कोकण ट्रिप आणि खाद्यभ्रमंती भाग 3
दिवेआगर मध्ये दुपार चे जेवण करून आम्ही रमत गमत श्रीवर्धनला जायला निघालो. जाता जाता गुगल बाबाची मदत घेऊन बीच फ्रंट असेलेले रिसॉर्टस शोधत होतो , त्यातील सुभान बीच रिसॉर्ट हे पहिले ठिकाण लागत होते म्हणून पहिलं तिकडेच गेलो, रिसॉर्ट ची भरपूर जागा आहे, रूम्स आर्वी च्या रूम्स पेक्ष्या मोठ्या होत्या, रिसॉर्ट मध्ये 2 मोठे बॅचलर ग्रुप्स असल्याने आम्हाला एका बाजूला असलेल्या रूम्स दाखवल्या होत्या.(₹2000) बीच फ्रंट असल्यानं इथेच थांबायचे ठरवलं. थोडा आराम करून रिधी बरोबर समुद्रात डुंबलो.
संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो, श्रीवर्धन चा मेन बीच वर एकदम मस्त वॉक बे बनवला आहे, बरेच सेल्फी पॉईंट आहेत, व्यायामाची साधने आहेत, अगदी रात्री चे 9.30 वाजले होते तरी बर्यापैकी गर्दी होती. खाण्याचे देखील बरेच स्टॉल्स होते.
रात्रीच्या जेवणासाठी तवसाळकर रेस्टॉरंट शोधलं होते, तिकडे जाताना मेन मार्केट रोड ला एवढे ट्राफिक लागलं की त्यात 20 मिनिटे आशिच गेली आणि तिथे पोचून बघतो तो ते रेस्टॉरंट बंद, आता काय परत गुगल बाबा ची मदत घेऊन रिसोर्ट कडे जायच्या रोड वर कुठले रेस्टॉरंट दिसते का ते पहिले त्यात सनराइज नावाचे एक दिसले मग तिकडे गेलो, जाताना पुन्हा मार्केट मध्ये ट्राफिक लागले पण ह्या वेळी 10 मिनीटात सुटलो.
एकदाच रेस्टॉरंट ला पोचलो, एक सुरमई थाळी, एक कोळंबी फ्राय आणि रिधी ने हट्ट केला म्हणून नूडल्स घेतल्या होत्या.
सुरमई थाळी (400): सुरमई फ्राय, सुरमई करी, तांदळाची भाकरी, भात. सुरमई चे छोटे पिसेस बघून थोडं हिरमुसलो, पण ह्या थाळी मधील तीच एक गोष्ट बरी लागली.
कोळंबी फ्राय (250): ह्यात छोट्या आकाराच्या 12/13 कोळंबी आल्या होत्या. ही डिश चांगली लागली
नूडल्स: (200) : ही डिश इथे घेऊन साक्षात गंडलो होतो. फोटो देखील काढला नाही, लिहायचे राहूदे.
जेवण आवरून पुन्हा रिसॉर्टला पोचलो.
सकाळी इथे नाश्त्याला मिसळ, पोहे आणि ब्रेड ऑम्लेट घेतले होते.
मिसळ काय हिला आवडली नाही
मी ब्रेड ऑम्लेट खाल्ले ते चांगलं लागले
रिधी ने पोहे घेतले होते ते पण ठीक होते.
ह्या रिसॉर्ट ला देखील टॉवेल देत नाहीत, साबण , शॅम्पू दिले होते. डास आहेत त्यांनी त्याची अगरबत्ती दिली होती. झोपाळा इ आहेत त्यात मस्त फोटो येतात. सकाळ संध्याकाळ गरम पाण्याची सोय आहे. आम्हाला दुसऱ्या दिवशी लक्षात आलेली गोष्ट म्हणजे ह्या रिसॉर्ट जवळ 100/150 मीटर वरच स्मशानभूमी आहे. ज्यांना अश्या गोष्टींचा त्रास होतो त्यांनी लांबच राहा, आलो त्या रात्री भीतीदायक स्वप्न का पडली याचे उत्तर मिळाले. पुढच्या ट्रिप साठी शिकवणी मिळाली, रिसॉर्ट फायनल करण्या अगोदर आसपास काय आहे एक एकदा गुगल मॅप वर बघावे.
इथुन चेक आउट करून हरिहरेश्वर ला जायचा बेत होता त्याची स्टोरी भाग 4 मध्ये
खादाड भावा: मदनकुमार जाधव
Subhan beach Resort map
https://maps.app.goo.gl/b5p2vabRUGVBeddN8
Sunrise restaurant map
https://maps.app.goo.gl/PLRM1aRHACUxdrfc7
#khadad_bhava #madankumarreview #kokan #shrivardhan #subhanbeachresort #sunriserestaurant