व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतात…यात ते सर्व प्रकारच्या मातीच्या गोष्टी बनवून विकतात.,
आज पासून दिवाळी सुरू झालेली आहे.
बाजारात बऱ्याच प्रकारच्या कृत्रिम रोषणाईचे साहित्य किंवा मेणाचे दिवे मिळतात ते न घेता आपल्या पारंपरिक पद्धतीने मातीचे दिवे लावून दिवाळी साजरी करूयात…आणि या छोट्या व्यावसायिकांना मदत करूया…त्यांची व आपली दिवाळी आनंदी करूया…![]()
Canva मध्ये मी बनवलेले Logo Design…![]()
![]()
भेटूया परत एका अशाच पोस्ट मधून…तोपर्यंत धन्यवाद…![]()
![]()





