मागील लेखात, मी कॅप्शन्स च्या एका फायद्याचा फक्त ओझरता उल्लेख केला होता.
आपण कॅप्शन्सचा वापर करून आपले खाजगी झाले असलेले फोटो शोधू शकतो.
आज त्या वर सविस्तर लिहित आहे.
परंतु त्यासाठी, आपल्याला एका पीसी चा वापर करावा लागेल.
पीसी वर कॅप्शन्स दिसतात का? हो, नक्कीच. पण सहजासहजी नाहीत.
आपण कुठलाही फोटो “फुल-स्क्रीन मोड” मध्ये उघडल्यावर, स्थळ-नामाच्या जागी कॅप्शन दिसायला लागते. पण, योगदानकर्त्याने त्या समाविष्ट केल्या असतील तरच!
किंवा बाजूच्या प्रीव्ह्यू पे~न वर माउस हॉवर केल्यावर कॅप्शन्स एका छोट्या खिडकीमध्ये दिसतात.
तसेच, विंडोज ओएस त्या वाचूही शकते.
त्यासाठी, आपल्याला नॅरेटर चालू करावा लागेल.
अजून एक गमतीदार गोष्ट म्हणजे नॅरेटर फोटोमध्येही डोकावून बघून अधिक काहीतरी सांगण्याचाही प्रयत्न करतो!
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॅप्शन्स कॉपी करता येतात.
त्यासाठी, सर्व फोटो स्क्रोल करून तळापर्यंत जावे लागेल.
अतिशय वेळ-खाऊ काम. पण पीसी ची क्षमता असेल तर पाच हजार फोटोजपर्यंत प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही.
तळाशी पोहोचल्यावरही सर्व फोटो दिसू लागेपर्यंत थांबावे लागते. तसे झाल्यावरच कॉपी करणे यशस्वी होते.
सर्व फोटो प्रगटल्यावर आधी CTRL + A आणि त्यानंतर आपल्याला CTRL + C, अशा दोन आज्ञा एका पाठोपाठ द्याव्या लागतील.
असे केल्यावर सर्व मजकूर क्लिपबोर्ड मध्ये सामावला जाईल.
त्यानंतर नोटपॅड उघडून सर्व मजकूर त्यामध्ये ते पेस्ट करता येईल. आपण जर दुसरे कुठले माध्यम वापरले तर त्यात फोटोही सामील होतात, आणि त्यामुळे पुढील काम अवघड होते. ते टाळण्यासाठी नोटपॅड उत्तम.
आता, तो केवळ एकच टप्पा झाला. त्यामुळे, आपल्या सर्व म्हणजे सार्वजनिक + खाजगी फोटोची माहिती आपण एका फाईलीत समाविष्ट केली.
आपल्याला तेच काम परत एकदा आपले प्रोफाईल ब्राउजरच्या “गेस्ट मोड” मध्ये उघडून करावे लागते.
तर, अशा प्रकारे, “सार्वजनिक + खाजगी” आणि “केवळ सार्वजनिक”, अशी माहिती असलेल्या दोन फाईल्स आता तयार आहेत.
त्या दोन्हींची तुलना केल्यावर ज्या फोटोंचे कॅप्शन्स “केवळ सार्वजनिक” फाईल मध्ये दिसत नाहीत, ते आता खाजगी झाले आहेत हे उघड होईल.
तुम्ही कॅप्शन्स देताना एखाद्या विशिष्ट चिन्हकाचा उपयोग केला, तर त्या ओळखणे क्लिष्ट होत नाही. मी त्या साठी # या चिन्हा चा वापर केला.
दोन फाईल्स ची तुलना करण्यासाठी आपल्याला योग्य वाटेल ती कुठलीही व्यवस्था वापरता येईल. यावर झालेली सखोल चर्चा आपण पूर्वीच्या एका लेखात पाहू शकाल.
पण मी मात्र केवळ व्ही-लूकअप वापरतो.
वरील लेख मराठी मध्ये लिहिण्या मागील पार्श्वभूमी.
काही दिवसांपूर्वी “केवळ इंग्रजी वापरकर्त्यांसाठीच ‘कनेक्ट’ आहे का? " यावर चर्चा झाली होती”.
त्यावर विचार करताना स्थानिक भाषा ना वापरण्यामागे असणारे दोन ठळक मुद्दे माझ्या लक्षात आले होते. ते या प्रमाणे:-
१. स्थानिक भाषेत लिहिण्यासाठी लागणाऱ्या साधनांचा अभाव.
२. स्थानिक भाषेतील लेखाचे इंग्रजीत रूपांतर होताना जाणवणारे विकृती करण.
मात्र, या दोन्ही वरही गूगल ट्रान्सलेट वापरून कशा प्रकारे मात करता येईल, ते मी ह्या लेखात दाखविले होते.
आता त्याहीपुढे जाऊन एखादा माहितीपूर्ण विषय स्थानिक भाषेतही मांडता येते, असे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे.